Raigad Fort History Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Raigad Fort History: रायगड जिल्ह्यातील इतिहासावर नवा प्रकाश

Shivaji Maharaj Coronation Inscription: राजपथावर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधिश्वर श्री राजा शिव छत्रपती की जय, अश्या घोषणा दिल्या गेल्या.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सर्वेश बोरकर

नवीन उजेडात आलेला हा शिलालेख रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यापासून सुमारे २३ किलोमीटर अंतरावरील कुसुंबळे येथील प्राचीन शिवमंदिराच्या जोत्यावर कोरलेला आहे. सदर ब्रिटिशकालीन शिलालेख इतिहास संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे

रायगड जिल्ह्यातील शिवछत्रपतींच्या दुर्ग दुर्गेश्र्वर रायगड किल्ल्यावर जगदीश्र्वराचे महादेवाचे मंदिर आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या परीसरात एक संस्कुत भाषेतील प्रसिद्ध शिलालेख आहे. इतिहासाच्या दृष्टिकोनातून हा शिलालेख फार महत्त्वाचा.या ऐतिहासिक शिलालेखातून आपल्याला काही संदर्भ मिळतात. काही अंदाज बांधता येतात, तसेच शिव राज्याभिषेकाची तिथी या शिलालेखामुळे स्पष्ट होते. शिवकालीन रायगड कसा असेल याचं डोळ्यांसमोर चित्र या शिलालेखातून उभं राहतं.

रायगडावर गेले असता बऱ्याच लोकांनी हा शिवकालीन शिलालेख पाहिलाही असेल पण संस्कृत भाषेत असल्यामुळे वाचायचा राहून गेला असेलही. जगदीश्र्वर मंदिराच्या प्रवेश द्वारावर उजव्या बाजूस दरवाजाच्या भिंतीवर असलेला सुंदर शिलालेखाच्या पहिल्या ओळीतच श्री गणपतये नमः असे लिहिले गेले आहे. या शिलालेखामुळे आपल्याला कळते, की शिवकाळातही श्री गणपती हे दैवत किती महत्त्वाचे होते.

शिलालेखाच्या चवथ्या व पाचव्या ओळीत दिल्याप्रमाणे सिंहासनाधीश्वर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची तिथी सांगितली गेली आहे, जी पुढीलप्रमाणे ‘शके षण्णवबाणभूमिगणना दानन्द संवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ’ यांचा त्यांच्या प्रमाणे अर्थ श्रीमद् छत्रपती शिवाजी महाराज यांचा शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर म्हणजेच इ स ६ जून १६७४ या दिवशी राज्याभिषेक जाहला जो अतिशय चांगला मुहूर्त होता.

तसेच हा शिलालेख राज्याभिषेकाच्या आधी म्हणजे ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीच्या दोन दिवसाआधी एकादशीला स्थापिला आहे. काय काय बांधकामे केली गेली आहेत, याची माहिती पुढीलप्रमाणे शिलालेखात दिली आहे ‘वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।

श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो’ म्हणजे या रायगडावर हिरोजी इंदुलकर नावाच्या शिल्पकाराने उभ्या केलेल्या विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राणीगृहे आणि नरेंद्र सदन म्हणजे राजाचा महाल अशांची उभारणी केली गेली.त्यांच्या नंतर शेवटच्या ओळीत लिहिले आहे की ‘यावचन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते’याचा अर्थ जोवर आकाशात चंद्र सूर्य आहेत या पृथ्वीच्या अंतापंर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आणि रायगडाची खुशाली नांदो म्हणजे अबाधित राहो.

शिलालेखामुळे आपल्याला राज्याभिषेकाचे अचूक वर्णन सापडते ज्यामुळे अनेक बखरीत असलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळते, राज्याभिषेकाचा सोहळा शुक्रवार ५ जून रोजी सुरू झाला होता. त्याची वेळ शुक्रवार २२ घटीका व उप वेळ द्वादशी मुख्य विधी पहाटे होता. राज्याभिषेकासाठी शिवाजी महाराजांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवले होते. सभासद बखर म्हणतो महाराजांनी ३२ मण सोन्याचे हे सिंहासन तयार करून कोषातील मौल्यवान रत्ने त्यामध्ये जडवली होती.

अष्टप्रधान मंडळ, पंडीत व इतर अधिकारी या शुभवेळी सभागृहात सगळ्यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराज सिहांसनास वंदन करून हातात राजदंड घेऊन सिंहासनावर आरूढ झाले, राजदर्शनासाठी जगदीश्वर मंदिरापर्यंत हत्ती वरून मिरवणूक काढली गेली. राजपथावर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधिश्वर श्री राजा शिव छत्रपती की जय, अश्या घोषणा दिल्या गेल्या. महाराजांनी जगदिश्वराचे म्हणजे व्याडेश्र्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर हा सोहळा पूर्ण झाला.

हल्लीच परत एकदा रायगड जिल्ह्यातील एका नवीन शिलालेख उजेडात आला आहे, नवीन उजेडात आलेला हा शिलालेख रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यापासून सुमारे २३ किलोमीटर अंतरावरील कुसुंबळे येथील प्राचीन शिवमंदिराच्या जोत्यावर कोरलेला ब्रिटिशकालीन शिलालेख इतिहास संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. शके १८२० (इ.स. १८९८) मधील चार ओळींचा शिलालेख म्हाजे मित्र व स्नेही तसेच कोकण इतिहास परिषदेचे ,रायगड जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी शोधून त्याचे वाचन केले आहे.

हा शिलालेख ब्रिटिश राजवटीच्या काळात अलिबाग हे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असतानाही ग्रामीण भागातील धार्मिक संस्था, मठपरंपरा आणि मंदिर व्यवस्थापन सक्रिय असल्याचा दुर्मीळ अभिलेखीय पुरावा मानला जात आहे. या शिलालेखामुळे कोकणातील शैव परंपरा, मंदिर व्यवस्थापन आणि पुरी संप्रदायाच्या कार्याचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज प्रथमच प्रकाशात आला आहे.

शिलालेखातील मजकुरानुसार पुढिल प्रमाणे – ‘बुधपुरी, समशेरपुरी, शंकरपुरी व चिदापुरी चे मंदिर होते. त्याचा जीर्णोद्धार नातू देऊपुरी, गुरु मंगळपुरी..." असा उल्लेख आढळतो. तसेच ‘गौरशिवचे पु. पांडू बामणा...’अशी नोंदही कोरलेली आहे. शेवटी ‘शके १८२०, विलंबी नाम संवत्सरे’ अशी स्पष्ट काल नोंद असल्याने मंदिराचा जीर्णोद्धार इ.स. १८९८ मध्ये झाल्याचे सिद्ध होते.

या शिलालेखाचा अन्वयार्थ मांडताना प्रा. डॉ. धनावडे सांगितात की, येथे उल्लेख झालेली बुधपुरी, समशेरपुरी, शंकरपुरी, चिदापुरी, देऊपुरी आणि मंगळपुरी ही नावे दशनामी गोसावी परंपरेतील ‘पुरी’ शाखेशी संबंधित असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा शिलालेख केवळ मंदिराच्या जीर्णोद्धाराची नोंद नसून कोकणातील पुरी संप्रदायाचे अस्तित्व, त्यांची गुरु-शिष्य परंपरा आणि मंदिर व्यवस्थापनातील योगदान अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो. कोकणातील पुरी परंपरेचा इतिहास शिवकालापर्यंत मागे जात असल्याचे विविध ऐतिहासिक साधनांवरून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking Viral Video: झोपलेल्या शेतकऱ्याच्या शर्टात घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क; थरारक व्हिडिओ व्हायरल

VIDEO: 'द हंड्रेड' स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजाचा नवा ड्रामा! उस्मान तारिकच्या बॉलिंग ॲक्शनवर टिम डेव्हिडचा संताप, व्हिडिओ व्हायरल

CJP Protest: "हा विद्यार्थ्यांचा विजय अन् भाजप सरकारच्या अंताची सुरुवात!" आलेमाव यांचा हल्लाबोल

Goa colonial history: गोव्याचा समान नागरी कायदा; समानता की उच्चजातीय हितसंबंध जपणारा करार?

खरी कुजबूज: विजय-गिरीशचे सूत जमले

SCROLL FOR NEXT