Online Gaming Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Online Gaming: 49 रुपयांत करोडपती बनवण्याचे आमिष, ऑनलाइन गेमिंगने कंगाल झालेत लाखो लोक

Online Gaming Ban India: ‘ऑनलाइन गेमिंग’ म्हणजे खेळ हे गोंडस विशेषण लावून सुरू असलेला जुगारच. याला चटावलेला ग्राहक मात्र देशोधडीला लागला.

Sameer Amunekar

‘ऑनलाइन गेमिंग’ म्हणजे खेळ हे गोंडस विशेषण लावून सुरू असलेला जुगारच. याला चटावलेला ग्राहक मात्र देशोधडीला लागला. काही कष्ट न करता पैसे मिळवण्याची माणसाची सहजप्रवृत्ती आणि लालसा असते. त्यात हाताशी भरपूर वेळ असला तर मग अशा संधी शोधण्याचा ते प्रयत्न करतात. ‘ऑनलाइन गेमिंग’ करणाऱ्या व्यावसायिक कंपन्या अशाच सावजांच्या शोधात असतात.

मग या मंडळींना अधिक आकर्षित करण्यासाठी मोठमोठे स्टार, खेळाडू यांच्या मार्फत भरपूर जाहिरात करुन ‘४९ रुपयात करोडपती व्हा’ या सारखी आमिषे दाखवली जातात. पैसे गमावताना आपण कधीतरी जिंकू या वेड्या आशेपोटी आणखी पैसे यात घातले जातात आणि शेवटी कफल्लक होऊन माणूस यातून बाहेर पडतो.

हे दारुण दृश्य आता आपल्याकडे नेहेमीचेच झाले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ऑनलाइन गेमिंगचे नियमन करण्यासाठी ऑनलाइन गेमिंग ॲपवर बंदी आणून सरकारने आपला इरादा नेक असल्याचे सूचित केले आहे. हे महत्त्वाचे विधेयक संसदेत संमत होऊन राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरीही  झाल्यामुळे  खेळाच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगाराला पायबंद घालण्याचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे.

हा खेळ केवळ पैशाचा गैरव्यवहार एवढ्यापुरता मर्यादित नसून, त्यामुळे अनेक गुंतागुंतीचे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. जगभरात या खेळात रममाण झालेल्या पाच खेळाडूत एक आपला भारतीय असतो, यावरुन याची मोठी व्याप्ती लक्षात यावी. रातोरात करोडपती करण्याच्या या भ्रमित करणाऱ्या खेळाने भारतभरात उच्छाद मांडला आहे.

२०२४च्या आकडेवारीनुसार ३२ हजार कोटी रुपयांच्या या बाजारात या आर्थिक उलाढाल करणाऱ्या खेळांचा वाटा २७ हजार कोटी रुपये इतका होता. २०१८ पासून आत्तापर्यंत या खेळातील उलाढाल चौपट वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२४ या वर्षात १५ कोटींहून अधिकजण या खेळात सहभागी झाल्याचे चित्र समोर आले. यातील सुमारे एक कोटी नागरिक दररोज हा खेळ खेळतात,असे निदर्शनास आले आहे.

सरकारने १४००हून अधिक जुगार आणि बेटिंग याला प्रोत्साहन देणाऱ्या वेबसाईट्स आणि अॅप्स वर २०२२ ते २०२५च्या फेब्रुवारीअखेर बंदी आणून या व्यसन लावणाऱ्या व्यवहाराला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला होता. आता या प्रयत्नांना या येऊ घातलेल्या नव्या कायद्यामुळे अधिक बळ मिळेल. तंत्रज्ञानाने प्रगती होईल, उत्पन्नात मोठी भर पडेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. काही क्षेत्रात त्याचे लाभही झाले.

आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्याला समृद्धी मार्गावर नेले खरे; पण यावरच्या अनिर्बंध, अविवेकी वेगवान प्रवासात असे अनेक बळीही गेले. ऑनलाइन गेमिंगने या आधुनिक व्यवस्थेची भेसूरता अधिकच ठसठशीत केली. संयम आणि नियमन यांचा वापर करुन, विवेकाची प्राणप्रतिष्ठा करुन ती कमी करता येईल का, ते पाहणे एवढेच आता आपल्या हातात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT