Nanoda Village Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

Nanoda Village Goa: आपले तिथल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटीने स्वागत होते, आणि नानोडा गावांतील असलेल्या असंख्य मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी आपले मन भक्तीमय होऊन जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या डिचोली तालुक्यातील लाटंबार्से ग्रामपंचायतीमधील एक सर्वांगसुंदर सदोदित हिरवाईने नटलेले, बारमाही वाहणाऱ्या जीवनदायीनीच्या तीरावर वसलेले, पोर्तुगीज राजवटीच्या धर्मांध विकृतीतून, मंदिर, देवी-देवतांवंर हातोडा लागण्यापूर्वीच बार्देश मधील कित्येक देवी-देवतांना आपल्या कुशीत मायेने, ममतेने स्थान देणारी ....माझी, आमची सर्वांची देवभूमी म्हणजेच नानोडा.

गोव्याची सीमारेषा अवघ्या अंतरावर असलेले छोटेसे...टुमदार...वैभवशाली असे नानोडा गाव अस्नोडा असो वा दोडामार्ग दोन्ही विरूद्ध बाजूंनी नानोड्यात येतांना... आजूबाजूंची हिरवीगार हिरवळ पाहून मन प्रफुल्लित होते. शेतकऱ्यांच्या कष्टांतून उगवलेली, पिकलेली बहारदार शेती, कुळागरे, आपले सहर्ष स्वागत करतात. बसस्टॉपपासून हाकेच्या अंतरावर असलेले, आमची जुनी पण आता अद्ययावत केलेली सरकारी प्राथमिक शाळा.

आपले तिथल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटीने स्वागत होते, आणि नानोडा गावांतील असलेल्या असंख्य मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी आपले मन भक्तीमय होऊन जाते. आमच्या गावांत जवळपास बावीस लहान मोठी मंदिरे आहेत, जिथे वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक विधी कोणत्या ना कोणत्या उत्सवांत उत्साहात साजरे केले जात असतात. श्रावण असो वा पौषातील जत्रांचे दिवस कायम बाराही महिने माझा गाव कायम प्रफुल्लित असतो.

श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण शांतादुर्गा कांदोळीकरीण, हडफडे, म्हापसा, बस्तोडा वगैरे अनेक गावांतील देवी-देवता आमच्या देवभूमीत आश्रयाला आल्या. येथील प्रत्येक देवस्थानचे स्वतःचे असे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. ग्रामदेवता सातेरीची प्रसाद पाकळी सर्वदूर पसरली आहे. श्री. लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानांत कुठल्याही दिवशी मुहूर्त न धरता अडलेल्यांचा विवाह होतो.

नानोड्याचा शिगमोत्सव संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. तो गुढीपाडव्याच्या आपल्या दिवशी घोडेमोडणी होते. हा घोडेमोडणी उत्सव म्हणजे सळसळत्या तरुणाईचा महा-उत्सव असतो. इथली भूमी सुजलाम सुफलाम हिरव्यागार शेतीने नटलेली आहे. जे जे पेरले, ते ते उगवतेच. इथले ‘नेचर इन फार्म’, सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी असलेले श्री शांतादुर्गा क्लबची भव्य मोठी इमारत, जिथे इथला सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो.

आमच्या नानोडा गावांत अनेक अष्टपैलू रत्ने आहेत, होती, एकच उदाहरण लिहितो. गोवा राज्य स्वातंत्र्यसैनिक पुरस्कार प्राप्त, गोवा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कै. दामोदर श्रीपाद केळकर, हे आमच्या नानोडा गावांतील बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले, हुबेहुब साने गुरुजी. अशी अनेक रत्ने नानोड्याच्या वैभवात भर घालत आहेत. अशी ही माझी देवभूमी... नानोडा गाव सर्वांनाच भूरळ घालतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT