Birsa Munda Jayanti Margao Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Birsa Munda: भगवान बिरसा मुंडा 'मानवतेचे प्रतीक' होते, या विचाराला केंद्रस्थानी ठेवून तवडकर यांनी जो मार्ग दाखवला तो गोवाभर पसरला आहे

Ramesh Tawadkar: भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांची ज्योत गोव्यात आज जशी प्रखरपणे तेजाळत आहे ती ज्योत विझणारी नाही. ती एका वारशाची आठवण करून देते ती एका संघर्षाची प्रेरणा देते.

गोमन्तक डिजिटल टीम

कृष्णा पालयेकर

मडगाव येथे अलीकडेच झालेली भगवान बिरसा मुंडा यांची भव्य यात्रा ही केवळ एक सांस्कृतिक घटना नव्हती तर गोव्याच्या सामाजिक चेतनेत उमटलेली नवी लखलखती झेप होती. संपूर्ण गोव्यातील हजारो लोकांनी दुचाकींवरून एकत्र येत ज्या उत्साहाने जयघोष केला त्यातून भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आजही तेवढेच प्रासंगिक आहेत हे अधोरेखित झाले.

‘भारत माता की जय’ आणि ‘भगवान बिरसा मुंडा की जय’ यांच्या गजरात प्रज्वलित झालेली ही यात्रा गोव्यात एक ऐतिहासिक घटना ठरली! ही यात्रा जिथे झाली ती मडगावची भूमी त्या दिवशी केवळ एक शहर नव्हती तर विचार आणि श्रद्धेचे एक असीम संगमस्थान भासत होती. दुचाकीस्वारांच्या शेकडो रांगा, टी शर्ट्सवरील बिरसाजींच्या प्रतिमा, फलक ध्वज आणि लोकांच्या चेहऱ्यावरील अभिमान हे दृश्य अविस्मरणीय ठरले.

गोव्यात ही चळवळ जागृत करण्यामागे ज्या व्यक्तीची वैचारिक बैठक आणि संघटनकौशल्य निर्णायक ठरले ती व्यक्ती म्हणजे डॉ. रमेश तवडकर. गेल्या वर्षी सभापती असताना त्यांनी पत्रादेवी, पेडणे, काणकोण या संपूर्ण पट्ट्यात भगवान बिरसा मुंडा यात्रेचे आयोजन केले होते.

तेव्हा एक नवा विचार गोव्यात जन्माला आला. हा विचार फक्त एका कार्यक्रमापुरता मर्यादित नसून सामाजिक जागृतीची पायाभरणी होती. यंदा मडगावमध्ये आयोजित यात्रा ही त्या संकल्पनेची परिपक्व आणि अधिक व्यापक आवृत्ती ठरली.

आदिवासी कल्याण संचालनालयामार्फत १५०व्या जयंतीचे भव्य आयोजन करण्यामागे रमेश तवडकर यांच्या सूक्ष्म नियोजनाचा आणि संघटनक्षमतेचा ठसा स्पष्ट जाणवत होता. त्यांच्या अनुभवाचे, त्यांच्याकडे असलेल्या नेतृत्वगुणांचे आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब या यात्रेच्या प्रत्येक टप्प्यात दृष्टीस आले.

भगवान बिरसा मुंडा हे एकोणीसाव्या शतकातील भारतातील सर्वात लढवय्ये आणि क्रांतिकारी आदिवासी नेते होते. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभे ठाकलेले ते केवळ एक धैर्यवान योद्धाच नव्हते तर संपूर्ण जनतेसाठी प्रेरणास्रोत होते.

त्यांचा जन्म छोटा नागपूरमध्ये झाला आणि लहान वयातच त्यांनी अन्याय, शोषण आणि दडपशाहीविरुद्ध उग्र संघर्ष सुरू केला. बिरसाजींनी ‘उलगुलान’ म्हणजेच महान बंड पुकारून आदिवासी समाजाला त्यांच्या हक्कांसाठी एकत्र आणले.

जमिनीचे रक्षण, परंपरेचे जतन आणि सामुदायिक स्वाभिमानासाठी लढताना त्यांनी स्वातंत्र्य, समानता आणि सामाजिक न्याय यांचा आवाज बुलंद केला. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे विचार जिवंत राहिले आणि आज ते भारतातील आदिवासी पुनरुत्थानाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या कार्याचा मुख्य संदेश म्हणजे अन्यायाच्या विरोधात उभे राहणे आणि समाजाला एकत्र ठेवून संघर्ष करणे. हीच बिरसाजींची विचारधारा गोव्यात नव्याने तेजाळत आहे.

भगवान बिरसा मुंडा हे मूळचे झारखंडमधील असले तरी त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा जसा व्यापक प्रचार प्रसार गोव्यात झाला, तसा भारतातील अन्य कोणत्याही राज्यात झालेला दिसत नाही.

सलग पंधरा दिवस संस्कृती खाते, क्रीडा खाते आणि आदिवासी कल्याण खात्याच्या माध्यमातून संपूर्ण गोवाभर विविध प्रकारचे जनजागृती कार्यक्रम भव्य पातळीवर आयोजित करण्यात आले. या सर्व उपक्रमांच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा दिसत होते मंत्री डॉ. रमेश तवडकर.

त्यांचे नेतृत्व, नियोजन आणि अखंड ऊर्जेमुळेच हा उत्सव एक राज्यव्यापी सांस्कृतिक जागरण बनला. ‘उलगुलान’ हा भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट विशेष प्रदर्शित करण्यात आला आणि त्यातील उल्लेखनीय बाब म्हणजे स्वतः रमेश तवडकर यांनी त्या चित्रपटात भूमिका साकारली, ज्यामुळे कार्यक्रमांना एक वेगळेच ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

त्याचबरोबर ‘धरती आभा’ हे नाटकही सादर करण्यात आले आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळाला.

परंपरा, इतिहास, संघर्ष आणि अस्मिता यांचे वेगवेगळ्या कलारूपांतून सादरीकरण होत राहिले आणि या सर्वातून गोव्याच्या जनमानसात बिरसा मुंडा यांच्या विचारांविषयी एक अभूतपूर्व उत्साह, जोश आणि आदराची लाट उसळली. या जयंती सोहळ्याने गोव्यातील सांस्कृतिक व सामाजिक चेतनेवर एक नवे तेज सोडले आणि त्यामागे सर्वाधिक प्रभावी हातभार होता तो रमेश तवडकर यांच्या प्रखर कार्याचा.

या यात्रेचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे भगवान बिरसा मुंडा हे कुठल्याही एका समाजाचे किंवा धर्माचे नेते नव्हते. ते भारताचे होते. ते मानवतेचे प्रतीक होते. या विचाराला केंद्रस्थानी ठेवून रमेश तवडकर यांनी जो मार्ग दाखवला तो गोवाभर पसरला आहे.

बिरसा मुंडा यांना कोणत्याही जातीच्या चौकटीत बंदिस्त न करता त्यांचे कार्य, त्यांचा इतिहास आणि त्यांचा संघर्ष सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास त्यांनी घेतला. या व्यापक दृष्टिकोनामुळेच गोव्यात आज बिरसाजींच्या नावाने एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.

अनेकांना ज्या नेत्याची माहिती फारशी नव्हती त्या नेत्याचे विचार घराघरांत पोहोचावेत यासाठी तवडकर यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांची ती भूमिका आज निर्णायक परिणाम घडवून आणत आहे.मडगावमध्ये दिसलेले दृश्य हे एखाद्या यात्रेचे किंवा उत्सवाचे नव्हते तर सामाजिक पुनर्जागरणाचे होते.

शेकडो युवक दुचाकींवरून येत होते, महिलांची उपस्थिती तितकीच दिमाखदार होती आणि वयोवृद्धांमध्येही एक नवचैतन्य दिसत होते. लोकांच्या चेहऱ्यांवर एकच उत्साह होता आणि तो होता विचारांचा उत्साह. ‘भगवान बिरसा मुंडा की जय’ हे केवळ नारे नव्हते ते आदराचे घोष होते.

‘भारत माता की जय’ हे केवळ घोष नव्हते तर स्वाभिमानाची घोषणा होती. या सर्व गजराच्या मध्यभागी दिसत होता तो विचार जो गेल्या दोन वर्षांत रमेश तवडकर यांनी गोव्याच्या मनात रुजवला. विचार व्यापक झाला आणि त्याचे फळ म्हणजे मडगावची ही ऐतिहासिक यात्रा.

आज भगवान बिरसा मुंडा जिवंत असते तर त्यांना अभिमान वाटला असता, की त्यांचा विचार गोव्यात इतक्या सामर्थ्याने पुढे नेणारा एक नेता आहे. समाजासाठी नि:स्वार्थीपणे कार्य करणारा, लोकांच्या समस्यांना स्वतःचे मानणारा, समाजहितासाठी कर्तव्यभावाने उभा राहणारा हा नेता म्हणजेच रमेश तवडकर!

त्यांनी बिरसा मुंडा यांच्या विचारांचा केवळ प्रचार आणि प्रसारच केला नाही, तर त्यांची विचारधारा गोव्याच्या सामाजिक चेतनेचा भाग बनवली. त्या विचाराची ज्योत आज तेजोमय झालेली आहे आणि तिचा तेजोमय शिखरबिंदू म्हणजे ही भव्य यात्रा.

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांची ज्योत गोव्यात आज जशी प्रखरपणे तेजाळत आहे, ती ज्योत विझणारी नाही. ती एका वारशाची आठवण करून देते ती एका संघर्षाची प्रेरणा देते आणि ती एका नेतृत्वाची ओळख ठरते.

या इतिहासनिर्मितीच्या प्रवासात रमेश तवडकर यांनी केलेले योगदान हे निश्चितच उल्लेखनीय आणि अनुकरणीय आहे. विचारांची वाट ज्यांनी दाखवली त्या यात्रेने आज गोव्यात एक नवीन सामाजिक आंदोलन जन्माला घातले आहे. गोव्याच्या भूमीत आज एकच आवाज घुमत आहे, ‘भगवान बिरसा मुंडा की जय’, ‘भारत माता की जय’; आणि त्या आवाजामागे उभा असलेला प्रभावी विचाराचा स्तंभ म्हणजे रमेश तवडकर!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात होणार 'WAVES फिल्म बाजार' चे उद्घाटन! 22 फीचर फिल्म; मराठी, कोकणी संस्कृतसह 18 हून अधिक भाषांतील कथा होणार सादर

Goa ZP Election: कवळे जिल्हा पंचायतवर मगोपचे वर्चस्व, काँग्रेसची भूमिका अस्पष्ट; एकतर्फी लढत होण्याची दाट शक्यता

'भारतामुळेच माझ्या आईचा जीव वाचला!' शेख हसीनांच्या मुलानं पंतप्रधान मोदींचे मानले आभार; बांगलादेश सरकारवर केले गंभीर आरोप

IFFI Country Focus: इफ्फी 'कंट्री फोकस'साठी जपानची निवड, कोणत्या खास फिल्म्स असणार; पहा..

International Mens Day: मुलाने विचारले 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा स्त्री दिनाप्रमाणे लोकप्रिय का नाही?’ तेंव्हा वडील म्हणाले.....

SCROLL FOR NEXT