Mahatma Jyotirao Phule Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Mahatma Jyotirao Phule: 1869 साली छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला गेला; समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा फुले

Mahatma Phule: महात्मा फुले हे तर समाजक्रांतीचे अग्रदूत होते. मुख्य म्हणजे केवळ शूद्र-अतिशूद्रांच्या मुलींनीच नव्हे तर सवर्णाच्या मुलींनीही शिक्षण घ्यावे यासाठी ते सावित्रीबाई फुले यांच्यासह प्रयत्नशील राहिले.

गोमन्तक डिजिटल टीम

शंभू भाऊ बांदेकर

समाजप्रबोधनाचे असिधाराव्रत वाणी व लेखणीने अनेक महापुरुषांनी अंगीकारले. हे तन, मन, धनाने करताना त्यांना शिव्याशापही खावे लागले. पण त्याकडे दुर्लक्ष करून, ’की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने । जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे॥ या वृत्तीने जे जीवनाच्या अखेरपर्यंत कार्यरत राहिले, यामध्ये विशेषत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख आणि महात्मा जोतिबा फुले यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल!

महात्मा ज्योतीराव फुले हे तर या क्रांतिकारी समाजकार्याचे अग्रदूत होते. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जावे म्हणून त्यांनी आपली धर्मपत्नी वंदनीय सावित्रीबाई फुले यांनाही या कामात पूर्णपणे सक्रिय ठेवले.

मुलींना शाळेत पाठवताना पालकांची कुचेष्टा करणारा आणि ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हसी’ म्हणजेच स्त्रीला कोणतेच स्वातंत्र्य, मोकळीक असता कामा नये, असं म्हणणाऱ्या सनातन समाजाच्या विरोधात त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना सर्व धर्माच्या मुलींना शिक्षणाचे धडे देण्याचे काम सोपवले.

आज आपल्या देशातील अडीच ते तीन कोटी महिला विविध औद्योगिक आस्थापनात वेगवेगळ्या स्तरावर आत्मविश्‍वासाने कार्यरत आहेत. राज्यातील आणि देशातील विविध सरकारी खात्यामध्ये महत्त्वाची पदे भूषवीत आहेत. देशातील राजकारणात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सभापतीपासून विविध राज्यातील मुख्यमंत्रिपदापासून यशस्वी भूमिका बजावीत राहिल्या आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले हे तर समाजक्रांतीचे अग्रदूत होते. मुख्य म्हणजे केवळ शूद्र-अतिशूद्रांच्या मुलींनीच नव्हे तर सवर्णाच्या मुलींनीही शिक्षण घ्यावे यासाठी ते सावित्रीबाई फुले यांच्यासह प्रयत्नशील राहिले.

त्या उभयतांनी ज्या पुणे शहरात जिथे सवर्णाचे वर्चस्व होते, अशा ठिकाणी राहून निंदा-नालस्ती आणि छळवणूक सहन करून हाती घेतलेल्या कार्यास जुंपून घेतले. याचा चांगला परिणाम झाला. तो असा की महार, मांग, धनगरापासून मराठा आणि ब्राह्मणांच्या मुली आणि मुलेही शाळेत जाऊ लागली व अल्पावधीत पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात तब्बल अठरा शाळांची निर्मिती झाली.

त्यानंतर आपल्या अनुभवनिष्ठ बुद्धिमत्तेच्या आाधारावर फुले यांनी लेखनकार्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या साहित्यनिर्मितीचा प्रारंभ १४५५साली ‘तृतीयरत्न’ नावाचे नाटक लिहून केला.

या नाटकातील गृहिणी कुणबी स्त्री व तिा नवरा देवाधार्मिक भोंदूगिरीचे बळी आहेत. एक ख्रिस्ती धर्मोपदेशक या दैवाधीन भोळ्या जीवांना धार्मिक तावडीतून बाहेर काढून विद्येच्या विश्‍वात नेऊन सोडणारा देवदूत आहे.

तर या दोन दुबळ्या जीवांना जास्तीत जास्त धार्मिक कार्यात गुंतवून त्याच्याकडून कसा जास्तीत जास्त कसा फायदा करून घ्यावा या विचारात मात्र असलेले जोशीबुवा व त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी असा इरसाल नमुना या नाटकात दाखवल आहे.

महात्मा फुलेंचे एकूण साहित्य हा एक स्वतंत्र विषय आहे. पण थोडक्यात त्याबाबत सांगायचे म्हणजे त्यांनी १८६९साली छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला व लोकहितार्थ आपण या पोवाड्याची रचना केल्याचे सांगितले.

तसेच याच साली त्यांनी ‘ब्राह्मणांचे कसब’ हा नऊ खंडात्मक पद्मग्रंथ लिहिला. आपल्या ‘गुलामगिरी’ ग्रंथाच्या निर्मितीबाबत ते म्हणतात सहज नैसर्गिक जीवनात जगावर बंधने; मग ती माणसाची माणसावर किंवा इतर कुणाची कुणावरही असोत, त्याचे दुसरे नाव हे गुलामगिरी आहे. त्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ १८८२साली लिहिला.

आजही शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला व त्यांच्या दैन्यावस्थेला सोदाहरण शब्दबद्ध करणारा हा ग्रंथ आजही वाचनीय व अभ्यासनीय आहे. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा ग्रंथ फुलंनी १८८५च्या आसपास लिहिला. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा त्यांचा शेवटचा ग्रंथ. याशिवाय त्यांनी काव्यरचना केल्या व अभंगात्मक पुस्तकांची निर्मितीही त्यांनी केली. त्यांच्या वाणीप्रमाणेच त्यांची लेखणीही क्रांतिकारी समाजसुधारकाचीच होती.

ते सत्यधर्माचे संस्थापक होते. शिवाय ते सत्यशोधक पत्रकारितेचे अद्यजनक गणले जातात. यातूनच दीन दलितावर होणारे जुलूम, जबरदस्ती, अत्याचार या साऱ्यांविरुद्ध वाणीबरोबरच लेखणी चालवण्यास पुढाकार घेणारी मातब्बर मंडळी तयार झाली.

त्यांच्या एकीतून मग सामाजिक बांधीलकी व सामाजिक समतेचे भान ठेवून माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे, यासाठी शांततेने अहिंसक मार्गाने पुष्कळ संघर्ष करणारी पिढी कार्यरत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Fishing: 'बोट्स माझ्या नावावर नाहीत!' आमदार नाईक आक्रमक, सीझ ट्रॉलर्सच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, ''माफी मागा!''

IND VS SA Head to Head: 94 एकदिवसीय सामने... भारत- आफ्रिकामध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेडमध्ये कोणाची आकडेवारी भारी?

Goa Live News: भाजप उमेदवारांची यादी लवकरच! मगोप सोबत जागावाटपावर चर्चा सुरू: दामू नाईक

Panaji Air Quality: धोक्याची घंटा! राजधानीची हवा झाली 'असुरक्षित'; नोव्हेंबर महिन्यात पणजीचा AQI 176 वर

अग्रलेख: मठ सर्व समाज एकीकरणाचे प्रतीक आहे, हाच संदेश श्रीरामाची भव्य मूर्ती देईल; सांस्कृतिक पुनरुत्थानाची पुरोमागी दिशा

SCROLL FOR NEXT