Surashree Kesarbai Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Kesarbai Kerkar: अंतरिक्षात आवाज पोहोचलेल्या, पं.भीमसेन जोशींनी गौरवलेल्या सुरश्री केसरबाई; संगीत समारोह पुन्हा कधी?

Kesarbai Kerkar Goa: सुरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह पैशांच्या चणचणीमुळे काही वर्षे बंद आहे. केसरबाई केरकरांची खुद्द गोव्यातच हेळसांड होणे हे अप्रशंसनीय आहे.

Sameer Panditrao

शंभू भाऊ बांदेकर

‘गोमन्तक’च्या १६ फेब्रुवारीच्या अंकात विकास कांदोळकर यांचा ‘गायन कला’ या शीर्षकाखाली जो लेख प्रसिद्ध झाला आहे त्यात त्यांनी गेली कित्येक वर्षे गोव्यात चालू असलेला सुरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह पैशांच्या चणचणीमुळे काही वर्षे बंद असल्याची खंत प्रकट केली आहे आणि ती सार्थ आहे.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी १९३८साली आदरणीय केसरबाई केरकर यांना सुरश्री किताब देऊन त्यांच्या अप्रतिम गायकीचे कौतुक केले होते, हे लक्षात घेतले पाहिजे. गायकांत जसा पं. भीमसेन जोशी यांचा आवाज, तसा गायिकांमध्ये केसरबाईंचा आवाज असे सांगीत क्षेत्रातील जाणकार म्हणतात, हेही आपण विसरता कामा नये.

केसरबाईंबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे माननीय अब्दुल करीम खाँ साहेब कोल्हापूरला असताना केसरबाईंचे नातलग तिला कोल्हापूरला घेऊन गेले होते. खाँ साहेबांकडून त्यांना फक्त दहा महिन्यांची शिकवणी मिळाली त्यात त्यांनी तिच्याकडून स्वरालंकार करून घेतले.

‘बना सारी रैन’ व आणखी एक दोन चिजाही शिकवल्या. लामगाव व बांदोडे येथे ग्वाल्हेर घराण्याचे पं. रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे सुमारे तीन वर्षे त्रुटित स्वरूपाचे शिक्षण घेतले. मग करीत करीत संगीत क्षेत्रात रियाज करत त्यांनी आपले नाव अजरामर केले. १९७७ साली व्हॉयेजर-१ या अंतराळयानात मानवी संस्कृतीचे द्योतक म्हणून जगभरातील संगीताचे नमुने सुवर्णांकित ताम्रध्वनिमुद्रिकेच्या स्वरूपात जतन करण्यात आले.

रॉबर्ट ब्राउन या संगीतशास्त्रज्ञाने भारतीय संगीताचे प्रतिनिधित्व करणारे संगीत म्हणून केसरबाईंनी गायलेल्या भैरवीतील ‘जात कहां हो अकेली गोरी जाने न पइयो, केसर रंग के माठ भरे होये होली खेलत कान्हा रे’ या ठुमरीच्या ध्वनिमुद्रणाचा समावेश या अंतराळयानातील मुद्रिकेसाठी केला. केसरबाईंचे गायन अंतरिक्षातही पोहोचले.

११ मार्च २००० रोजी कलकत्यामध्ये किराणा गायकीचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास पं. भीमसेन जोशी आणि गुरुबंधू पं. फिरोज दस्तूर उपस्थित होते. यावेळी पं. भीमसेन जोशी यांना एक प्रश्न केला गेला.

तेव्हा पंडितजी म्हणाले, ‘खरे तर गवय्याने गावं भाषण देऊ नये. पण प्रश्न केला आहे, म्हणून सांगतो, माझ्या गायकीवर कुणाचा प्रभाव आहे असा सवाल टाकण्यात आला आहे. त्यावर मी नम्रपणे सांगू इच्छितो की माझ्या गायनावर उस्ताद अमीर खाँ आणि केसरबाई यांचा परिणाम झाला आहे. पण लक्षात ठेवा मी तो मुद्दाम करून घेतलेला नाही, हे आपोआप माझ्या गळी उतरलं, पण मी एक अवधान राखलं त्यांना आमच्या किराणा घराण्याच्या मुशीत उतरवून मगच प्रस्तुत केलं’.

अशा केसरबाई केरकरांची खुद्द गोव्यातच हेळसांड होणे हे अप्रशंसनीय आहे. गोव्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सुरश्री केसरबाई केरकर संगीत समारोहाचा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून मंजूर करून घ्यावा आणि गोव्याच्या संगीत क्षेत्राचा मान राखावा ही नम्र सूचना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

SCROLL FOR NEXT