Dharmanand Kosambi Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Dharmanand Kosambi: फळाची चिंता न करता कर्म करत राहा! धर्मानंद कोसंबींच्या जीवनातून मिळतो ज्ञानसाधनेचा अनमोल धडा

Acharya Dharmanand Kosambi Life Story: वरवर साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टींचा मुलांच्या मनावर कळतनकळत परिणाम होत असे. तो त्यांचा त्या कालावधीत संस्कार बनत असे.

गोमंतक ऑनलाईन टीम

स्नेहा महांबरे

वरवर साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टींचा मुलांच्या मनावर कळतनकळत परिणाम होत असे. तो त्यांचा त्या कालावधीत संस्कार बनत असे. मग ती वस्तू असो की खाऊ असं साऱ्यात विभागले जायचे. यामुळे निरपेक्षपणे देणे आणि घेणे असे संस्कारही मुलांच्या मनावर बिंबवले जात असे. अशा पद्धतीने भगवद्गगीतेतीला ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन . . . सङ्गोsस्त्वकर्मणि..’ ही साक्षात भगवंतांची उक्ती सहजपणे मनात उतरली जात होती.

झं तेच खरं s s’ खरं पाहू जाता ही अतिशय वाईट सवय आहे, आणि ती माणसालाच लवकर जडते! याचे कारण त्याच्या मनात असणारी स्वामित्वाची उपजत सुप्त भावना! उपजत म्हणण्याचे कारण एवढेच की, मूल जसजसे मोठे होऊ लागते, त्यावेळी त्याच्या अवतीभवती असणारी नातलग माणसे आपल्या अस्तित्वाची त्याला ओळख करून देत असताना मम्मा म्हण, आई म्हण, बाबा म्हण, पप्पा म्हण यासोबतच ‘बाबू’ अथवा ‘बाय’ कोणाचे? तर स्वतः कडे हात दाखवत ‘माझा’ असा एक नकळतपणे एक संदेश अथवा विचार त्याच्या मनावर बिंबवत असतात, ठसवत असतात. आणि तेथूनच ‘मी आणि माझे’ ही स्वार्थी भावना अगदी तान्ह्या वयापासून मनात पाळेमुळे घट्ट होऊ लागतात

मातीच्या ओल्या गोळ्याला जसा आपण आकार देऊ तसतसे त्याचे भांडे-मडके घडत जाते. तोच न्याय येथेही लागू होतो! मूल लहान असल्यापासून त्याला वाढवताना त्याच्यावर केले जाणारे संस्कार या नियमालाही लागू पडतात. काही वर्षांपूर्वी गोव्यातच नव्हे तर भारतभर एकत्र कुटुंब पद्धती होती. याचा मोठ्ठा फायदा त्यावेळी घरात असणाऱ्या वडीलधाऱ्या कडून घरातील मुलांवर ‘मी’ च्या ऐवजी ‘आम्ही’, ‘आमचे’ असे शब्द कानावर पडत असत. घरात आलेल्या पाहुण्याने आणलेला खाऊ सुद्धा वाटून खाणे आणि शक्य असेल तर शेजारच्या घरात मुलांकडून पोहोचवणे, त्यांच्या कडून आलेल्या ताटलीत आपल्या घरातील जिन्नस पाठवणे.

अशा वरवर साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टींचा मुलांच्या मनावर कळतनकळत परिणाम होत असे. तो त्यांचा त्या कालावधीत संस्कार बनत असे. मग ती वस्तू असो की खाऊ असं साऱ्यात विभागले जायचे. यामुळे निरपेक्षपणे देणे आणि घेणे असे संस्कारही मुलांच्या मनावर बिंबवले जात असे. अशा पद्धतीने भगवद्गगीतेतीला ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन . . . सङ्गोsस्त्वकर्मणि..’ ही साक्षात भगवंतांची उक्ती सहजपणे मनात उतरली जात होती. ‘खाउजा’ धोरणापूर्वीपासून काळ बदलला, तसेच शिक्षणाच्या जोडीने विचार बदलले. काळाची गरज म्हणा किंवा अर्थार्जन म्हणून नोकरी, व्यवसायासाठी घरदार, गाव, नातेवाईक यांच्यापासून गाव सोडून स्थलांतरे झाली. व्यक्ती एकमेकांपासून दुरावल्या जाऊ लागल्या आणि त्यामधूनच मी आणि माझा असा काहीसा एकलकोंडा स्वभाव म्हणा किंवा स्वार्थीपणाचा विचार मनात, घरांत फोफावू लागला.

या वृत्तीचे जसे फायदे आहेत तसे अनेक तोटेही आहेत. आई-वडिलांशिवाय दुसरी कोणतीही व्यक्ती या पौगंडावस्थेतील, कुमारवयातील मुलांना माहीत नसते. कुमारवय संपवून पौगंडावस्थेत प्रवेश करतानाच एखादा मित्र किंवा मैत्रीण त्यांच्या मनात प्रवेश करते. यावेळी तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण केल्याने वृत्तीही थोडीशी बेलगाम दिसून येते. खरे तर हा त्याच्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’ असतो, पण कुणाच्या ते लक्षातही येत नाही. परिस्थितीमुळे जसे ते घडत गेले तसेच ते बिघडतही जातात. परंतु हे प्रत्येकदा घडतेच असेही नाही. प्रत्येक गोष्टीला काही अपवाद असतात यातून त्या व्यक्तीचा स्वभाव तयार होतो.

काहीसा आग्रही (खरे तर दुराग्रही), हट्टी अशा स्वरूपाचा स्वभाव त्यामधून तयार होतो. या व्यक्ती समाजात सहजपणे मिळून मिसळून राहत नाहीत, कोणाचे ऐकूनही घेत नाहीत. आपणच कोणीतरी आहोत हे सतत सांगण्याचा, दाखवण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. याचाच एक भाग म्हणून दुसऱ्याचे ऐकून न घेता आपले मत (अर्थात नसलेले) पुढे दामटण्याचा, लादण्याचा ते प्रयत्न करीत राहतात. मागील आठवड्यात नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात आलेल्या आस्मानी संकटामुळे अनेक भ्रमंतीकार /पर्यटक तेथे अडकले आहेत. अचानक आलेल्या महापुराने अनेक घरांत, अनेक गावांत हाःहाकार उडाला आहे. ही वास्तवता मन भयचकित करते. दु:खी आणि उदास बनवते.

अशावेळी एका शतकापूर्वी गोव्यातील आचार्य धर्मानंद कोसंबींची अचानक आठवण आली. त्याकाळी संस्कृत शिकण्यासाठी म्हणून ते खास पुण्याला गेले होते. तेथे बौद्ध धर्माविषयी त्यांना आकर्षण निर्माण झाले. आणि बौद्ध धर्माचे मूळ ग्रंथ ज्ञान समजण्यासाठी पाली भाषेचा अभ्यास आवश्यक होता. ती शिकण्यासाठी तरूण धर्मानंदाने अनवाणी पायी श्रीलंकेचा प्रवास केला. पाली भाषेवर प्रभुत्व मिळवले. त्यानंतर भिक्खू बनले आणि ते नेपाळला गेले. त्या दिवसात कोणतेही दळणवळणाचे वाहन, साधन नव्हते. त्या काळात धर्मानंदाच्या रुपाने गोमंतकीयांच्या मनात असणारी लहानपणापासून वाचनाची तळमळ, शिक्षणाविषयीची मनस्वी आवड होती. ‘बुद्ध चरित्र’ वाचून प्रभावित झाल्यामुळे २२ व्या वर्षी त्यांनी गोवा सोडला. मुंबई, पुणे येथे प्रार्थना समाजात राहून शिक्षण पूर्ण करून पुढे दीड वर्ष काशीला जाऊन संस्कृतचा अभ्यास केला.

तरीही त्यांना बौद्ध धर्माविषयी आणि पाली भाषेविषयीचे मनात असणारे कुतूहल त्यांना स्वस्थ बसू देईना, यासाठी नेपाळ आणि श्रीलंकेतील विद्यापीठात आणि त्यानंतर चक्क ब्रह्मदेशातील म्यानमार येथे जाऊन बौद्ध धर्म आणि पालीभाषा यांचा सखोल अभ्यास केला. त्या काळात पाली ही सामान्य माणसाची भाषा होती, म्हणूनच गौतम बुद्धाने पालीचा वापर केला. बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान आणि विचार जगासमोर आणले, हे लक्षात घेऊन धर्मानंदांनी भिक्खूची दीक्षा घेतली. श्रीलंकेत बौद्ध भिक्खू म्हणून वास्तव्य करून पाली भाषा शिकून तेथून ते सरळ ब्रह्मदेशातील येथे एका गुहेत भिक्खू म्हणून राहून साधना केली.

१८९९ सालात त्यांनी श्रीलंकेपासून उत्तर भारत, नेपाळ आणि त्यानंतर सिक्कीम असा पायी प्रवास केला होता. आणि या आधुनिक ऋषीने तपश्चर्येने पाली भाषेवर प्रभुत्व मिळवले. आणि जे माहित नाही ते जाणून घेण्यासाठी त्यांची अविरत धडपड सहजपणे आपल्या लक्षात येते. बौद्ध धर्म हा त्या काळात भारतातून जवळपास नष्ट झाला होता अशी परिस्थिती असताना त्यांनी दळणवळणाची साधने नसताना बौद्ध धर्माचे मूळ साहित्य त्याकाळच्या हिंदुस्थानात आणले. संस्कृत आणि पाली भाषेचा अभ्यास करून आचार्य कोसंबी थांबले नाहीत. त्यांचे ज्ञान पाहून त्यांना हार्वर्ड विद्यापीठ अमेरिकेत १९१०-१२ आणि १९१८-२२ या काळात तेथे इंडिकचे असिस्टंट म्हणून काम केले. आणि तेथेच राहून त्यांनी बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ विशुद्धी मग आवृत्ती संपादित केली जी आजही हार्वर्ड ओरिएंटल सिरीज व्हॉल्युम ४१ मधून गोल्ड स्टॅंडर्ड मानली गेली आहे.

. या परदेशाबरोबरच त्यांनी कोलकत्ता विद्यापीठ, बडोदा, लेनिनग्राड रशिया येथेही महत्त्वाचे कार्य केले. त्या काळात बहुभाषा कोविद असलेल्या कोसंबी यांनी मात्र मुद्दाम मराठीत लिहिणं पसंत केलं. याचं कारण होतं महाराष्ट्रातील लोकांना खरा बुद्ध कळावा. त्यांनी बौद्ध नीती, गांधीजींचं सत्य-अहिंसा तत्वज्ञान आणि त्याच्या जोडीने समाजवाद या तीन विचारांचा संगम स्वतः घातला होता . गांधीजींशी त्यांचा पत्रव्यवहार होता आणि ते सेवाग्राम आश्रमात राहिलेले होते. या साऱ्यांचा परिणाम ४ जून १९४७ मध्ये त्यांनी बौद्ध परंपरेप्रमाणे स्वेच्छा उपोषण पद्धतीने (सल्लेखना) सेवाग्राम, वर्धा येथे देहत्याग केला.

प्राप्त भाषा व धर्मज्ञानाने केवळ पुस्तकाच्या जोरावर त्यांनी एकट्यानेच विसाव्या शतकात भारतात बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन केलं. अशा पहाडी कामात अकर्मण्यतेला नकार देणे आवश्यक असते. फळ मिळणार नाही, म्हणून माणसाने काम करणे कधीही सोडता नये. आळशी बनून ज्ञान पिपासू वृत्ती सोडता नये. उलट ज्ञानार्जनासाठी भटकंती अशा सारखा संदेश धर्मांधांच्या अविरत भटकंती मधून आपणास मिळतो. आजचे पर्यटन हे असे बहुआयामी असणे आवश्यक आहे. कर्म करीत जावे पण परिणामाची काळजी न करता निष्ठेने करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT