Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

Damu Naik Birthday Resolution: ‘‘२०२७ मध्‍ये ३० आमदार निवडून आणत राज्‍यात सलग चौथ्‍यांदा भाजपचे सरकार स्‍थापन करण्‍याचा संकल्‍प आपण यंदाच्‍या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे’’.
Damu Naik Birthday Resolution
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘‘२०२७ मध्‍ये ३० आमदार निवडून आणत राज्‍यात सलग चौथ्‍यांदा भाजपचे सरकार स्‍थापन करण्‍याचा संकल्‍प आपण यंदाच्‍या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे’’, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

दामू नाईक रविवारी वयाची ५५ वर्षे पूर्ण करीत आहेत. राज्‍यभरातील भाजप कार्यकर्त्यांनी आपापले बुथ, मतदारसंघांत त्‍यांच्‍या वाढदिवसाची जय्‍यत तयारी सुरू केली. या पार्श्वभूमीवर बोलताना, ‘‘प्रदेश भाजपचे अध्‍यक्षपद ही मोठी जबाबदारी असते. त्‍यानुसार गेल्‍या दीड वर्षापासून आपण आपल्‍याला पक्षाने देण्‍यात आलेल्‍या जबाबदारीला योग्‍य पद्धतीने न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे.

Damu Naik Birthday Resolution
Goa Ujjwala Scheme: गोमंतकीयांसाठी खुशखबर! गुरुवारपर्यंत सिलिंडरचे पैसे खात्यात; 2.50 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

प्रदेश भाजपकडे संघटनमंत्री, प्रभारी नसतानाही जुन्‍या कार्यकर्त्यांना पक्षात परत आणताना आणि नव्‍यांना मिसळून घेताना जी आव्‍हाने येतात, त्‍या आव्‍हानांना समर्थपणे सामोरा जात आहे. यात मी निवडलेली प्रदेश भाजपची टीम पूर्णपणे सहकार्य करीत आहे. त्‍यांच्‍याशी सल्लामसलत करूनच निर्णय घेतले जात आहेत. त्‍यामुळे आवश्‍‍यक ते सहकार्य करण्‍यास ते उभे राहतात’’, असे नाईक यांनी सांगितले.

संघाच्‍या शिस्तीचा मोठा फायदा

‘‘मी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघातून आलेला असल्‍याने भाजप पक्ष संघटनेत काम करीत असताना संघाच्‍या शिस्तीचा आपणास मोठा फायदा मिळाला. गेल्‍या ३२ वर्षांच्‍या राजकीय प्रवासात त्‍याच शिस्‍तीने पक्षाचे काम केले. पक्षाला अधिकाधिक बळकटी देण्‍याचे प्रयत्‍न केले. त्‍याचेच फळ म्‍हणून पक्षाने आपल्‍यावर प्रदेशाध्‍यक्षपदाची जबाबदारी दिली’’, असेही दामू नाईक यांनी नमूद केले.

Damu Naik Birthday Resolution
Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com