Kapileshwari Village Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Kapileshwari: सफर गोव्याची! देवकृपेने समृद्ध असलेले, छोटेसे गाव 'कपिलेश्वरी'

Kapileshwari Village Goa: कपिलेश्वरी हे छोटेसे गाव असले, तरी देवकृपेने समृद्ध आहे. देवळासमोरील शांत तलाव परिसराला प्रसन्नता देतो. मंदिरात गर्दी कमी असल्याने श्री कपिलेश्वर जणू मंद प्रकाशात ध्यानस्थ भासतात.

गोमन्तक डिजिटल टीम

शाळेत जातानाही आम्ही बहिणी दप्तर खांद्यावर घेऊन पायीच जात असू. त्यात कधी कमीपणा वाटला नाही. आजची मुले स्कूटरवरून शाळेत जाताना दिसली की, त्यांचे भाग्य पाहून आश्चर्य वाटते. कपिलेश्वरी हे छोटेसे गाव असले, तरी देवकृपेने समृद्ध आहे. देवळासमोरील शांत तलाव परिसराला प्रसन्नता देतो. मंदिरात गर्दी कमी असल्याने श्री कपिलेश्वर जणू मंद प्रकाशात ध्यानस्थ भासतात.

लहानपणी मंदिराच्या मंडपात खेळणे, तर कधी तिथेच अभ्यास करणे. या आठवणी आजही जिवंत आहेत. या गावचे लोकही या मातीसारखेच. साधे, कष्टाळू आणि समाधानी. ‘पोटापुरता पैसा मिळाला की झाले’ ही त्यांची जीवनदृष्टी. श्री देव कपिलेश्वर यांच्या आशीर्वादाने काही कमी पडणार नाही, ही अढळ श्रद्धा. आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ.

घर कायम गजबजलेले. घरासमोर झाडांनी नटलेले अंगण, तुळस आणि देवासाठी फुलांची रोपे. जास्वंद, पारिजात, सदाफुली. फुले गोळा करण्याची धावपळ, बाबांना देण्यात मिळणारा आनंद. त्या आठवणी आजही मनात गोड आहेत. गावात चौथीपर्यंत शाळा होती. पुढील शिक्षणासाठी कवळे आणि नंतर फोंड्याला जावे लागे.

आता मात्र गावाजवळच मोठमोठी शैक्षणिक संकुले उभी राहत आहेत. गावचा मुख्य उत्सव म्हणजे कपिलेश्वर देवाची जत्रा. त्या वेळी लग्न होऊन गेलेल्या मुली आवर्जून येतात. पालख्या, रथ आणि दुकानांनी भरलेला परिसर. गर्दीतून देवदर्शन घेणे ही एक वेगळी अनुभूती असते. लहानपणी आम्ही घरातील फुलपाखरे.

सतत इकडून तिकडे उड्या मारणारी. आईला दिलेला त्रास आता उमगतो. गावातील लोक आम्हाला जपणारे.कुठेही दिसलो की प्रेमाने घरी पाठवणारे. आज त्या घरात आई-वडील नाहीत; पण या मातीची ओढ कायम आहे. म्हणूनच गावात गेल्यावर प्रथम श्री देव कपिलेश्वरांचे दर्शन घेणे—हेच माझ्यासाठी खरे ‘घरी येणे’ आहे.

प्रियंका भारत चव्हाण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा भीषण पुराचा तडाखा! बूढी गंडकी नदीने घरे, पूल आणि बेस कॅम्प वाहून नेले, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Goa Politics: गोव्यात विरोधी ऐक्याचा फज्जा! आघाड्यांची खिचडी, पक्षफुटीची भीती अन् नेत्यांची विश्वासार्हता पणाला

संपादकीय: इन्स्टाग्रामवर हरलेले सत्ताधीश

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? एरियर मिळणार की नाही? पगारवाढीबाबतचे सर्व प्रश्न आणि उत्तरे एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT