Jantar Mantar Student Protest Dainik Goantak
गोंयकाराचें मत

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Power Of Nonviolent Protest: उग्र आंदोलन असेल, तर मात्र त्वरित निकाल लागतो. हे तंत्र समजल्यामुळेच उग्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जातो.

दैनिक गोमन्तक डिजिटल

जयराम रेडकर

उग्र आंदोलन असेल, तर मात्र त्वरित निकाल लागतो. हे तंत्र समजल्यामुळेच उग्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जातो. आजच्या पिढीला गांधी मार्गाने जाऊन काही उपयोग होत नाही, असे वाटत असते आणि त्यांना झटपट निर्णय हवा असतो. परंतु कॉकरोच जनता पार्टीने दाखवून दिले, की अहिंसेच्या मार्गानेही आंदोलन यशस्वी करता येते.

लहान मुलांच्या मनोरंजनासाठी जादूगार जादूचे प्रयोग करून दाखवतो. ‘जंतर मंतर छू: मंतर’ करून तो कधी मुठीतून वस्तू काढून दाखवतो, तर कधी पक्ष्याचे पिल्लू ! ती एक हातचलाखी असते. मनोरंजन एवढीच त्याची मर्यादा असते. प्रत्यक्ष जीवनात ‘जंतर मंतर छूः’ करून काहीही मिळत नाही. गेल्या आठवड्यात दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी केलेले अभूतपूर्व आंदोलन यशस्वी तर झालेच परंतु त्याच बरोबर लोकशाहीचा नवा अध्याय सुरू झाला.

यात एका मंत्र्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ‘जंतर मंतर छू: मंतर’ झाले. कोणताही शासक जेव्हा जेव्हा स्वतःला सर्वशक्तिमान समजतो आणि आम जनतेला कस्पटासमान लेखतो, तेव्हा तेव्हा त्याच्या विरोधात वातावरण निर्माण होते आणि जनता पेटून उठते, अशावेळी राज्यकर्त्याला नमावे लागते. आपल्या शेजारील देशातही राज्यकर्त्यांच्या विरोधात उग्र आंदोलने झाली आणि तिथल्या नेत्यांना पळता भुई थोडी झाली.

त्या मानाने इथले आंदोलन हाताबाहेर गेले नाही आणि कोणताही अनुचित प्रकार मुलांकडून घडला नाही. मात्र पोलिस दल आणि सुरक्षा दल यांच्याकडून लाठीमार आणि अश्रुधूर सोडला गेला हे योग्य झाले नाही. कारण शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या अनेक मुलांना यात गंभीर इजा पोहोचली. याचे पडसाद देशभर उमटले आणि सरकार विरोधात वातावरण तयार झाले. विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले.

संसद सत्राचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले. उपोषणाला बसलेल्या सोनम वांगच्यूक यांना चुकीच्या पद्धतीने आणि अपमानास्पद प्रकारे उचलून नेण्यात आले, यामुळे आंदोलक तरुण चिडले पण त्यांनी आपले आंदोलन गांधी मार्गाने सुरू ठेवले, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. १९३० साली झालेला मिठाचा सत्याग्रह किंवा १९४२ साली झालेली चलेजाव ही निःशस्त्र व अहिंसक चळवळ माझ्या पिढीने पाहिली नव्हती.

अहिंसक मार्गाने आंदोलन कसे करता येते, याचा वस्तुपाठ म्हणजे गांधीजी यांनी दाखविलेला मार्ग होय. हाच मार्ग कॉकरोच जनता पार्टीने स्वीकारला आणि आपला लढा यशस्वी करून दाखवला. पोलीस लाठ्या चालवत होते, अश्रू धुराच्या नळकांडया फोडीत होते पण ही तरुण मुले मागे हटली नाहीत. एक तरुण तर पोलिसांचा लाठीमार खात असताना मारा, आणखी मारा किंवा गोळी घाला आणि एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावा, असे आव्हान समोरच्या पोलिसांना देत होता.

एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लाठी हल्ल्याचा आणि तिचे कपडे फाडल्याचा तीव्र निषेध सर्व थरातून झाला. टीव्हीवरील दिसणारी मारहाणीची दृश्ये मन हेलावणारी होती. जे पोलिस किंवा बिनावर्दीतील जवान मुलांना मारहाण करीत होती, ते पाहून मनात प्रश्न निर्माण होत होता, की यांच्या घरी मुलीबाळी आणि बहीण-भाऊ नसतील का? नोकरी शाबूत ठेवण्यासाठी ते असे टोकाचे पाऊल उचलत असावेत, असे वाटते.

१९८५-८६ साली कोकणी भाषेसाठी इथल्या कलाकार, कोंकणी लेखक आणि विद्यार्थी यांनी आवाज उठवला होता आणि सरकारला ही मागणी पूर्ण करावी लागली होती. त्याच प्रमाणे एका बलिष्ठ राजकीय नेत्याच्या विरोधात तरुणांनी प्रखर आंदोलन उभारले होते आणि त्या नेत्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. जंतरमंतर वरील आंदोलन आणि गोव्यातील आंदोलने यात फरक असा होता की जंतर-मंतर वरील आंदोलन अहिंसावादी होते आणि ते एकाच ठिकाणी होते.

गोव्यात झालेली आंदोलने हिंसक होती. अनेक ठिकाणी रस्ते अडथळे निर्माण करून वाहतूक अडवली होती. सरकारी मालमत्तेची नासधूस करण्यात आली होती आणि गावागावातून हे आंदोलन पेटवले होते. आंदोलन आपल्या न्याय्य मागणीसाठी होते, पण मार्ग भिन्न होते. शांतीपूर्ण आणि अहिंसक मार्गाने केलेल्या आंदोलनाला सरकार प्रारंभी दुर्लक्षित करते आणि अखेरच्या क्षणी दंडेलशाही मार्गाने ते मोडून काढण्याचा प्रयत्न करते.

उग्र आंदोलन असेल, तर मात्र त्वरित निकाल लागतो. हे तंत्र समजल्यामुळेच उग्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जातो. आजच्या पिढीला गांधी मार्गाने जाऊन काही उपयोग होत नाही, असे वाटत असते. परंतु कॉकरोच जनता पार्टीने दाखवून दिले, की अहिंसेच्या मार्गानेही आंदोलन यशस्वी करता येते. आंदोलनात ज्यांनी भाग घेतला होता, त्यांच्या विरोधात सरकार पक्षातील काही व्यक्ती घृणास्पद वक्तव्ये करीत आहेत, असे बातमी पत्रातून किंवा समाजामाध्यमावर प्रसारित होणाऱ्या दृश्यांवरून दिसते.

एका मंत्र्याला आंदोलकांमुळे राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली हा आपल्या सरकारचा पराभव आहे, याचा तो त्रागा आहे. परंतु असेच सुडबुद्धीने सरकार वागू लागले तर मात्र सरकारची उरली सुरली पतही पणाला लागेल. म्हणूनच भडक वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना आपल्या जिभेला आवर घालावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT