Goa Drugs Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Drugs Issue: ..स्वत:चे मरण स्वत:च्या डोळ्यांनी 'गोव्याला' पाहावे लागत आहे! ड्रग्जचा विळखा

BITS Pilani student death: बिट्समधून वर्षापूर्वी ड्रग्ज व्यवहारात गुंतलेल्या एका विद्यार्थ्याला तडीपार करण्यात आले आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने सतर्कता बाळगली गेली पाहिजे होती ती काही दृष्टीस पडलेली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

मिसरूडही न फुटलेली मुले भविष्यातील आधारस्तंभ बनायच्या आधी अमली पदार्थांच्या आहारी जाऊन जीवन संपवत आहेत, हे खिन्न करणारे वास्तव आज ‘बिट्स पिलानी’पुरते मर्यादित दिसत असले तरी त्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता अधिक आहे. ‘बिट्स’मधील ऋषी नायर या २० वर्षीय मुलाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनामुळे झाला, या निष्कर्षाप्रत तपास पोहोचल्यांनतर बऱ्याच प्रश्नांवर चर्चेची गरज अधोरेखित झाली आहे.

ऋषीच्या मृतदेहाची ‘रँडॉक्स’द्वारे चाचणी केल्यानंतर तीन सिंथेटिक्स ड्रग्सचे अंश सापडले. महिन्यापूर्वी मृत्यू झालेल्या कुशाग्रच्या शव तपासणीतूनही अशीच शक्यता समोर आली होती. खापर एनर्जी ड्रिंकवर फुटले. दुर्दैवाने, पोलिस यंत्रणेचा वेळोवेळी लपवाछपवीवर भर राहिला आहे. एखाद्याचा ड्रग्ज सेवनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यास ती पोलिस यंत्रणेसाठी शरमेची बाब ठरते, अशी सल मनाला बोचत असावी.

बिट्स व्यवस्थापनानेही बोटचेपी भूमिका घेतली. नऊ महिन्यांत एका मागोमाग पाच विद्यार्थ्यांचा बळी जातो ह्यात व्यवस्थापनाचेही अपयश दिसते. बिट्समधून वर्षापूर्वी ड्रग्ज व्यवहारात गुंतलेल्या एका विद्यार्थ्याला तडीपार करण्यात आले आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने सतर्कता बाळगली गेली पाहिजे होती ती काही दृष्टीस पडलेली नाही. पिलानीच्या कॅम्पसमध्ये ड्रग्ज पोहोचतात, याची माहिती व्यवस्थापनाला नसावी, असे कसे म्हणता येईल?

‘विद्यार्थ्यांच्या आंतरिक व बाह्य हालचालींवरील बंधने’ घातल्यानेच सर्व काही साध्य होते असे नाही. स्वीगी, झोमेटॉ बॉय अमली पदार्थ पुरवठादार बनले असण्याचीच शक्यता अधिक आहे. हुशार मुलांकडून उज्ज्वल भविष्याची आशा बाळगणारे पालक; तणावाखाली येऊन अमली पदार्थ सेवनाचा मार्ग पत्करणारे विद्यार्थी हे चित्र ढासळत्या व्यवस्थेचे प्रतिबिंब आहे. यापूर्वी पेडण्यातील सनबर्नमध्येही एक परप्रांतीय युवक ड्रग्जच्या अतिसेवनाचा बळी ठरला होता.

ड्रग्जने गोव्यातील युवा पिढी पोखरायला सुरुवात केली आहे, याचे भान समाज, सरकारला येईपर्यंत ती बरबाद झालेली असेल. केवळ युवावर्गच नव्हे तर हे लोण आता शाळकरी मुलांपर्यंत पोहोचले आहे. फक्‍त त्‍याची दबक्‍या आवाजात चर्चा होते. विकत घेणारे व विकणारेही गोमंतकीयच आहेत. याबाबतीत ज्यांनी सजग असायला हवे, गांभीर्याने उपाय शोधून काढायला हवे, तेच लोकप्रतिनिधी एकमेकांवर हीन पातळीवर जाऊन ड्रग्जचा धंदा करत असल्याचे आरोप करतात.

त्यानंतरही सरकार मख्खासारखे गप्प बसते. त्यांच्यावर कारवाई सोडाच, साधी चौकशीही होत नाही. रागातून केलेले आरोप असतील, तर ते नेमके ड्रग्जविषयीच कसे असतील? भ्रष्टाचार, पैसे खाणे, कॉन्ट्रॅक्ट मर्जीतल्या लोकांना देणे वगैरे असे अन्य अनेक विषय आहेत; ते सर्व सोडून ड्रग्ज असा नेमका आरोप होतो तेव्हा प्रकरण गंभीर असते. अमर्याद, बेछुट पर्यटनाला वाव देताना कशाशी तडजोड करतोय याचे भान सरकारला उरले नाही.

हे प्रकार वर्तमानपत्रांचे मथळे बनणेही आता सामान्य बाब झाली आहे. परिस्थिती इतकी ढासळली आहे की ‘शाळकरी मुलाचा ड्रग्जच्या अतिसेवनाने मृत्यू’ हा मथळाही फार दूर नाही. गोमंतकीयांच्या हातून कधीच निसटलेला गोवा आता ड्रग्जच्या विळख्यात सापडला आहे. दररोज अधोगतीची नवनवीन पायरी गाठत चाललेला गोवा व त्याहीपेक्षा वेगाने गोठत चाललेल्या गोमंतकीयांच्या संवेदना हा खरा चिंतेचा विषय आहे.

गोव्यात असलेल्या एका विद्यामंदिरात नऊ महिन्यात पाच विद्यार्थ्यांचे बळी जात आहेत व त्याच्या प्रतिक्रियाच कुठे उमटताना दिसत नाहीत. ड्रग्जचे सेवन ही केवळ बिट्स पिलानीपुरती मर्यादित समस्या नाही, ते संपूर्ण गोव्याचेच दुखणे आहे. गोव्याची प्रतिमा जगभर इतकी मलीन झाली आहे की शिक्षणासाठी मुलांना इथे पाठवण्याआधी पालक दहावेळा विचार करतील. हे ड्रग्जमुळे मृत झालेल्या एका विद्यार्थ्याचे कलेवर पाहावे लागण्याचे केवळ हे दु:ख नाही; तर स्वत:चे मरण स्वत:च्या डोळ्यांनी गोव्याला पाहावे लागत आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनसेने सिंधुदुर्गात आयोजित केलेल्या MRF च्या नोकर भरतीवरुन गोव्यात वाद का झाला? Explained

Goa Live Updates: 'बिट्स पिलानी’ प्रकरणाचा अहवाल आला समोर; वीरेश बोरकरांचा ड्रग्ज मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल

Former Brazil President: ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, सुनावली 27 वर्षांची शिक्षा; काय आहे नेमकं प्रकरण?

WWE: रेसलमेनिया की ड्रीम मॅच? ट्रिपल एच करणार मोठी घोषणा, रॉक–सीना चाहत्यांच्या आशा शिगेला

Kawasaki Ninja ZX-10R: स्पोर्ट्स रायडर्ससाठी खास,भारतात लाँच झाली नवी कावासाकी निन्जा ZX-10R; किंमत किती? काय आहे खास? वाचा

SCROLL FOR NEXT