तेनसिंग रोद्गीगिश
पहिले भारतीय कोण, याचा शोध अंतहीन आहे, असे दिसते. आम्ही मागच्या वेळी पाहिल्याप्रमाणे, आम्ही कितीही प्रयत्न केले तरी, ‘आफ्रिकेतून बाहेर पडून भारतीय उपखंडात संपूर्णपणे विकसित झालेल्यांच्या नजीकच्या वंशजांचे’ स्पष्ट चित्र समोर आलेले दिसत नाही.
प्राचीन कोकण भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यभागी आहे; कोकणचे पहिले स्थायिक कोण होते? सध्या आपण फक्त ‘नेति, नेति’ म्हणू शकतो; ‘हे नाही, हे नाही’. पण त्यापलीकडे ते सर्व धूसर आहे. मागील काही लेखांत आपण असे म्हटले होते की कुणबी किंवा वेळीप हे बहुधा ‘आदिवासी’, व कोकणचे ‘प्रथम रहिवासी’ होते. पण नंतर आम्हांला आढळून आले की हा अन्य समाज असू शकतो ज्यांना त्यांनी आत्मसात केले किंवा नष्ट केले; उदाहरणार्थ हेमाड.
तेव्हा हेमाड कोण होते व कुणबी किंवा वेळीप कोण होते? भारतीय द्वीपकल्पात सर्वव्यापी कुर समुदाय हा बहुधा ‘आदिवासी’ व ‘प्रथम रहिवासी’ असावा या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलो, तसेच वेद समुदाय हा त्याचा पूर्ववर्ती असू शकतो हेही आपण पाहिले. पहिले आदिवासी कोण, हा आमचा शोध सुरूच आहे. खोलवर जाण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संधीचा आम्ही फायदा घेत आहोत. ‘भिल्ल’ ही अशीच एक संधी होती.
आम्ही भिल्ल आणि कुणबी एकच असावेत असा तर्क, दोघांनी वापरलेल्या काही सामान्य शब्दांवरून मांडला आहे. त्यामुळे कुर समुदाय भारतभर व्यापून असल्याचे गृहीतक दृढ होत चालले आहे. पण कनकसभाईंच्या शब्दांत सांगायचे तर, ‘हा संपूर्ण भारतभर पसरलेला वंश आहे’, असा निष्कर्ष काढण्याच्या स्थितीत असताना आम्ही भिल्लांच्या ‘पावरा’ उपसमूहावर अडखळलो.
एन्थोव्हन यांनी पावरा हा उप-गट म्हणून भिल्लांत समाविष्ट केला आहे. (संदर्भ : एंथोव्हन, १९८७ : द ट्राइब्स अँड कास्ट्स ऑफ बॉम्बे, खंड १, १७५). पण पावरा स्वत: भिल्ल असल्याचे नाकारतात आणि भिल्ल म्हणवून घ्यायला अपमान मानतात. ते स्वत:स राजपूत म्हणवतात (पालगडच्या डोंगरी किल्ल्याजवळील उदयपूरच्या सरदारांनी ज्यांना त्यांच्या घरातून हाकलून लावले होते ते) हे एवढे महत्त्वाचे नाही; ते क्षत्रिय वंशाचे असतीलही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ऑस्ट्रो-एशियाटिक किंवा मुडा वंशाचे अस्पष्ट संकेत. जरी निर्णायक नसले तरी मोहंती यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख करून तसे सूचित केले आहे. (संदर्भ : मोहंती, २०१३ : प्रोलिगोमिनोन टू द भिल्ल अँड पावरा रिलेशन्स इन वेस्ट खान्देश इन महाराष्ट्र : अ रीअसेसमेन्ट ऑफ एव्हिडन्स फॉर अॅन अर्ली सबस्ट्रॅटम)
भिल्लांची जन्मभूमी असलेल्या गुजरात, खानदेश, राजपुताना आणि मध्य भारत या प्रदेशांतील समुदायांमध्ये मुंडा वंशाचा कोणताही निर्णायक अनुवांशिक पुरावा असल्याचे दिसत नाही. पण त्यात काही मिश्रण आहे हेही नाकारता येत नाही. आत्तापर्यंत उपलब्ध पुरावे भाषिक स्रोतांवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, कुलकर्णी यांना कातकरी आणि खरिया, मुंडा उपसमूह यांच्यात भाषिक समानता आढळते.
कुलकर्णी यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या कातकऱ्यांच्या भाषणातील छप्पन पशू आणि पक्ष्यांच्या नावांचे परीक्षण केले आणि त्यांना असे आढळले की यातील अनेक शब्द झारखंड आणि ओडिशामधील डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या खारियांच्या दैनंदिन वापरातले आहेत. या निरीक्षणावरून कुलकर्णी असे गृहीत धरतात की कातकरी आणि खारिया यांचा कधीतरी जवळचा संबंध आला असावा. (संदर्भ : कुलकर्णी, १९६९ : द कातकरी पीपल अँड देअर वर्डस् फॉर बर्डस् अँड अॅनिमल्स, जर्नल ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ पूना, २३, ९९).
भारतीय उपखंडातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील प्रदेशांमध्ये परस्परसंबंध असणे निर्विवाद आहे. कदाचित याचे सर्वश्रुत उदाहरण म्हणजे ईशान्येच्या टोकाकडून उत्तर-पश्चिमेकडे झालेले किरातांचे स्थलांतर आणि वायव्येच्या टोकाकडून उत्तर पूर्वेकडे झालेले क्षत्रिय व ब्राह्मण यांचे स्थलांतर. हे केवळ हिमालय आणि विंध्य, सिंधू-ब्रह्मपुत्रेच्या मैदानातच नाही, तर विंध्येच्या दक्षिणेला आणि विंध्य ओलांडून, द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकापर्यंत सर्वत्र घडले आहे.
त्यामुळे भाषा आणि वंश यांचे मिश्रण झालेले आहे. पण हे गेल्या १०,००० वर्षांतील आहे. जेव्हा आपण ‘सबस्ट्रॅटम’ किंवा आदिवासी किंवा ‘प्रथम भारतीयां’बद्दल बोलत असतो, तेव्हा आपण ‘आफ्रिकेतून बाहेर पडून भारतीय उपखंडात संपूर्णपणे विकसित झालेल्यांच्या नजीकच्या वंशजां’बद्दल बोलत आहोत जे पूर्णपणे भारतीय उपखंडात विकसित झाले होते. ४०,००० ते ६०,००० वर्षांपूर्वीच्या काळात, भारतीय द्वीपकल्पातील मानवांच्या कमी-अधिक प्रमाणात एकसंध समुदायाची कल्पना आपण करू शकतो का? कदाचित हा समाज एकसंध नसावा.
सर्व शक्यता लक्षांत घेता, आफ्रिकेतून बाहेर पडलेले लोक विखुरले, त्यांचा अन्न आणि पाण्याचा शोध त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला. कदाचित अनुकूल हवामानाचा शोध यामुळेही ते विखुरले असावेत. सुपीक जमीन हाही एक प्रमुख मुद्दा आहे. भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण ठिकाणी स्थायिक झालेल्या मानवांमध्ये लवकरच किंवा कालांतराने अनुवांशिक फरक निश्चित झाला असावा. हा उत्क्रांतीचा इतिहास जनुकांमध्ये नोंदवला गेला आहे, यात शंका नाही; फक्त त्या नोंदी वाचणे आणि समजून घेणे आवश्यक आहे.
त्यामुळे भिल्ल आणि मुंडा यांचा समान वंश आहे असे मानणे पूर्णपणे वाजवी आहे; म्हणून खारिया आणि कुणबी; पूर्वी वेगळे होणे, सामान्य वंशाची व्याप्ती कमी, अनुवांशिक घुसखोरी जास्त. तो ‘समान वंश’ कुर किंवा वेद किंवा इतर कोणता होता, हे आपण सांगू शकत नाही. कदाचित, ते नेहमी ‘नेति, नेति’ असेल. इथेही ‘डीएनए’ महत्त्वाचा!
ज्यांना आपण तामिळ म्हणतो अशा द्रविडांचा संदर्भ घेतल्याशिवाय हा विषय पूर्ण होऊ शकत नाही. हा समुदाय कितीप्राचीन? क्षत्रिय, किरत आणि ब्राह्मणांपेक्षा जास्त प्राचीन? वेद किंवा कुर यांच्याइतका प्राचीन? याविषयी खूप मतभेद आहेत. चेन्नईजवळील अत्तिरामपक्कम येथील पुरातत्त्वकालीन स्थळापासून सुरुवात करणे रोचक ठरेल.
परंतु आमच्याकडे तामिळ वांशिकतेचा संबंध जोडण्यासाठी आणि होमो अटिरामपक्केमेन्सिस आणि तामिळ संस्कृतीच्या प्रारंभी म्हणजे सुमारे १,६०,००० वर्षांचे दीर्घ अंतर पार करण्यासाठी कोणतेही स्रोत नाहीत. दुसरे म्हणजे तामिळ ही वेद किंवा कुरमधून उत्क्रांत झाली नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणतेही निश्चित पुरावे नाहीत. ईसापूर्व ६००० ते ईसापूर्व ८०००दरम्यान तामिळांचे आगमन भारतीय उपखंडात झाल्याचे मत काही विद्वान व्यक्त करतात. ते त्यांचे मूळ पूर्वेकडे शोधतात. होय, त्यांच्या मते आपण ज्या लोकांना क्षत्रिय म्हटले आहे ते तामिळ आहेत. महादेवन यांच्या मते तामिळ हे हडप्पा संस्कृतीचे शिल्पकार होते. (संदर्भ : महादेवन, २००९ : वेस्टिजेस ऑफ इंडस सिव्हिलायझेशन इन ओल्ड तमिळ).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.