Why tourists avoid Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Tourism: 20 वर्षांपूर्वी असं न्हवतं! आधुनिकतेमागे धावताना गोव्याने पर्यटनातला Essense गमावलाय?

World Tourism Day 2025: "अतिथी देवो भव" अशी भारतीय शिकवण गोवा कायम जपत आलाय, पण काही गोष्टींमुळे गोवा आणि पर्यटनाचं चित्र बदलतंय का?, असा प्रश्न आता विचार करण्याची वेळ आली

Akshata Chhatre

पणजी: गोवा म्हटलं की पर्यटनस्थळ ही संकल्पना रूढ झालीये आणि त्यात काही गैर नाही. अनेक वर्षांपासून हा आम्हा गोमंतकीयांचा प्रमुख व्यवसाय आहे. "अतिथी देवो भव" अशी भारतीय शिकवण गोवा कायम जपत आलाय, पण काही गोष्टींमुळे गोवा आणि पर्यटनाचं चित्र बदलतंय का?, असा प्रश्न आता विचार करण्याची वेळ आली.

एक गोमंतकीय म्हणून गोव्याचं पर्यटन आणि त्याचं बदलतं स्वरूप यावर इंटरनेटवर काही पोस्ट्स वाचल्यानंतर मनात विचारचक्र सुरू झालं...

मिरामारचा हरवलेला किनारा

गोव्याच्या पर्यटनाबद्दल लोकं नेमका विचार काय करतात हे बघायला रेडिट उघडला, तर एक गोमंतकीय व्यक्त होत होता, म्हणाला, "20-25 वर्षांपूर्वी मिरामार बीच माझ्या बालपणी खूप सुंदर होता. पण आता विकासाच्या नावाखाली तो पूर्ण उद्ध्वस्त झालाय. जुन्या आठवणींना मी खूप मिस करतोय."

त्याच्या मते, 2019 नंतर त्या किनाऱ्यावरील शेवपुरी आणि भेळपुरीच्या गाड्याही गायब झाल्या, ज्यांच्या आठवणी आता फक्त एक खजिना बनून राहिल्यात. हा बदल फक्त एका किनाऱ्यापुरता मर्यादित नाही, तर असे अनुभव वाचले आणि आजूबाजूला घडणारे हे बदल पाहिले की गोव्याच्या मूळ आत्म्यालाच धक्का देतायत की काय? असं वाटतं.

लहानपणी खरंच गोव्याचे किनारे सुरक्षित आणि शांत होते. कोलवा सारख्या किनाऱ्यांवर जाताना कोणी कोणाकडे ढुंकूनही बघत नव्हतं, प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न असायचे. पण आज परिस्थिती वेगळी आहे हे खरं!

विकासाच्या नावाखाली झपाट्याने सपाट होणारे डोंगर आपल्या गोमंत भूमीला विद्रुप बनवतोय आणि त्याचा मोठा फटका पर्यटनाला बसतोय
विठ्ठल शेळके

तर हाच मुद्दा सोशल मीडियावर सुद्धा उचलला जातोय, काही पर्यटक याबद्दल बोलतात, म्हणतात, "आता अनेक किनाऱ्यांवर असुरक्षित वाटतं. पूर्वीचा मोकळेपणा आता हरवलाय". ही असुरक्षितता केवळ महिलांसाठीच नाही, तर सर्वांसाठी चिंतेचा विषय बनलीये.

महाग आणि कमी दर्जाची सेवा

एवढंच नाही, रेडिटवरील अनेक पोस्ट्समध्ये पर्यटकांनी गोव्यातील सेवेच्या दर्जावर आणि वाढलेल्या किमतींवर नाराजी व्यक्त केली. एका पर्यटकाने तर थेट गोवा आणि बाली, इंडोनेशिया यांची तुलना केली. त्याच्या मते, विमानाचा खर्च वगळता गोवा बालीपेक्षा 20-30% महाग आहे. विमानाचा खर्च धरला तरी गोवा बालीपेक्षा 20% अधिक महाग आहे आणि गोव्यातील जेवणाचा दर्जा आणि प्रमाण बालीच्या तुलनेत खूपच कमीच आहे.

एका स्थानिक गोमंतकीयाने तर स्पष्टपणे सांगितलं की, तो बंगळूरुमध्ये राहतो आणि तिथलं जीवन त्याला गोव्यापेक्षा परवडणारं वाटतं. सध्या गोव्यात रोजच्या जेवणातला मासाही खूप महाग झालाय. "मी तर गोव्यात असताना बाहेर जाणंच बंद केलंय," तो म्हणाला.

हरवलेला गोमंतकीय आणि निसर्ग

एकेकाळी पर्यटक गोव्याला इथल्या लोकांमुळे, इथल्या शांत वातावरणामुळे आणि अर्थातच इथल्या सुंदर किनाऱ्यांमुळे भेट देत होते. पण आता गोव्यात स्थानिकांची संख्या कमी होत असल्याचं जाणवतंय. रस्त्यावर वाट विचारायला थांबल्यावर, कदाचित दहापैकी नऊ वेळा भेटणारा माणूस स्थानिक असेलच याची खात्री नाही. बोलली जाणारी भाषा, वागणं आणि काही रेस्टॉरंट्समध्ये दिले जाणारे पदार्थ, यातून हे बदल स्पष्ट दिसतात.

काही पर्यटकांनी फसवणूक, मारहाण आणि धमक्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत, पण यावर प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे गुन्हा सामाजिक रचनेत अगदी खोलवर रुजल्याची अनेकांची धारणा झालीये, खास करून उत्तर गोव्यात. कॅसिनो आणि इतर गोष्टींमुळे उत्तर गोव्याचा नकारात्मक कल वाढलाय.

विकासाच्या नावाखाली माफिया राज आणि नैसर्गिक ऱ्हास

विकासाच्या नावाखाली झपाट्याने सपाट होणारे डोंगर आपल्या गोमंत भूमीला विद्रुप बनवतोय आणि त्याचा मोठा फटका पर्यटनाला बसतोय. गोव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माफिया राज वाढल्याने पर्यटनावर मोठा परिणाम होताना दिसतोय. शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून गोवा जगासमोर जायला हवा होता, पण ग्रामीण पर्यटनात सुद्धा माफिया राज फोफावल्याने इथला भूमिपुत्र मात्र उपरा होत चाललेला आहे.

गोमंत मातीची चव असलेले खाद्यपदार्थ देखील जंक फूडच्या पाशात अडकलेलेत, त्यामुळे इथे पर्यटक म्हणून आलेल्या लोकांना इथल्या मातीचा सुगंध दुरावत असल्याची जाणीव होते. नैसर्गिक सौंदर्याची खाण असलेल्या गोव्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटनाची नितांत गरज आहे, असं मत पर्यावरणप्रेमी आणि शिक्षक विठ्ठल शेळके यांनी व्यक्त केलं.

गोव्याला ‘रिबूट’ची गरज

हिरवीगार झाडं कापली गेलीत, डोंगर गायब झालेत आणि भातशेती दिसेनाशी झाली आहे. निसर्गाचा हा ऱ्हास इथल्या लोकांच्या स्वभावावरही परिणाम करतोय आणि त्यावर कोणताही उपाय दिसत नाही. गोव्याचं हेच बदलतं रूप इथे येणाऱ्या पर्यटकांना विचार करायला भाग पाडतंय.

जे पर्यटक गोव्याला आपलं दुसरं घर मानायचे आणि ज्या पर्यटकांना गोव्यात 'फिश करी आणि राईस' खायची इच्छा होती त्यांनाच कदाचित आपण दूर करतोय. या आणि अशा अनेक कारणांमुळे गोवा 'मेस' झालाय, असं अनेकजण सांगतात. एका पर्यटकाने तर स्पष्टपणे सांगितलं की, तो आता गोव्याचा विचारच करणार नाहीये, गोव्याच्या पर्यटनाला आता एका 'रिबूट'ची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Elections: 'कमळ' फुलवण्यासाठी 'त्रिसूत्री' रणनीती! मित्रपक्ष मगोसह अपक्षांनाही संधी; मुख्यमंत्र्यांना विजयाची खात्री

Goa Politics: 'नियमांचे पालन न केल्यास पोलीस कारवाई करणारच', सरदेसाईंच्या सभेवरील कारवाईवर रमेश तवडकरांचा सणसणीत टोला

Renuka Chowdhury: 'चावणारे तर संसदेत बसलेत...' काँग्रेस खासदार रेणुका चौधरींची पाळीव कुत्र्यासोबत एन्ट्री Watch Video

Samantha Ruth Prabhu: चर्चांना पूर्णविराम! समंथाने बांधली लग्नगाठ, नवऱ्यासोबतचा पहिला Photo Viral

Goa Live News:गोवा पोलिसांत निरीक्षकांच्या बदल्या; वाळपईचे शिराडकर कोलव्यात, तर कोलव्याचे नाईक वाळपईत

SCROLL FOR NEXT