Folk Art In Goa Canva
गोंयकाराचें मत

World Dance Day: फुगडी, धालो, घोडेमोडणी, मोरुलो, रणमाले ते स्क्वेअर डान्सिंग, वॉल्झ! गोव्यातील नृत्यपरंपरा

Goa Dance Culture: शास्त्रीय नृत्यकलेच्या खुणा किमान ९००० वर्षे पूर्वीच्या प्राचीन भारतीय चित्रांमध्ये सापडतात. अनेक इतर प्राचीन संस्कृतीमध्ये देखील अनौपचारिक नृत्यांचे अस्तित्व दिसते.

Sameer Panditrao

नृत्य कला ही मानव जातीला ज्ञात असलेल्या  मनोरंजक कलांपैकी सर्वात प्राचीन कला आहे. या आनंददायी कलेचे सादरीकरण जगातील लाखो लोकांकडून वेगवेगळ्या कारणासाठी नित्य होत असते. जेव्हा आपण ओळखीच्या आणि आवडणाऱ्या लोकांना अनपेक्षितपणे भेटतो तेव्हा आपले शरीर जी प्रतिक्रिया व्यक्त करते ते नृत्यच असते. कधी कधी तर निराशा झटकण्यासाठीही आपण नृत्य करतो. 

शास्त्रीय नृत्यकलेच्या खुणा किमान ९००० वर्षे पूर्वीच्या प्राचीन भारतीय चित्रांमध्ये सापडतात. अनेक इतर प्राचीन संस्कृतीमध्ये देखील अनौपचारिक नृत्यांचे अस्तित्व दिसते. आदिवासींपासून ते आधुनिक व्यावसायिक मनोरंजन करणाऱ्यापैकी प्रत्येक घटकाने नृत्यकला गुणांचे प्रदर्शन केलेले आहे, त्यामुळे नृत्य हे नेहमी मानवी जीवनातील एक मध्यवर्ती माध्यम बनून राहिले आहे. 

आपल्या गोव्यातही नृत्य हे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे हे आपल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक महोत्सवातून सिद्ध होत असते.

फुगडी, देखणी, धालो, कुणबी, घोडेमोडणी, दिवली, मोरुलो, तालगडी, धनगर, मांडो, मुसळ, रोमटामेळ, रणमाले, वीरभद्र इत्यादी धार्मिक- सांस्कृतिक  नृत्यांमधून गोमंतकीय ग्रामीण जीवन स्वतःला व्यक्त करत आले आहे. या नृत्यांमधून त्यांनी केवळ त्यांचे कौशल्य सादर केलेले नाही तर त्यातून‌ आपल्या दैनंदिन जीवनातील सुख-दु:खाना,व्यथा-वेदनांनाही त्यांनी मांडले आहे. 

त्याशिवाय गोव्यातील काही गावात वैशिष्ट्यपूर्ण असे नृत्यात्मक विधीही होत असतात. आमोणा गावात होळीच्या रात्री गड्यांकडून होणारे रोमांचक पदन्यास, वेळीप समुदायाकडून होणारे दिंड्या नृत्य आदी प्रकार हे ‘विशिष्ट बाब’ सांगण्याचे एक माध्यमच असते.

धालो, फुगडी सारख्या नृत्यप्रकारातून स्त्रिया आपल्या मनीचे गुह्य तीव्रतेने खुलेपणे व्यक्त करताना दिसतात. गोव्यात कला आणि सांस्कृतिक संचालनालय गेली काही वर्षे आयोजित करत असलेल्या 'लोकोत्सवा'त नृत्याच्या माध्यमातून इतर राज्यातील परंपराशी आम्ही ओळख करून घेत असतो. हा वार्षिक महोत्सव त्यादृष्टीने जणू ध्वजवाहक बनला आहे. 

त्याशिवाय गोवा एकेकाळची पोर्तुगीज वसाहत असल्या कारणाने अनेक पाश्चिमात्य नृत्य प्रकारही गोव्यात प्रचलित आहेत.

कार्निव्हल, लग्न समारंभ इत्यादी वेळी लाईन डान्सिंग, स्क्वेअर डान्सिंग, टू स्टेप्स, वॉल्झ  आदी नृत्यप्रकार आपण अनुभवतच असतो. मांडो, देखणी, कुरदिन्ह या नृत्यांवर देखील पाश्चिमात्य प्रभाव भरपूर आहे. फक्त पारंपारिक आणि लोकनृत्यच नव्हे तर आधुनिक नृत्य प्रकारात देखील गोमंतकीय युवकांनी विशेष कामगिरी करून दाखवली आहे. 'डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर' वगैरे रियालिटी शो मधून सुरेश नाईक सारख्या गोमंतकीय कलाकाराने आपले कौशल्य प्रकट केले आहे.

लोक एकमेकांबरोबर सतत स्वतःला प्रतिबिंबित होत असतात परंतु जेव्हा ते नृत्य करतात तेव्हा कदाचित त्यांच्यामधील प्रतिबिंबित होणारा तो सर्वात प्रामाणिक क्षण असतो.'
सिदी लार्बाय चेर्काउई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT