Senior Citizens: देशातील 70 टक्के ज्येष्ठांचा खिसा रिकामा, उदरनिर्वाहासाठी अनेकजण निवृत्तीनंतरही कामावर

Indian senior citizens financial dependency: भारतातील जवळपास सत्तर टक्के ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी इतरांवर विसंबून राहावे लागत असून अनेकांना उदरनिर्वाहासाठी निवृत्तीनंतर देखील काम करावे लागत आहे.
Senior Citizens
Senior CitizensDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: भारतातील जवळपास सत्तर टक्के ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी इतरांवर विसंबून राहावे लागत असून अनेकांना उदरनिर्वाहासाठी निवृत्तीनंतर देखील काम करावे लागत असल्याची धक्कादायक बाब एका अहवालातून उघड झाली आहे.

भारतातील वार्धक्य: आव्हाने आणि संधी’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनासाठी संकला फाउंडेशन, नीती आयोग, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने पुढाकार घेतला होता.

या अहवालामध्ये ज्येष्ठांसमोरील आरोग्यविषयक, मानसिक आणि सामाजिक आव्हानांचा वेध घेण्यात आला आहे.

Senior Citizens
Goa Assembly Monsoon Session: विधानसभेत घुमला खाणपट्ट्यातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्‍यांचा आवाज, 'सांडूर-बेल्‍लारी'चे दाखले, मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' आश्वासन

अशाही शिफारशी

ज्येष्ठांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आंतरमंत्रालयीन समन्वयावर या अहवालात भर देण्यात आला आहे. घरगुती देखरेख आणि वार्धक्यामध्ये ज्येष्ठांना योग्य सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून गुंतवणूक वाढवावी अशी सूचनाही करण्यात आली आहे.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ही मंडळी एकाकी पडू नयेत यासाठी जनतेमध्ये अधिक जाणीवजागृती करण्यावर भर दिला जावा, असे हा अहवाल सांगतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com