Goa Tribal History Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Tribal History: देवळात प्रवेश नाकारला, तर स्वतःची मंदिरे उभारली! गोव्यातील आदिवासी समाजाच्या जिद्दीची आणि अस्मितेची कहाणी

Goa Tribal Community Shuddhikaran History: आपल्याला आपल्या समाजाशी जोडून ठेवणे हा आदिवासी गुणधर्म व तीच त्यांची ओळख. परिस्थिती प्रतिकूल असो वा अनुकूल, त्यातून वाट काढतो तो आदिवासी.

गोमंतक ऑनलाईन टीम

डॉ. मधु घोडकिरेकर

आपल्याला आपल्या समाजाशी जोडून ठेवणे हा आदिवासी गुणधर्म व तीच त्यांची ओळख. परिस्थिती प्रतिकूल असो वा अनुकूल, त्यातून वाट काढतो तो आदिवासी. ‘गोमांतक शुद्धीचा इतिहास’ पुस्तकात याचे बरीच उदाहरणे दिली आहेत. म्हणून वीर सावरकर, ‘बहिष्कृतांची नाही, बहिष्कृत करणाऱ्यांची शुद्धी हवी’ असे म्हणतात ते अगदी सार्थ आहे.

जन्मात सुधारत नाही, तो गावडा’ असे लोक तुच्छतेने म्हणतात. पण मी ‘जन्मात सुधारत नाही तो खरा गावडा’ असे अभिमानाने सांगतो. शुद्धीकरण झालेल्या समाजाने कणखरतेचे गमक हेच आहे. आदिवासी स्थलांतर करताना, सोबत ‘दाम’स्वरूपी पितरांना व घरोब्याच्या दगडररुपी पुरुसाला (मूळपुरुष) सोबत घेऊन जात असत, त्यामुळे त्यांना आपल्या कुळविधीसाठी कुणा पुरोहिताची गरज पडत नसे. अशा वेळी कुणी वाळीत टाकले, कुणी आपल्याकडे येत नाहीत यावरून त्यांचे काही अडत नसे. ‘दाम’ देव्हाऱ्यात ठेवायचा व श्री गणेशस्वरुप ‘पुरूस’ अंगणात (जास्तीकरून मातीच्या तुळशी वृंदावनात) ठेवायचा त्यावेळी रिवाज असायचा.

आता तुळशी वृंदावनाला परवानगी नाही म्हटल्यावर या लोकांनी आपले डोके लढविले. ‘पुरुस’ अंगणात पेरला व त्यावर ‘खुरीस’ लावला. ज्याला ख्रिस्ती लोक जेजुला शिक्षा दिलेला ‘क्रॉस’ म्हणून पाहतात, त्या या लोकांनी, दोन्ही बाजूला दोन कान व मध्ये हत्तीची सोंड अशा स्वरूपात, त्याच क्रॉसध्ये श्रीगणेश पाहिला, आजही पाहत आहेत. ‘भाव तोची देव’ म्हणतात तो हाच. बाप्तिस्मा, लग्न व अंत्यविधीसाठी चर्चमध्ये जावे लागत होते ते ख्रिस्ती विधी उपचार म्हणून नव्हे, तर या विषयीच्या सक्तीच्या नोंदणीसाठी. बारशानंतर हिंदू धर्मात उपनयन सारखे विधी असतात. तसे ख्रिस्ती धर्मातही विधी असतात, असे विधी या लोकांनी कधी केलेच नाहीत.

कर चुकवण्यासाठी जमीनदारांनी केलेली लबाडगिरी, पुढील काळात या समाजाची नकारात्मक ओळख तयार झाली. विनायक मसुरकर महाराजांना कदाचित हा पूर्वेतिहास कळला नसावा, पण येथील जमीनदारांनी अनुकूल परिस्थिती निर्माण होताच, हा समाज अजून ख्रिस्ती विधींपासून दूर आहे हे पटवून दिले, व शुद्धीकरण कार्यास तयार केले. हिंदुत्व सोडून गेलेल्यांला परत धर्मात कसे घ्यायचे, याचे विधी मसुरकर महाराजांना सापडत नव्हते, ज्यावर उपाय आधी उल्लेख केलेल्या श्रीधर नावाच्या बटूमुळे सापडला.

या बटूला एका चर्चमध्ये पाद्री लोकांवर पाणी शिंपडून त्यांना आपल्या धर्मात घेत असल्याचे एक भिंतीचित्र दिसले. पाणी शिंपडून जर त्यांनी आपल्या लोकांना त्यांच्या धर्मात नेले असेल तर आपणही त्यांच्यावर पवित्र जल शिंपडून, आमच्या धर्मात का आणू नये, असा प्रश्न त्यांनी मसुरकर महाराजांना केला. पुढे मसुरकर महाराजांनी नेमका हा विधी शुद्धीकरणासाठी वापरला, दुर्दैवाने हा विधी पाहण्यास हा बटू हयात नव्हता. बाकीचे विधी हे वैदिक परंपरेतले होते, जे एरव्हीही केले जातात. शुद्धी करून घेणाऱ्यांना हा विधी ओळखीचा वाटला. कारण सोयर-सुतक संपले की, संपूर्ण घरजमीन शेणाने सारवून घराची शुद्धी करायची पद्धत त्यांच्यात होती.

या पुस्तकात एक संदर्भ आला ही ‘आम्हाला कोकणे व्हायचे आहे’ शुद्धीकरणास येणारे लोक सांगत होते, यामागे त्यांना काय अपेक्षित होते, हे जाणून घ्यावे लागले. येथे कोकणो हा स्थानिक आदिवासीला सर्व ग्रामविधी हक्क व सातेरीच्या देवळात पूजा अर्चा करण्याचा हक्क होता, तशा प्रकारचा त्यांना हवा होता. हा हक्क देणे मसुरकर महाराजांना शक्य नसल्याने, या विषयावर चर्चा करण्यास ते टाळत होते. दुसऱ्या बाजूला आर्य देवतांना आदिवासींनी आपला देव मानण्याची सुरवात दोनशे वर्षांआधी झाली होती, त्यामुळे शुद्धीकरण केल्यास आपल्याला या देवताची स्वहस्ते पूजा करायला मिळणार व आपल्याला परत आपले ‘कोकणे’ नाव या वापरायला मिळणार, या आशेवर सदर समाज शुद्धीकरणास तयार झाला.

शुद्धीकरण झाल्यावर ख्रिस्ती नावांसोबत ‘उर्फ कोकणे नाव’ टाकण्यास पोर्तुगीजांनी ४० रुपये फी लादली, त्यामुळे तिसवाडीत अजूनही स्वतःचे नाव हिंदू पण वडिलांचे नाव ख्रिस्ती वापरले जात आहे. शुद्धीकरणासाठी सहाय्य्य केलेल्या ज्या लोकांची यादी पुस्तकात आली आहे, त्यांना हिंदू धर्मकार्यात हातभार लावल्याचे श्रेय देता येतेच. त्याचबरोबर त्यांच्या पूर्वजांनी करचुकवीसाठी एका समाजावर लादलेले ख्रिस्ती नावाचे ओझे दीड शतकानंतर कमी केल्याचेही श्रेय देता येते. या करचुकवीची माहिती बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटीयरमध्ये, कारवार येथील साल्सेटमधून आलेले गावडे, ख्रिती नाव असून चर्चमध्ये का जात नाहीत, याचे कारण देताना दिली आहे.

‘पानवेलीच्या निमताण मुस्काक उदक’ या उक्तीप्रमाणे, पुढील काळात आदिवासी समाजात होणार असलेल्या आर्यकरण संक्रमणाची ओळख शुद्धीकरण झालेल्या समाजाला, इतरांच्या तुलनेत आधी झाली. आपल्या आदिवासी रुढी परंपरा जपतानाच त्यांनी गणपती, मारुती, लक्ष्मी, सातेरी, नागेश इत्यादी देवतांच्या स्वत:च्या हिमतीवर देवळे उभारली, एक दोन नव्हे तर अर्धशतकाच्या जवळपास. तुम्ही तुमच्या देवळात आम्हाला प्रवेश नाकारला म्हणून काय झाले, आमच्यासाठी आम्ही मंदिरे उभी केली आहेत, या देवळात मूर्ती कोणत्या देवतेची, यापेक्षा या समूहाला हे मंदिर जोडून ठेवत आहे, हे महत्वाचे.

आपल्याला आपल्या समाजाशी जोडून ठेवणे हा आदिवासी गुणधर्म व तीच त्यांची ओळख. परिस्थिती प्रतिकूल असो वा अनुकूल, त्यातून वाट काढतो तो आदिवासी. या पुस्तकात याचे बरीच उदाहरणे दिली आहेत. म्हणून वीर सावरकर, ‘बहिष्कृतांची नाही, बहिष्कृत करणाऱ्यांची शुद्धी हवी’ असे म्हणतात ते अगदी सार्थ आहे. गोमांतक शुद्धीचा इतिहास पुस्तकाच्या अनुवाद प्रकाशनाच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या चिंबल येथील पुण्यस्थानाबद्दल राज्य सरकारला शक्य आहे, असा उपाय म्हणजे, जमीन मालकाकडून सदर जागा विकत घेऊन किंवा संपादित करून, तिथे पुण्यस्थान स्मारक निर्माण करावे व त्यात उपेक्षित राहिलेल्या मूर्ती स्थापित कराव्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Taxi Protest: 4 दिवसांत आदेश कायमचा रद्द करा; अन्यथा राज्यभर चक्का जाम, टॅक्सीमालकांचा सरकारला अल्टिमेटम

Omkar Elephant: कोनशीच्या जंगलात थरार! ओंकार हत्तीचा पाय पडला गांधील माशांच्या बिळावर; कर्मचाऱ्यांवर हल्ला, दोघे गंभीर जखमी

Cricketer Banned: टी-20 स्पर्धेदरम्यान कोकेनचे सेवन, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डोप टेस्टमध्ये फसला; क्रिकेट खेळणाऱ्यावर बंदी

Jharkhand Accident: झारखंडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकनं लोकांना चिरडलं; 3 महिला, 3 बालकांसह 7 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

SCROLL FOR NEXT