Yagneshwar Nigalye Passed Away Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Yagneshwar Nigalye Passed Away: विनोदी, मिश्किल आणि कोटीबाज वाणी, दाभोळकरांच्या 'अंनिस'चा गोव्यात पाया रचणारे यज्ञेश्‍वर निगळ्ये वयाच्या 90 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड!

Tribute To Yagneshwar Nigalye: गोवा राज्यातील ‘अंधश्रद्धा निर्मूलना’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध साहित्यिक, आमचे सन्मित्र यज्ञेश्‍वर निगळ्ये यांचे वार्धक्यामुळे (९०) नुकतेच निधन झाले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

शंभू भाऊ बांदेकर

गोवा राज्यातील ‘अंधश्रद्धा निर्मूलना’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध साहित्यिक, आमचे सन्मित्र यज्ञेश्‍वर निगळ्ये यांचे वार्धक्यामुळे (९०) नुकतेच निधन झाले. आपल्या विनोदी मिश्किल आणि कोटीबाज वाणीने लोकांची मने जिंकणारे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून आपले वेगळे काम करून भोंदुगिरी, अवास्तव कर्मकांड आणि बुवाबाजीविरुद्ध आपले सडेतोड विचार आपल्या लेखणीतून मांडणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.

त्यांची आणि माझी मैत्री फार जुनी. म्हणजे ४०-४५ वर्षांपूर्वीची. ते गोवा (Goa) सरकारच्या पर्यटन खात्यात त्यावेळी उपसंचालक होते. तर मी पणजीतील एका राष्ट्रीयीकृत बँकेत होतो. मग समाजकार्य, साहित्यिक, चर्चा व अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक समरसता मंच आदींच्या माध्यमातून आमचे मैत्र वाढले आणि ते अखेरपर्यंत टिकून राहिले. अधूनमधून आमची पणजी येथे ‘वर्षा बुक स्टॉल’मध्ये भेट व्हायची. उभ्याउभ्या दहा-पंधरा मिनिटे आणि समाजकारण, राजकारण, साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे गोव्याच्या विविध भागात चाललेले कार्य यांच्यावर बोलत असू.

पण वाढत्या वयामुळे गेली चार-पाच वर्षे त्यांच्या चालण्या-फिरण्यावर बंधन आले होते. तरी आम्ही दूरध्वनीवरून एकमेकांशी संवाद साधत होतो. त्यांना माझ्याशी काही बोलायचे असेल की मला घरी बोलावत. चहा-फराळ घेता-घेता आम्ही किमान अर्धातास विविध विषयांवर बोलत असू. यात विशेषत: अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य, त्यांचे लिखाण, माझे लिखाण आणि राजकारणात (Politics) घसरत चाललेली नीतिमत्ता, वाढते जुलूम, अत्याचार, चोऱ्या, मारामाऱ्या इत्यादी विषयांचा समावेश असे.

त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अध्यक्षतेखाली चालवलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चा पाया गोव्यात रचण्यास महत्त्वाचे योगदान दिले होते. कै. दादू मांद्रेकर, रमेश गवस, जवाहर बर्वे, देवेंद्र कांदोळकर, कॅजिटन परेरा, सीताराम टेंगसे, दत्ता दामोदर नायक, संदेश प्रभुदेसाई यांच्यासह माझा या कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे श्रेय कॅजिटन परेरा आणि यज्ञेश निगळ्ये यांना जाते. शक्य असेल तेथे आम्ही सोबत जाऊन या कार्यात महात्मा फुले, गो. ग. आगरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे कार्य केले, वाणीने, लेखणीने जे समाजप्रबोधन केले त्याचा पाढा वाचला व उभयतांना सत्कारास प्रवृत्त केले.

त्यानंतर कार्यक्रमाच्या एकूण आयोजनासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व संघटनेच्या महिला आघाडीची बैठक आयोजित केली. यावेळी एका महिलेने मला सरळच प्रश्‍न केला म्हणाली, ‘भाऊ, एक तर ते देवाधर्माला मानीत नाहीत. अंधश्रद्धा, निर्मूलनाचे कार्य करून देव, धर्म, रूढी, परंपरा, यांवर टीका करीत असतात.’ दुसऱ्या एका महिलेने यावर होकारार्थी मान डोलावली. त्यावर मी पंधरा मिनिटे त्यांच्या एकूण वाणी, लेखणी व त्यांच्या प्रत्यक्ष कार्याची माहिती देताना सांगितले की, ‘यज्ञेश्‍वर निगळ्येंनी चालवलेले आगळेवेगळे कार्य हा एक ध्यास म्हणून तन, मन, धनाने चालवलेले कार्य आहे.

मुळात एका आस्तिकाच्या घरात जन्म घेऊनही त्यांनी अवास्तव कर्मकांडे, भोंदूगिरी बुवाबाजी याविरुद्ध कुणाचीही तमा न बाळगता जसे शक्य होईल तसे निःस्वार्थीपणे व निरपेक्षपणे काम केले. साखळीचे सुप्रसिद्ध, वेदशास्त्रसंपन्न घनःश्यामशास्त्री जावडेकर यांचे ते जामात, पण घरातील कुणालाही आपल्या कार्याचा अडसर निर्माण होईल किंवा त्यांच्या देवादिकार्यात आपला व्यत्यय येईल असे कधीही, काहीही त्यांनी केले नाही.

उलट ज्यांचा विरोध असेल, ज्यांना आपले सडेतोड व स्पष्ट विचार मान्य नसतील, त्यांचाही त्यांनी कधी निषेध केला नाही. त्यांच्याशी वाद घातला नाही. उलट आपण एक जागृत नागरिक म्हणून हे काम हाती घेतले आहे व ते जीवनाच्या अखेरपर्यंत पार पाडू या विचाराशी सहमत होऊन जो येईल त्याच्याबरोबर, न येईल त्याचा धिक्कार न करता हे सत्कर्म अखेरपर्यंत पार पाडले.’ मी बरेच आणखीन काही सांगितले व ज्या भगिनींचा विरोध होता, त्यांच्या हस्ते सौ. विमलताईंची ओटी भरण्याचे व त्यांना सौभाग्यलेणे देण्याचे काम केले. सगळ्यांच्या सहकार्याने हा सत्कारसोहळा व्यवस्थितपणे पार पडला.

दीड- दोन वर्षांपूर्वी त्यांच्या विनोदी व वैचारिक लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन पर्वरीच्या आझाद भवनमध्ये झाले होते. मी मुद्दाम माझ्या कार्यकर्त्यांसह त्या कार्यक्रमात हजर राहिलो होतो. तेथे गंभीर प्रकृतीच्या निगळ्येंचे विनोदी व कोटीबाज विचार ऐकून सगळेच प्रभावित झाले होते.

वस्तुतः ते गंभीर वाटत असले, तरी त्यांचा स्वभाव मिश्किल, विनोदी व एकमेकांना समजून घेणारा होता. त्यामुळे आमचे मैत्र केवळ दोघांपुरतेच मर्यादित राहिले नव्हते; तर त्यांच्या पत्नी, मुले, सून, नातवंडे यांच्याशीही माझा घरोब्याचा संबंध जुळून आला होता. आपल्या कार्याशी, तत्त्वांशी आणि निष्ठेशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहून कूपमंडूक वृत्तीच्या धर्मांधतेला विरोध करणाऱ्या व आपल्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांनाही आपलेसे करणाऱ्या व आपलेसे करणाऱ्या व आपला हा आगळावेगळा यज्ञ तडीस नेण्यासाठी काया, वाचा, मने झटलेल्या या आमच्या सन्मित्रास आदरपूर्वक आदरांजली आणि श्रद्धांजली!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरे गुन्हेगार मोकाट, आमच्या मुलांना अटक का केली? नरकासूर प्रकरणी होंडा ग्रामस्थ एकवटले, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

ना भाकरीचा प्रश्न सुटला ना जीव वाचला; कोकण रेल्वेखाली सापडून दोन्ही पाय तुटले, ओडिशाच्या तरुणाचा गोव्यात मृत्यू

IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT