Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

CM Pramod Sawant At OSH India 2025: कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य हे केवळ नियमांचे पालन करण्यापुरते मर्यादित नाही, तर ती एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे.
CM Pramod Sawant At OSH India 2025
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य हे केवळ नियमांचे पालन करण्यापुरते मर्यादित नाही, तर ती एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुंबईत केले. 'OSH India Conference & Exhibition 2025' (ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ) च्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शनही घेतले.

दरम्यान, या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा (PPE) वापर करण्यापासून ते मानसिक आरोग्यापर्यंत तसेच शाश्वतता (Sustainability) आणि नवनिर्मिती (Innovation) पर्यंत भारत (India) सातत्याने नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे. तसेच, गोवा राज्य कामगारांचे कल्याण, सुरक्षा आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

CM Pramod Sawant At OSH India 2025
CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंतांनी आपल्याकडे ‘गृहनिर्माण खाते ’ का घेतले? गोमंतकीयांसाठी येणार मोठी योजना

गोव्याच्या कल्याणकारी योजना

मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भाषणात गोव्याने कामगारांच्या कल्याणासाठी केलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. यामध्ये त्यांनी 'इन्स्पेक्टररेट ऑफ फॅक्टरीज अँड बॉयलर्स' आणि 'ईएसआय योजना' (ESI Scheme) यांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आम्ही केवळ सुरक्षिततेपुरतेच नाही, तर कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना आरोग्यसेवा, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा देण्यावरही भर देत आहोत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपण आजच्या बदलत्या गरजा आणि वास्तवाशी जुळवून घेतले पाहिजे, यामध्ये डिजिटल कार्यस्थळे, शाश्वतता आणि मानसिक आरोग्य यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे आता 'नियमांचे पालन' (Compliance) करण्याच्या पलिकडे जाऊन 'काळजी घेण्याच्या संस्कृती'च्या दिशेने (Culture Of Care) वाटचाल करणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा की, उद्योगांनी केवळ कायद्याचे पालन न करता कामगारांच्या हिताला आणि आरोग्यालाही (Health) प्राधान्य दिले पाहिजे.

CM Pramod Sawant At OSH India 2025
CM Pramod Sawant: 'आमच्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री...', राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री सावंतांचं वक्तव्य

आभार प्रदर्शन आणि वचनबद्धता

मुख्यमंत्र्यांनी इन्फॉर्मा मार्केट्स आणि @OSHIndia यांचे असे महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले. व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याच्या बाबतीत जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींशी जुळवून घेण्यासाठी गोवा राज्य वचनबद्ध असल्याचे देखील त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. या संमेलनातून कामाच्या ठिकाणी सुरक्षा ही केवळ एक औपचारिकता नसून ती देशाच्या प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असा संदेश देण्यात आला.

CM Pramod Sawant At OSH India 2025
Pramod Sawant on Budget: सरकारचा अर्थसंकल्‍प हा चिप्‍सच्‍या पाकिटासारखा नव्‍हे, तर चतुर्थीच्‍या माटोळीसारखा - मुख्यमंत्री

श्री सिद्धिविनायकाचे दर्शन

त्याचवेळी, मुख्यमंत्री सावंत यांनी मुंबईत प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक देवस्थानालाही भेट दिली. त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन सर्वांसाठी शांतता, समृद्धी आणि आनंदाची प्रार्थना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com