Ganesh Festival In Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

Ganesh Festival २०२५: आपणही मनोभावे प्रार्थना करून या गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देऊया. कारण हा सिद्धिविनायक ६४ कलांचा अधिपती आहे.

Sameer Amunekar

आपणही मनोभावे प्रार्थना करून या गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देऊया. कारण हा सिद्धिविनायक ६४ कलांचा अधिपती आहे. जे जे उत्तम उदात्त, उन्नत महन्मधुर हे या देवतेच्या पूजनातून, प्रार्थनेतून लाभते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगणपती बाप्पाची विनवणी करताना म्हटले आहे.

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥॥

देवा तूंचि गणेशु । सकलमति प्रकाशु ।

म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥॥

आजच्या सांसारिक जीवनात मनुष्याला मानसिकदृष्ट्या सबळ आणि प्रबळ होण्यासाठी व सर्व प्रकारच्या समस्या, अडचणी यांना सामोरे जाण्यासाठी व माणसाचे नैतिक बळ वाढविण्यासाठी त्याला आधार हवा असतो. हा आधार तो परमेश्वराला शरण जाऊन मागतो. भगवंताला भक्तिभावाने मारलेल्या हाकेला त्याच्या प्रार्थनेला त्या दयावन ‘ओ’ देतो. तेच सार या ओमकारात आहे. ‘हा ओमकार म्हणजेच गणपती, गणनायक, विनायक, गजानन, श्रीगणेश होय. अशा या सुख देणाऱ्या गजानन महाराजाला, बाप्पा मोरयाला मनोभावे भजून, प्रार्थना करून प्रत्येक गणेशभक्त विनवणी करतो की, ‘हे श्रीगजानना महाराजा, सगळ्यांना सुख व शांती आणि समाधान दे. सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर.’

गोव्यातील दीड, पाच किंवा सात दिवसांच्या वैयक्तिक, कुटुंबातील व घराण्यातील श्रीगणेशाचे विसर्जन झाले की, गोवेकरांना वेध लागतात ते सार्वजनिक गणेशोत्सवाचे. हे सार्वजनिक गणेशोत्सव नऊ, अकरा किंवा एकवीस दिवसांचे असतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी परंपरेने घरात किंवा कुटुंबात पुजला जाणारा गणपती सार्वजनिक ठिकाणी आणला. ते साल होते १८९३. अर्थातच, आपला देश त्यावेळी पारतंत्र्यात होता. जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाचे स्फुलिंग पेटवणे आवश्यक होते.

अशावेळी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन सामूहिकरीत्या गणेशोत्सव साजरा करावा व सर्वांमध्ये एकत्वाची, समानतेची भावना निर्माण व्हावी हा जसा त्यामागे हेतू होता, त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवातून होणाऱ्या सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रमांतून समाजप्रबोधन व्हावे, हाही हेतू होता. अर्थात आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरही असे समाजाच्या प्रबोधनाचे कार्यक्रम सुरू राहिले, पण या कार्यक्रमांतून प्रबोधनाऐवजी मनोरंजनाला विशेष उधाण आलेले दिसते.

गोव्यात मुक्तीनंतर म्हणजे १९६१नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यावेळी सुरुवातीच्या काही प्रमुख शहरांमध्येच सार्वजनिक गणेशोत्सव व्हायचे. आता मात्र प्रत्येक शहरात मोठ्या धूमधडाक्यात व भव्य, दिव्य कार्यक्रमानिशी हा उत्सव साजरा होतो. इतकेच नव्हे तर काही पंचायत क्षेत्रांतही नऊ दिवसांपासून एकवीस दिवसांपर्यंत गणेशोत्सव मोठ्या उमेदीने आणि तळमळीने साजरे केले जातात.

अशा कार्यक्रमांमध्ये मुलांसाठी नृत्य, वेशभूषा, बालभजन तर महिलांसाठी हळदीकुंकू, फुगडी असे कार्यक्रम तर काही ठिकाणी नामांकित गायक, गायिकांचे कार्यक्रम, नामांकितांची कीर्तने, गद्य नाटके, पद्य नाटके यांची रेलचेल असते. समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम कमी व मनोरंजनाच्या कार्यक्रमांची प्रेक्षकांच्या पसंतीप्रमाणे विशेष रेलचेल असते.

सार्वजनिक गणेशोत्सवातील निधी समिती ही प्रमुख असते. अशा गणेशोत्सवांच्या निमित्ताने देणगीदारांकडून लाखो रुपयांचा निधी गोळा केला जातो. व कार्यक्रमांवरही अफाट खर्च केला जातो. श्रीगणेशाची अवाढव्य मूर्ती, आतषबाजी यावर जसा खर्च होतो, त्याचप्रमाणे दुचाकी, चारचाकी, गृहोपयोगी विविध प्रकारच्या वस्तू इत्यादी देणगी कुपनांमार्फत देणे, विसर्जनावेळी खास बँडपथक आदींसाठीही अमाप खर्च केला जातो. काही ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त स्मरणिका काढून जाहिराती गोळा करणे, नामांकितांचे लेख छापणे असेही उपक्रम राबविले जातात.

जास्त प्रमाणात निधी गोळा झाला तर गरजूंना औषधोपचारांसाठी, अपंग व गरीब वयोवृद्धांना आर्थिक सहकार्य करणे. मंदिरासाठी निधी देणे, गरीब विद्यार्थ्यांना गणवेषापासून पुस्तकापर्यंत मदत करणे, आवश्यक तेथे रुग्णवाहिका, शववाहिनी आणि गरिबांच्या अंत्यविधीसाठी मदत करणे आदी लोकोपयोगी कामे करून शाबासकी मिळविली जाते.

मग घरातला गणपती बाप्पा असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सवातला गजानन महाराज असो, प्रत्येक भाविक मनोभावे या हेरंबाकडे आपापल्या बुद्धिमत्तेतून त्याचे स्मरण करीत असतो व सर्वेजना सुखिनो अशी त्याची वैश्विक भावना असते. तो भक्त म्हणत असतो,

शंकरसुत तू गौरीनंदन

कार्यारंभी तुलाच वंदन॥

विघ्नविनायक तू सुखकर्ता

त्राता, धाता तूच नियंता|

आपणही मनोभावे प्रार्थना करून या गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देऊया. कारण हा सिद्धिविनायक ६४ कलांचा अधिपती आहे. त्याला मनापासून नतमस्तक होण्यासाठी आपणाला या गणधीशाला सद्बुद्धी, सद्विचार प्रदान करावेत, हीच त्याच्या चरणी सर्वांच्यावतीने नम्रतापूर्वक प्रार्थना!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Metro Goa: वॉटर मेट्रोमुळे 'पर्यटनाला' मिळणार चालना! मंत्री फळदेसाईंनी व्यक्त केली आशा; कोचीत जलमार्गावर केला प्रवास

High Court: 'गाय केवळ पूजनीयच नाही तर...', गोवंश तस्कराला हायकोर्टाचा झटका; नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण

Rohit Sharma Record: फक्त एक सामना आणि हिटमॅन 'रोहित' रचणार मोठा विक्रम; सामील होणार खास क्लबमध्ये

Ganesh Festival 2025: परंपरा, कला आणि पर्यावरणाचा संगम... सुबक गणेशमूर्ती साकारणारे 'च्यारी घराणे'; दक्षिण गोव्यात प्रसिद्ध

Team India Title Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवरून उतरलं 'ड्रीम', आता कोण होणार नवा प्रायोजक? 'या' मोठ्या कंपनीचं नाव चर्चेत

SCROLL FOR NEXT