Dongri Village Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Dongri: सफर गोव्याची! इंत्रूज म्हणजेच चैतन्याची सळसळ, आनंदाची चळवळ; मोहक 'डोंगरी'

Dongri Village Goa: गांवच्या मध्यात एक डोंगर. भोवती गाव. टेकडी (दोंगुल्ली) भोवती गांव असल्याने डोंगरी असे नांव पडले असावे. थोरलें भाट आणि धाकटें भाट, असे डोंगरीचे दोन भाग आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी तालुक्यात जुवारी आणि मांडवी नदीच्या संगमावर वसलेला माझा गाव. सभोवती खाजन शेतीची हिरवाई. आजगो आणि करगूट या दोन तांदळांच्या प्रजाती इथं मोठ्या प्रमाणात खाजनांत पिकतात.

गांवच्या मध्यात एक डोंगर. भोवती गाव. टेकडी (दोंगुल्ली) भोवती गांव असल्याने डोंगरी असे नांव पडले असावे. थोरलें भाट आणि धाकटें भाट, असे डोंगरीचे दोन भाग आहेत. भौगोलीक स्तरावर गोलाकार परीघव्याप्त हा गांव.

डोंगरी गांवच्या शिखरावर ग्रामदेवी षष्टी शांतादुर्गेचे भव्य मंदिर आहे. ह्या दोंगुल्लेवर पूर्वी ऋषिमुनी तप करायला बसत होते आणि तप करताना कोणीच खंडित करणार नाही म्हणून आपली राखण करायला त्यांनी देवी आणली होती, असं कांही लोक सांगतात. सटी देवीचें देवूळ हें गांवकाऱ्यांचें श्रध्दास्थान.

गोळीबाबा, साखळ्यो हीं इथले लोकदैवते आहेत. गांवां भोंवतणी धालांचे मांड आहेत. थोरल्या भाटांत सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. कृष्णभट्ट बांदकर या संताची ही पुण्यभूमी.

‘विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे’ ही त्यांची प्रसिध्द रचना. याच कृष्णभट्ट बांदकरांनी पहिले संगीत मराठी नाटक रचले होते. नाटकाचा पायाच डोंगरी गांवांत रचला गेला ही ऐतिहासिक साक्ष. त्याच नाटकाचा प्रयोग बघून अण्णासाहेब किर्लोस्कारांना प्रेरणा मिळाली.

‘सुंवारी’ लोकवादन कला इथली. डोंगरी गांवचं इंत्रूज सुप्रसिद्ध. शिमगा सर्वप्रथम माझ्या गावात होतो, पण इंत्रूज नांवाने.‘इंत्रूज’ वा ‘इंत्रूदो (Intrudo)’ म्हणजे कार्निवाल. इंत्रूज हा शब्द पोर्तुगीज भाषेतून येऊन कोकणीत रूजला.

धर्मांतरणाच्या काळात गोवेकरांना आपला धर्म पाळायला आणि पारंपरिक कला सादर करायला बंदी होती. परंतु डोंगरेकरांनी आपल्या सुंवारीचे कलेत आणि शिमग्यात खंड पडू दिला नाही.डोंगरीत इंत्रूज सात दिवस चालतो.

पौषातील पहिल्या शुक्रवारी सगळी वाद्ये काढून साफ-सफाई करून रात्री प्रत्येक मंडपात सुंवारी वाजवली जाते. इंत्रुजाच्याच काळात गावात धाकट्या भाटांत बो सुशेद सायबिणीच्या कपेलाचे फेस्त होते.

या फेस्ताला ‘डोंगरेकारांचें फेस्त’ म्हणतात. पुरसांवांत म्हणजे मिरवणुकीत हिंदू क्रिस्तांव भक्तीभावाने भाग घेताना दिसतात. हिंदू आणि क्रिस्तांव समुदायाचे लोक, सायबिणीची आणि सां-सेबोस्त्यांव दोन्ही चॅरोलां (पालखी) खांद्यावर घेऊन, सहभागी होतात.

इंत्रूज आणि फेस्तानिमित्त गांव पूर्णपणे सजतो. मंडूर तिठ्या पासून डोंगरीला पोहोचेपर्यंत वेगळ्या प्रकाराची सजावट असते. व्हडलें भाट आणि धाकटें भाट अशा दोन्ही मार्गांवर प्रवेशद्वार उभारतात. संपूर्ण गांवांत बांबूच्या कमानी, बोंदेरां, वीज व्यवस्था व इतर सजावटीमुळे डोंगरी गांवचे चित्र सुंदर,अप्रूप वाटावे असे आणि मोहक दिसते. यंदा इंत्रूज ६ ते ११ फेब्रुवारी तर फेस्त ८ फेब्रुवारीला होणार आहे. भाविक, कलामोगी, गुणग्राहक आस्वादक यांनी या उत्सवादरम्यान डोंगरी भूमीवर पाऊल टाकावं. इंत्रूज म्हणजेच चैतन्याची सळसळ, आनंदाची चळवळ. इंत्रूज म्हणजेच अनंत ऊर्जा. माझ्या डोंगरी गांवचं पोषण करणारी.

सेबी फर्नांडिस,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT