Indian cow milk hypocrisy Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Opinion: गाय काय देते?

Cow milk: गाय शेणच देते. गाय दूध देत नाही. वासरासाठी असलेले गायीचे दूध आपण बळजबरीने काढतो.’ अर्थात, वर्गशिक्षिका काहीच बोलली नाही. ‘

गोमन्तक डिजिटल टीम

दत्ता दामोदर नायक

माझा मुलगा चिराग हा मराठी प्राथमिक शाळेच्या तिसरीत होता तेव्हा वर्गशिक्षिकेने त्याची सामान्यज्ञान परीक्षा घेतली. त्यात एक प्रश्न होता, ‘गाय काय देते?’ चिरागने प्रश्नाचे उत्तर दिले, ‘गाय शेण देते.’ वर्गशिक्षिकेने शून्य मार्क दिले. त्यानंतर मी शाळेत गेलो व वर्गशिक्षिकेला विचारले, ‘बाई, ‘गाय काय देते?’ ह्या प्रश्नाचे उत्तर चिरागने, ‘गाय शेण देते’, असे लिहिले; यात काय बरे चुकले?

गाय शेणच देते. गाय दूध देत नाही. वासरासाठी असलेले गायीचे दूध आपण बळजबरीने काढतो.’ अर्थात, वर्गशिक्षिका काहीच बोलली नाही. ‘दूध कोण देते?’ ह्या प्रश्नाचे उत्तर छोट्या चिरागने निश्चितच ’दूधवाला’ असे दिले असते. अत्यंत साध्या दिसणार्‍या ह्या गमतीशीर प्रसंगाकडे मी समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून पाहतो तेव्हा एक वेगळेच सामाजिक वास्तव मला दिसू लागते.

द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा ह्याला घरच्या दारिद्र्यामुळे त्याची आई दूध देऊ शकत नव्हती. आज देशात अशी लाखो गरीब मुले आहेत ज्यांना दूध मिळत नाही. खुद्द गायीचे दूध काढून विकणारे गवळीही आपल्या मुलांना दूध देत नसावेत.

विनामूल्य मिळणारे गायीचे शेण मात्र गरीब लोक वापरतात. शेणाने अंगण सारवले जाते. शेणाचा खतासारखा उपयोग करतात. शेण ही गरिबांना उपयुक्त अशी गायीने दिलेली वस्तू आहे.

प्रचंड भेसळ करून दूध विकले जाते. शंकराच्या लिंगावर दुधाचा अभिषेक घालून हजारो लीटर्स दुधाची नासधूस केली जाते. नुसत्या चहामध्ये घातल्या जाणार्‍या दुधाचे प्रमाण प्रचंड असावे. स्वातंत्र्यवीर सावरकर गायीला पवित्र मानत नसत. गाय हा उपयुक्त पशू आहे असे ते म्हणत. ’जो गायीला माता मानतो त्याचा बाप बैल असला पाहिजे’ हे त्यांचे उद्गार सर्वश्रुत आहेत.

सावरकरांचे गोडवे गाणार्‍या हिंदुत्ववाद्यांनी सावरकरांची विज्ञाननिष्ठा अंगीकारली नाही. पवित्र गायीचे अवास्तव स्तोम ह्या देशात माजले आहे. भाजप सत्तास्थानी असलेल्या राजस्थान सरकारने हॉटेलमधल्या अन्नावर २० टक्के ‘गाय कर’ लादावा ही तर हास्यास्पद गोष्ट आहे. एखाद्या ख्रिश्‍चन किंवा मुसलमान मुलाने ‘गाय काय देते?’ ह्या प्रश्नाचे उत्तर ‘गाय बीफ देते’, असे लिहिल्यास नवल नाही. आज भारतात प्रतिवर्षी ३० लाख टन गोमांस फस्त केले जाते.

भारतातून ब्राझिलनंतर सर्वाधिक बीफची निर्यात केली जाते. शिवाय गायी - म्हशीच्या चामड्यापासून बूट, बॅगा ह्या ग्राहकोपयोगी वस्तू केल्या जातात. ह्या व्यवसायात बहुतांशपणे दलित लोक आहेत.

भाकड गायींना सांभाळणे शेतकर्‍यांना परवडत नाही. त्यामुळे गोहत्येशिवाय तरणोपाय नसतो. म्हणूनच देशात गोहत्या नव्हे तर गोवंश (म्हणजेच भविष्यात दूध देणार्‍या वासराच्या हत्येला) बंदी आहे. वर्गीस कुरीयनच्या पुढाकाराने देशात अमूल दुग्धक्रांती झाली. पशुपालन व दुग्धव्यवसाय ह्याची जोड शेतीला मिळाल्यास शेतकर्‍यांचे दारिद्र्य कमी होईल.

गोव्यात दुग्धव्यवसाय फसला आहे. गोमंतकाच्या नांवात ’गो’ असल्यामुळे भरपूर गायी असलेला हा प्रदेश अशी अनेकांची गैरसमजूत आहे. वास्तविक ‘गुवा’ म्हणजे सुपारीची झाडे विपुल असलेला प्रदेश ही गोव्याची (गोहतीप्रमाणे) व्युत्पत्ती आहे.

वेदांत ’आम्हाला विपुल गुरेढोरे दे. भरपूर दूध दे’ हीच जडवादी, ऐहिक प्रार्थना आहे. ’दुधाचा अर्धा ग्लास’ ही सत्यकथा मला आठवते. एका गावात हावर्ड नावाचा गरीब मुलगा होता. घरच्या गरिबीमुळे शाळेची फी भरता येत नसे. त्यामुळे हावर्ड घराघरांत जाऊन छोटेमोठे पदार्थ विकत असे. एके दिवशी खूप फिरल्यावर त्याला भूक लागली.

एका घराच्या दारावर त्याने थाप मारली. एका स्त्रीने दार उघडले. आपल्याला भूक लागली आहे असे न सांगता हावर्डने तिला आपल्याला तहान लागली आहे असे खोटे - खोटे सांगितले. पण हा छोटा मुलगा भुकेलेला आहे हे त्या स्त्रीने ओळखले.

तिच्या घरी केवळ अर्धा ग्लास दूध होते. पेल्यात भरून तिने ते हावर्डला दिले. पुढे हावर्ड केली हा डॉक्टर झाला व गावालगतच त्याने एक इस्पितळ सुरू केले. एके दिवशी एक आजारी वृद्ध स्त्री त्याच्या इस्पितळात दाखल झाली.

तिच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करणे जरुरीचे होते पण त्या स्त्रीकडे शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसे नव्हते तरी डॉ. हावर्ड केलीने तिची यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्या स्त्रीला डिसचार्ज देताना डॉक्टरांनी तिच्या हातात आपले बिल दिले होते. त्यावर शस्त्रक्रियेची किंमत होती व पुढे लिहिले होते - झरळव लू हरश्रष सश्ररीी ेष ाळश्रज्ञ. दुधाच्या अर्ध्या ग्लासने हे बिल फेडले आहे.

कृतज्ञता हा फार मोठा गुण आहे. माणसे कृतघ्न होतात याचे मला कधीच आश्चर्य वाटत नाही. माणसे कृतज्ञ नसतात याची मा खंत होते. शेण, दूध, मास, चामडे देणार्‍या गायी - म्हशीबद्दल आपण कृतज्ञता बाळगूया!

(‘समाजमित्र पुरस्कार’ स्वीकारताना केलेल्या भाषणावर आधारीत विस्तृत लेख.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT