Ganesh Idol Dainik Gomatnak
गोंयकाराचें मत

Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

Ganesh Chaturthi: स्वतःहून गणेशमूर्ती तयार करण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच असतो.‌ अर्थात, लहान मुलांनी बनवलेल्या या गणेशमूर्ती बाजारात विकत मिळणाऱ्या गणेशमूर्तींसारख्या अगदी परफेक्ट होत्या.

Sameer Panditrao

चिकण मातीपासून गणेशमूर्ती बनवायची कार्यशाळा, पॉईंट क्लब- म्हापसा येथे आम्ही लहान मुलांसाठी आयोजित केली आहे.‌ दोन वर्षांपूर्वी प्रथमच आयोजित केलेल्या पहिल्या कार्यशाळेत 16 मुलांनी भाग घेऊन गणपतीच्या मूर्ती बनवल्या होत्या.

विशेष म्हणजे त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांनी कार्यशाळेत बनवलेल्या गणेशमूर्तीच गणेश चतुर्थीच्या सणात आपापल्या घरी पूजेला लावल्या होत्या. गेल्या वर्षी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे मी ही कार्यशाळा आयोजित करू शकले नाही मात्र यंदा 17 आणि 24 ऑगस्ट असे दोन दिवस ही कार्यशाळा होणार आहे.

स्वतःहून गणेशमूर्ती तयार करण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच असतो.‌ अर्थात, लहान मुलांनी बनवलेल्या या गणेशमूर्ती बाजारात विकत मिळणाऱ्या गणेशमूर्तींसारख्या अगदी परफेक्ट होत्या असे नव्हते, मात्र स्वतः बनवलेला गणपती पुजला जातो आहे याचा मिळणारा आनंद मात्र मुलांसाठी (आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांसाठीही) परफेक्ट होता. याच कारणामुळे मी पुन्हा ही कार्यशाळा घ्यावीशी वाटली आणि मी ती घेते आहे. 

ही कार्यशाळा दोन सत्रात घेतली जाणार आहे. पहिल्या रविवारी म्हणजे 17 ऑगस्ट रोजी गोव्याचे प्रसिद्ध सिरॅमिक आर्टिस्ट आणि शिल्पकार रामदास गडेकर हे आपल्या सत्रात मुलांना गणेश शिल्प तयार करण्याची प्रक्रिया शिकवतील त्यानुसार मुलांनी शिल्प तयार केल्यानंतर पुढील रविवारच्या सत्रात त्यांना मी ते शिल्प रंगवायच्या बाबतीत मार्गदर्शन करणार आहे.‌

गणेश मूर्ती बनवायच्या निमित्ताने मुले मातीकामाची विविध तंत्रेही शिकतात हे महत्त्वाचे आहे. या कार्यशाळेत प्रत्येक मुलाची गणेशमूर्ती वेगवेगळी बनते हे विशेष असते. खरे तर ही एक प्रकारची शिल्पकलेची कार्यशाळाच असते म्हणायला हरकत नाही. मुले हवे तर नंतर वेगळ्या प्रकारची शिल्पेही या कार्यशाळेत मातीकामाचे प्राथमिक तंत्र जाणून घेऊन नक्कीच बनवू शकतील.

चैताली मोरजकर, चित्रकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT