
बार्देश : मूर्ती घडवणाऱ्या कुशल कारागीरांची कमतरता, वाढती महागाई, त्यातच रंग खरेदी मुळे बसणारा ‘जीएसटी’चा फटका यामुळे बहुतेक मूर्तिकार चिंताग्रस्त झालेले आहेत. तरी ही चतुर्थी साजरी करण्यासाठी जोमाने मूर्ती साकारत आहे.
गणेश चतुर्थी जसजशी जवळ येऊ लागली तसतसे म्हापशातील चित्र शाळांमधून गणेश मूर्तीना आकार देण्याचे काम सुरू आहे. एका बाजूने पारंपारिक माती कला जोपासत गणेशमूर्ती घडवण्यात मूर्तिकारांनी लक्ष दिले असले तरी दुसऱ्या बाजूने मूर्तिकारांसमोर अनेक अडचणी असल्याचे येथील एक ज्येष्ठ मूर्तिकार प्रमोद नाटेकर, युवा मूर्तिकार धर्मा कवळेकर, जयंत नाटेकर, गोविंद गुजराती यांनी सांगितले.
गणेश चतुर्थीसाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तसेच भाविकांकडून कमी पोटाच्या गणपतीसाठी मागणी येत असून या वर्षी भाविक कमी किमतीत गणपतीची मूर्ती पूजेला लावण्यासाठी नेणार असल्याचे या मूर्तिकारांकडून सांगण्यात आले. यंदा मूर्तिकार आणि भाविकांनीही एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
यंदा बहुतेक घरोघरी दीड, पाच, सात दिवसांची चतुर्थी साजरी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे यंदा आवडीच्या मोठ्या मूर्तींना मागणी वाढणार असे दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडूनही यंदा मोठ्या मूर्तींची मागणी नोंदवली आहे. मात्र,तरीही बहुतेक मूर्तिकारांचा लहान व मध्यम आकाराच्या मूर्ती करण्याकडे कल आहे.
यंदा चिकण माती, रंग आदीचे भाव गगनाला भिडले असून मूर्तिकार मिळणेही आताच कठीण होऊन बसले आहेत. त्यांची दिवसाची मजुरी परवडणारी नसल्याची माहिती एक ज्येष्ठ मूर्तिकार प्रमोद नाटेकर यांनी दिली. चतुर्थी येऊन पोचलेली असून मूर्तिकारांनी मूर्ती बनवल्या असून कोल्हापूर, पेण या भागातूनही गणेश मूर्ती आणल्या जाणार आहेत,असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.