Heritage Village Da
गोंयकाराचें मत

Bandalika: प्राचीन स्थापत्यकलेचे वैभव सांगणाऱे, कदंब राजवंशाचे प्रमुख शहर; शरावतीच्या जलप्रपाताजवळ वसलेले 'बंदालिका गाव'

Bandalika Karnataka: देवीला बाणाशंकरी, बाणा देवी आणि बंदम्मा अशी नावे मिळाली आहेत. बहुधा, या देवतेच्या नावावरून हे गाव बंदालिका म्हणून ओळखले जात असावे.

Sameer Panditrao

सर्वेश बोरकर

कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात शिकारीपुरा येथील बंदालीका हे एक छोटेसे गाव. शिमोगा जिल्ह्याचा बहुतांश भाग पश्चिम घाटाच्या मालनाड प्रदेशात स्थित आहे. मालनाड प्रदेश अनेक नद्या आणि समृद्ध जैवविविधतेचे घर. पश्चिम घाटाच्या मालनाड प्रदेशात स्थित शिमोगा हे जिल्हा मुख्यालय.

या जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणजे प्रसिद्ध जोग धबधबा ज्याला गेरुसोप्पे धबधबा देखील म्हणतात, तो शरावती नदीमुळे निर्माण होतो, त्याचा समृद्ध वारसा आणि संस्कृतीव्यतिरिक्त, शिमोगा अनेक वन्यजीव आणि पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. बंदालिका हे गाव शिमोगा जिल्ह्यात शिकारीपुरापासून ३० किमी अंतरावर आहे.

बंदालीके हे निसर्गाच्या कुशीत वसलेले शांत व सुंदर गाव. शिलालेखांमध्ये या गावाला ‘बंदालीका’ किंवा ‘बंदनालीके’ असे संबोधले गेले आहे. त्या काळात ते जैन आणि शैव पंथाचे एक प्रमुख केंद्र होते असे म्हटले जाते. इथे प्राचीन स्थापत्यकलेचे वैभव सांगणाऱ्या मंदिरांची व अनेक शिलालेखांचा खजानाच पाहायला मिळतो. हा प्रदेश या वैभवाची व नगरखंड कदंब राजांची साक्ष देतो.

बंदालिका हे गाव कदंब राजांच्या काळात एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते, जे नगरखंड-७० या कदंब राजवंशाचे प्रमुख शहर म्हणून ओळखले जायचे. नगरखंडाचे कदंब हे बनवासी कदंब राजवंशापैकीच एक वंशज. त्यांचे वैयक्तिक शीर्षक महामंडलेश्वर असल्याचे मानले जाते. इ.स ९११ ते १५०८पर्यंत या शिमोगा जिल्ह्याच्या प्रदेशात त्यांचे राज्य होते.

राष्ट्रकूट, चालुक्य, कलचुर्य, होयसळ, यादव आणि विजयनगर राजेदेखील वेळोवेळी या प्रदेशावर राज्य करत होते. राष्ट्रकूट (सुमारे सातवे-आठवे शतक), नंतर चालुक्य (सुमारे अकरावे-बारावे शतक), कलचुरी, होयसळ (सुमारे बारावे शतक) आणि विजयनगर (सुमारे पंधरावे-सोळावे शतक) यांच्या लिखित नोंदींवरून या ठिकाणाचे ते महामंडलेश्वर असावेत व त्यांनी बांधलेल्या स्थापत्य कलेचे वैभव सांगणाऱ्या मंदिरांवरून या ठिकाणाचे महत्त्व स्पष्ट होते.

कल्याणच्या चालुक्यांच्या काळात ११व्या आणि १२व्या शतकात बंदालीकापुरा हे एक समृद्ध केंद्र होते. विस्तृत क्षेत्र व्यापलेल्या जुन्या शहराच्या अवशेषांमध्ये मोठ्या आकाराची अनेक जीर्ण मंदिरे अजूनही आपल्याला इथे पाहायला मिळतात. येथेच सापडलेल्या शिलालेखावरून असे दिसून येते की चंद्रगुप्त मौर्य यांच्याही राज्यांचा हा भाग असावा. १०व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच ते एक समृद्ध अग्रहार आणि जैनांसाठी एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र असावे.

शांतिनाथ बसडीच्या अवशेषांमध्ये एक गर्भगृह, एक अंतराल; चार खांबांचा महामंडप आणि बत्तीस खांबांचा मुखमंडप आपल्याला पाहायला मिळतो. हे सर्व उत्तर-दक्षिण दिशेस आहेत.

दक्षिण भिंतीतील महामंडपात दरवाजाच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठ आहेत, ज्यावर छिद्रित जाळ्या कोरलेल्यादेखील पाहायला मिळतात, ज्याची माहिती राष्ट्रकूट कृष्ण (कन्नरदेव)च्या काळातील आहे. इ.स. ९१२मध्ये बंदालिकावर राज्य करणाऱ्या जक्कीअब्बे या महिलेने मंदिराला देणगी दिली होती. ती एक धार्मिक जैन भक्त होती आणि तिने बंदालिकेमध्ये अनेक मंदिरे आणि बसडी बांधल्या. इ.स १२०० आणि १२०३च्या शिलालेखांवरून असे दिसून येते की बोप्पा शेट्टी नावाच्या व्यापाऱ्याने इथे एका जैन बसडीची पुनर्बांधणी केली होती.

या जुन्या शहराच्या अवशेषांमध्ये अनेक जीर्ण मंदिरांपैकी प्रसिद्ध मंदिर म्हणजे त्रिमूर्ती नारायण मंदिर.११६०मध्ये बांधलेले हे कल्याण चालुक्य काळातील त्रिकुटाचल (त्रिकोणी) मंदिर. या त्रिकुटाचल (त्रिकोणी) मंदिराची उत्तर आणि दक्षिण देवस्थानांवरील वरची रचना अजूनही शाबूत आहे, पण पश्चिमेकडील देवस्थान कोसळले आहे.

भव्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या, पूर्व-पश्चिम दिशेला असलेल्या या मंदिरात पश्चिम आणि दक्षिणेकडील कोशांमध्ये शिवलिंग आहे आणि उत्तरेकडील कोशात विष्णूचे शिल्प आहे. तिन्ही कोशांमध्ये कोनाड्यांनी वेढलेले शोभिवंत दरवाजे आहेत. तसेच पश्चिमेकडील कोशात त्याच्या प्रवेशद्वारावर शिल्पे कोरलेली आहेत.

या त्रिमूर्ती नारायण मंदिराच्या ईशान्येला वीरभद्राचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते जे १४व्या शतकात बांधले गेले असावे असे मानले जाते. वीरभद्राच्या चारही हातात तलवार, बाण, धनुष्य आणि ढाल आहे. मंदिराच्या पश्चिमेला एक ढिगारा आहे ज्यावर आठ हात असलेली देवी महिषासुरमर्दिनीची उभी असलेली प्रतिमा पाहायला मिळते.

जुन्या बंदालिका या चालुक्य शहराच्या ईशान्य कोपऱ्यात सोमेश्वराचे सुंदर मंदिर आहे, ज्याला बोप्पेस्वर मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर बोप्पा शेट्टी यांनी बांधले होते. या मंदिरात गर्भगृह, अंतराल आणि पूर्व-पश्चिम दिशेने अनेक खांब असलेला मंडप अजूनही सुस्थितीत पाहायला मिळतो. प्रवेशद्वाराच्या व दरवाजांच्या चौकटीच्या पायथ्याशी द्वारपाल आणि अप्सरांच्या आकृत्या चांगल्या प्रकारे कोरलेल्या आहेत तसेच अलंकृत मध्यभागी असलेल्या चौकटीवर गजलक्ष्मी विराजमान आहे.

दरवाजाच्या दोन्ही बाजूला कलात्मक चौकटी कोरलेल्या आहेत जे देवता, यक्ष, हंस, सिंह इत्यादींच्या आकृत्या असलेल्या गोलाकार लहान लहान शिल्पांनी विभागलेले आहे. चौकटीत छिद्रांच्या रांगांमध्ये रामायण आणि महाभारताच्या महाकाव्यांमधील प्रसंगांचे वर्णन करणारी कथात्मक शिल्पे आहेत. पण गर्भगृहात कोणतीच प्रतिमा नाही.

बंदालिका येथील आणखीन एक प्रसिद्ध मंदिर मायादेवी किंवा बाणाशंकरीला समर्पित आहे. स्थानिक भक्त देवीची पूजा महादुर्गा म्हणून करतात. असे मानले जाते की जुन्या काळात हे मंदिर तांत्रिक विधींचे केंद्र होते. दीर्घकाळ दुर्लक्षित असल्यामुळे या मंदिराभोवती अनेक झुडपे आणि लहान जंगली झाडे वाढली असल्याने, या देवीला बाणाशंकरी, बाणा देवी आणि बंदम्मा अशी नावे मिळाली आहेत. बहुधा, या देवतेच्या नावावरून हे गाव बंदालिका म्हणून ओळखले जात असावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT