Independence Day 2025 Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Independence Day 2025: आपल्या हाती जे ‘स्व-निर्णयाचं बळ’ आहे, त्याची ताकद स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरतरी प्रत्येकाच्या लक्षात येऊ दे

True meaning of freedom: देशाच्या स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होताना संबंध देशात उत्साहाचे वातावरण असून तिरंगा डौलाने फडकत आहे. अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी स्वातंत्र्यसमरात स्वतःच्या जीवाची आहुती दिली होती.

Sameer Panditrao

देशाच्या स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होताना संबंध देशात उत्साहाचे वातावरण असून तिरंगा डौलाने फडकत आहे. अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी स्वातंत्र्यसमरात स्वतःच्या जीवाची आहुती दिली होती, म्हणूनच आजचा दिवस स्वातंत्र्याची फळे चाखत आपण आनंदाने पाहतो आहोत.

‘स्वातंत्र्य’ या शब्दाची व्याख्या करणे सोपे नसते. एक व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून आपले अस्तित्व जगताना आपल्या स्वाभाविक वैशिष्ट्यांची, परंपरांची, मते-रिवाजांची जपणूक करणे आजच्या काळात फार कठीण बनले आहे. खरेतर ‘स्वातंत्र्य’ ही एक अध्यात्मिक भावना आहे. आपल्या जडणघडणीला, वाढीला आणि जीवनोत्सवाला ती आवश्यक ऊर्जा पुरवत असते. जेव्हा आपण मानसिकरित्या गुदमरत असतो, जेव्हा आपल्या अवकाशाचा संकोच होत असतो, तेव्हा कोणीतरी आपल्या अस्तित्वाला स्वातंत्र्यापासून परान्मुख करतो आहे, हे निश्चितच जाणा.

परकीय राजवटीखाली तर पारतंत्र्याच्या साऱ्या जाणिवा अधिकच वेदनादायी बनलेल्या असतात. ७८ वर्षापूर्वी अशा एका राजवटीचा अंत स्वातंत्र्यासाठी एल्गार पुकारणाऱ्या एका शक्तीने केला. गांधीजी, नेहरू, पटेल, भगतसिंग, खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद, लाला लजपतराय, टिळक आणि इतर अनेकजण या सहस्त्रमुखी शक्तीचे प्रभावी चेहरे होते. अनेक चेहरे प्रकाशात न येता लुप्तही झालेले असतील.

आपल्या हाती जे ‘स्व-निर्णयाच बळ’ आहे, त्याची ताकद स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर आतातरी प्रत्येकाच्या लक्षात पूर्णपणे येऊ दे. मिळालेल्या स्वातंत्र्याने अजूनही आपले पूर्ण-प्रकाशित रुप धारण केलेले नाही. नुकतेच पाकीस्तानला धडा शिकवण्यासाठी आॅपरेशन ‘सिंदूर’ राबवले. आपले स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी परकीय आक्रमणांची गरज आज राहिलेली नाही. दूरवर अमेरिकेने बदललेल्या एखाद्या लहानशा धोरणानेही जगातल्या अनेकांची ससेहोलपट होऊ शकते.

रशिया-युक्रेन युद्ध पृथ्वीच्या विरुद्ध भागात वसलेल्या समुहाला जेरीस आणताना आज आपण पाहतोच आहोत. देशाला पर्यायाने देशातील प्रत्येकाने सर्वार्थाने स्वतःला स्वयंपूर्ण बनवणे म्हणजेच ‘स्वातंत्र्य’ असा अर्थ घेऊ अन् प्रगतीचा सुपंथ धरू. एकंदर देशहितासाठी सारेजण धर्म,जात पंथ, प्रांत अन् पक्षही विसरून झटू. तरच आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळला, असे होईल. स्वयंपूर्ण असणे हेच एखाद्या समुहाच्या स्वातंत्र्याचे आज खरे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे, याचे भान या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात आपण करून घेऊ या. स्वयंपूर्ण समाजच आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपली ओळख राखून ठेऊन खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उद्‍घोष करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

Cristiano Ronaldo In Goa: फुटबॉल चाहत्यांची स्वप्नपूर्ती! ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात खेळणार

Goa Today Live News: बनावट कागदपत्रे प्रकरणी फोंड्याचे नगरसेवक शिवानंद सावंत यांना पुन्हा अटक!

हमारी विरासत, आने वाली नस्लों को राह दिखाएंगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांच्या मार्गावर?

SCROLL FOR NEXT