Antony Thattil Keerthy Suresh Wedding Dainik Gomantak
मनरिजवण

Antony Thattil: 15 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अडकणार लग्नबंधनात; कोण आहे कीर्तीचा करोडपती नवरा?

Keerthy Suresh Wedding: या शिवाय अँटोनी थाटीलच्या चेन्नईमध्ये अनेक कंपन्या देखील आहेत

Akshata Chhatre

South India Actress Keerthy Suresh Wedding Goa

दक्षिण चित्रपटांमधील अनेक प्रमुख चेहऱ्यांपैकी एक म्हणजे कीर्ती सुरेश. महानटी या चित्रपटामधून कीर्तीच्या करियरला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. घराघरांमधून कीर्तीला प्रेम दिलं जातंय. कीर्तीचा चाहतावर्ग देखील भलामोठा असून अनेक चाहत्यांना कीर्तीच्या लग्नाची ओढ लागली आहे. मंगळवारी समोर आलेल्या बातमीनुसार कीर्ती सुरेश 11 डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड अँटोनी थाटील यांच्यासोबत गोव्यात लग्नगाठ बांधणार आहे आणि यानंतर आता कीर्तीचा होणारा नवरा कोण अशी उत्सुकता अनेकांच्या मानत निर्माण झाली आहे.

कोण आहे कीर्तीचा होणारा नवरा? (Who is Antony Thattil?)

कीर्ती सुरेशचा होणारा नवरा म्हणजेच अँटोनी थाटील हा एक दुबईमधला उद्योगपती आहे आणि त्याची कोचीमध्ये अनेक हॉटेल्स आहेत. या शिवाय अँटोनी थाटीलच्या चेन्नईमध्ये अनेक कंपन्या देखील आहेत.

कीर्ती आणि अँटोनी गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार 2008-09 पासून कीर्ती आणि अँटोनी यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यावेळी कीर्ती शाळेत शिकत होती तर अँटोनी कॉलेजमध्ये होता. अँटोनी आणि कीर्ती हे एकमेकांसोबतचे फोटो जास्ती शेअर करत नसल्याने हे नातं अजून समोर आलं नव्हतं.

कीर्तीचं गोव्यात लग्न होणार...

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार कीर्ती सुरेश आणि अँटोनी थाटील गोव्यातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहेत आणि हा सोहळा केवळ त्यांच्या घरच्यांसाठी तसेच जवळच्या मंडळींसाठी मर्यादित असेल. डेक्कन हेराल्ड या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 9 डिसेंबर पासून कीर्तीच्या लग्न सोहळयाला सुरुवात होईल आणि पुढचे तीन दिवस हा विवाह सोहळा सुरु असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT