Virat Anushka luxury home Dainik Gomantak
मनरिजवण

Virat Kohli House: विराट-अनुष्काने अलिबागमध्ये उभारलाय ३२ कोटींचा स्वर्ग! आलिशान हॉलिडे व्हिलाचा Video आलाय समोर...

Virat Kohli house Alibaug: या जोडप्याने तब्बल ३२ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या स्वप्नवत घराचा व्हिडओ नुकताच समोर आला आहे आणि ते पाहून कुणीही थक्क होईल यात शंका नाही

Akshata Chhatre

Virat Kohli holiday house: कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेलयानंतर टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या अलिबागमधील आलिशान बंगल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या जोडप्याने तब्बल ३२ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या स्वप्नवत घराचा व्हिडओ नुकताच समोर आला आहे आणि ते पाहून कुणीही थक्क होईल यात शंका नाही.

आर्किटेक्चरल डायजेस्ट यांच्या माहितीनुसार, विराट आणि अनुष्काच्या या सुट्टीतील घराची रचना जगप्रसिद्ध फिलिप फौचे यांच्या नेतृत्वाखालील स्टीफन अँटोनी ओल्मेस्डाहल ट्रुएन आर्किटेक्ट्स या संस्थेने केली आहे. निसर्गरम्य अलिबागमध्ये तब्बल ८ एकरच्या विस्तीर्ण जागेत हा व्हिला उभा आहे. या जोडप्याने ही जमीन २०२२ मध्ये सुमारे १९ कोटी रुपयांना खरेदी केली होती.

१०,००० चौरस फुटांच्या भव्य जागेत पसरलेल्या या व्हिलामध्ये आधुनिक सुखसोयींचा आणि सौंदर्यपूर्ण डिझाइनचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. सुसज्ज असं एक मोठं स्वयंपाकघर आहे.

चार आलिशान बाथरूम आणि एक जकूझी असल्याने आराम करण्याची सोय उपलब्ध आहे. घराबाहेर एक मोठी हिरवीगार बाग आहे, जिथे खेळण्याचा आणि निसर्गाचा आनंद घेता येतो. सुरक्षित झाकलेली पार्किंगची सोय आहे, तसेच कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थान देखील आहे.

या मालमत्तेच्या बांधकामात उच्च दर्जाचे इटालियन मार्बल, प्राचीन दगड आणि तुर्की चुनखडीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे घराला एक खास आणि आकर्षक लुक मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विराटने या व्हिलाच्या बांधकामासाठी अंदाजे १०.५ कोटी ते १३ कोटी रुपये खर्च केले आहेत.

अनुष्का आणि विराटच्या अलिबाग व्हिलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लिव्हिंग रूममधील दुहेरी उंचीचे खास डिझाइन केलेले कट-आउट सीलिंग, यामुळे घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश येतो आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. या हॉलिडे होमच्या लिव्हिंग एरियामध्ये मोठे आणि आरामदायक सोफा सेट ठेवण्यात आले आहेत. भिंतींच्या पांढऱ्या रंगाला जुळणारे आकर्षक पडदे लावण्यात आले आहेत.

यासोबतच, घरात अनेक सुंदर रोपे आणि झाडे लावण्यात आली आहेत, ज्यामुळे एक ताजेतवाने आणि प्रसन्न वातावरण तयार झाले आहे. विराट आणि अनुष्काचा हा अलिबागमधील व्हिला म्हणजे खरंच एक स्वप्नवत घर आहे, जिथे आधुनिकता आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT