IFFI Goa 2024 Dainik Gomantak
मनरिजवण

UNESCO ICFT Gandhi Medal Award: गांधी मेडलसाठी 10 चित्रपटांची निवड, जाणून घ्या कोणी मारली बाजी?

ICFT-UNESCO Gandhi Medal Award Ceremony : सिनेमातील उत्कृष्टतेला आणि गांधीवादी मूल्यांना मान देण्याची परंपरा इफ्‍फीत कायम ठेवत आयसीएफटी-युनेस्को गांधी मेडल समारोप सोहळ्यात प्रदान केले जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सिनेमातील उत्कृष्टतेला आणि गांधीवादी मूल्यांना मान देण्याची परंपरा इफ्‍फीत कायम ठेवत आयसीएफटी-युनेस्को गांधी मेडल समारोप सोहळ्यात प्रदान केले जाणार आहे. शांतता, सहनशीलता आणि अहिंसा या मूल्यांचा गौरव करणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरदर्शन आणि ऑडियो-व्हिज्युअल संदेशवहन परिषद (आयसीएफटी) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जातो. यावर्षी दहा उत्कृष्ट चित्रपटांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

दहा विविध भाषांतील, प्रकारांतील आणि संस्कृतींतील (Culture) उत्कृष्ट चित्रपटांचा त्‍यात समावेश आहे. ज्युरी पॅनेलने चित्रपटांचे नैतिक गहनता, कलात्मक उत्कृष्टता आणि आंतरसांस्कृतिक संवादाला प्रोत्साहन देण्याच्या क्षमतेच्या आधारे मूल्यांकन केले आहे. पुरस्काराबाबत बोलताना एनएफडीसीचे कलात्मक संचालक पंकज सक्सेना म्हणाले की, आजच्या जगात आंतरसांस्कृतिक संवादाला महत्त्व आहे. सिनेमा विविध संस्कृतींना एकत्र आणण्याची शक्ती बाळगतो. समजूत, सहनशीलता आणि प्रेमाची मूल्ये विकसित करतो.

निवड झालेले चित्रपट

ज्युरी सदस्य क्सुयेयुआन हन यांनी २०१५ पासून सुरू असलेल्या सहकार्याची पुनर्पुष्टी केली. त्‍या म्हणाल्‍या की, प्रत्येक वर्षी आम्ही युनेस्कोच्या (UNESCO) तत्त्वांशी आणि गांधीजींच्या शांतता आणि अहिंसेच्या भावनेशी जुळणाऱ्या चित्रपटांची निवड करतो. यावर्षी क्रॉसिंग, फॉर राणा, लेसन लर्नड, मीटिंग विथ पोल पॉट, सातु-इयर ऑफ द रॅबिट, ट्रान्सअमेझोनिया, अनसिंकबल, अमार बॉस, जुईफूल आणि श्रीकांत यासारखे चित्रपट या यादीत आहेत.

निवड प्रक्रियेतील ज्युरी

इसाबेल डॅनेल, फिप्रेसी : आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघाच्या मानद अध्यक्षा

सर्ज मिशेल, सीआयसीटी : आयसीएफटीचे उपाध्यक्ष

मारिया क्रिस्‍टिना इग्लेसियस : युनेस्कोच्या सांस्कृतिक क्षेत्र कार्यक्रमाच्या माजी प्रमुख

डॉ. अहमद बेदजाऊई : अल्जेरियन्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक संचालक

क्सुयेयुआन हन : सीआयसीटी-आयसीएफटी युवा शाखेचे क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन प्लॅटफॉर्मचे संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT