Allu Arjun Viral Goa Video Dainik Gomantak
मनरिजवण

Allu Arjun: गोव्यात खरंच दारु खरेदी केली का? सात वर्षानंतर सुपरस्टार अल्लु अर्जुनने सांगितले Viral Video मागील सत्य

Allu Arjun Viral Goa Video: सुपरस्टार अल्लु अर्जुन गोव्यातील एका वाईन शॉपमध्ये दारु खरेदी करताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सात वर्षापूर्वी समोर आला होता.

Pramod Yadav

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुन त्याच्या आगामी पुष्पा-२ च्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अल्लु विविध TV शोमध्ये हजेरी लावत आहे. नुकतेच त्याने दक्षिणेतील अनस्टॉपेबल एनबीके या टॉक शोमध्ये हजेरी लावली.

यामध्ये अल्लुला त्याच्या सात वर्षापूर्वीच्या गोव्यातील व्हायरल व्हिडिओबाबत प्रश्न विचारण्यात आला. अल्लु अर्जुनने सात वर्षानंतर व्हायरल व्हिडिओ मागील सत्य सांगितले आहे.

काय होता गोव्यातील व्हिडिओ? (Allu Arjun Goa Video)

सुपरस्टार अल्लु अर्जुन गोव्यातील एका वाईन शॉपमध्ये दारु खरेदी करताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सात वर्षापूर्वी समोर आला होता. एका एक्स युझरने काही दाक्षिणात्य स्टारचा व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यावर रिप्लाय देताना अल्लुचा गोव्यातील व्हिडिओ पोस्ट करण्यात आला.

अल्लु अर्जुन वाईन शॉपमध्ये दारु खरेदी करताना दिसत आहे. यावरुन अल्लुवर काहींनी टीका केली होती तर काहींनी त्याच्या कृतीला समर्थन केले.

अनस्टॉपेबल एनबीके शोमध्ये खुलासा (Unstoppable With NBK Allu Arjun)

अल्लु अर्जुनने अनस्टॉपेबल एनबीके शोमध्ये हजेरी लावली यावेळी त्याला गोव्यातील दारु खरेदी करतानाचा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर अल्लुने पहिल्यांदाच चप्पु तोडत व्हिडिओमागील सत्यता सांगितली.

अल्लुने या प्रश्नावर उत्तर देताना गोव्यात दारु खरेदी केल्याचे मान्य केले पण ती दारु त्याच्यासाठी नव्हे तर मित्रासाठी खरेदी केल्याचे त्याने सांगितले. तसेच, ज्याच्यासाठी दारु खरेदी केली तो मित्र देखील यावेळी कार्यक्रमात हजर होता, असे पिंकव्हिलाच्या रिपोर्टमध्ये म्हटले.

अल्लु अर्जुनला यावेळी राष्ट्रीय पुरस्काराबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय होती? असे त्याला विचारण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला तेलगु अभिनेता असणे माझ्यासाठी फारच अभिमानाची गोष्ट होती.

यापूर्वी कोणत्याच तेलगु अभिनेत्याला पुरस्कार मिळाला नाही हे समजल्यानंतर मी तात्काळ पुरस्कार स्वीकारला असे, अल्लु म्हणाला. अल्लु अर्जुनची AHA या Youtube Channel वरती दोन भागात ही मुलाखत पाहता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT