Sneha Reddy Birthday Celebration Dainik Gomantak
मनरिजवण

Sneha Reddy In Goa: पुष्पाच्या पत्नीने गोव्यात साजरा केला वाढदिवस, पाहा Celebration चे खास फोटो

Sneha Reddy Birthday Celebrations In Goa: स्नेहाच्या फोटोत तिचा पती अल्लू अर्जुन, त्यांची मुले अयान आणि अरहा पोझ देताना दिसत आहेत.

Pramod Yadav

Sneha Reddy Birthday Celebrations In Goa

पणजी: दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन याने त्याची पत्नी स्नेहा रेड्डीचा नुकताच गोव्यात वाढदिवस साजरा केला. अल्लूने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कुटुंबासह गोव्यात हजेरी लावली. स्नेहा रेड्डीच्या गोव्यातील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे विविध फोटो सोशल मिडियावरुन समोर आले आहेत.

स्नेहा रेड्डीने इंस्टाग्राम अकाउंटवर गोव्यातील तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. स्नेहाच्या या फोटोंमध्ये तिचे मित्र आणि कुटुंबीय आहेत.

स्नेहाच्या फोटोत तिचा पती अल्लू अर्जुन, त्यांची मुले अयान आणि अरहा पोझ देताना दिसत आहेत.

स्नेहाने शेअर केलेल्या पुढच्या फ्रेममध्ये बड्डे गर्ल तिच्या मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांनी आणलेला एक स्वादिष्ट केक कापताना दिसत आहे. स्नेहाने एका बागेच्या मध्यभागी मोकळ्या जागेत वाढदिवसाचा केक कापला.

अल्लू अर्जुनच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. बॉलीवूड ते टॉलीवूड सिने तारकांनी स्नेहाला खास शब्दात शुभेच्छा दिल्यात. अनेकांनी स्नेहच्या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पती अल्लूने देखील लाडक्या पत्नीसाठी शुभेच्छा देत तिच्या उत्तम आरोग्याची मनोकामना व्यक्त केली. अल्लूने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत स्नेहाला शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT