Allu Arjun IFFI Award Dainik Gomantak
मनरिजवण

Allu Arjun IFFI Award: 'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनचा इफ्फीत होणार गौरव, दिला जाणार खास पुरस्कार

IFFI Goa 2024 Closing Ceremony: ज्येष्ठ ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नॉयस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

Pramod Yadav

IFFI Goa 2024 Closing Ceremony

पणजी: गोव्यात सुरु असलेल्या ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज (२८ नोव्हेंबर) सांगता होत आहे. आठ दिवस चालेल्या या चित्रपट महोत्सवात 75 देशांतील 200 हून अधिक चित्रपटांसह, उद्योगातील दिग्गजांचे मास्टर क्लास आणि प्रेरणादायी पॅनेल चर्चा पार पडली. यावर्षीचा सूवर्ण मयूर पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, सांगता संमारंभात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा गौरव केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणाऱ्या कलाकारांमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार, नायक अल्लू अर्जुन, नायिका रश्मिका मंदान्ना यांचाही समावेश आहे. अभिनेता अल्लू अर्जुन याला भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. तर, ज्येष्ठ ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नॉयस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

सांगता समारंभार गोल्डन पीकॉक पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष आणि महिला) आणि दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्मसाठी पुरस्कार प्रदान केले जातील. यंदापासून या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट ओटीटी वेब सीरिजचा पुरस्कार कोणाला मिळणार याचीही लोकांना उत्सुकता आहे.

यंदाच्या इफ्फी महोत्सवाची खास गोष्ट म्हणजे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) देखरेखीखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपट पुरस्कार संचालनालय (DFF) रद्द करुन ते NFDC मध्ये विलीन केले आहे. सांगता समारंभाला “रिदम्स ऑफ इंडिया” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे अंतिम सादरीकरण भारताच्या विविधतेतील एकतेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘देस मेरा रंगीला’ या गाण्याचे भव्य सादरीकरण असल्याचे सांगितले जाते.

सांगता समारंभाला कलाकार लावणार हजेरी

दिल राजू, आनंद तिवारी, अमृतपाल सिंग बिद्रा आणि ऑस्ट्रेलियन निर्माता स्टीफन वूली हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जया प्रदा, श्रिया सरन, प्रतीक गांधी, समीर कोचर, श्रेया चौधरी, ऋत्विक भौमिक आणि नवीन कोहली यांनीही समारोप समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यताआहे. संगीत सादरीकरणासाठी अमाल मलिक आणि मामे खान यांना बोलावण्यात आले आहे. स्टेबिन बेन, भूमी त्रिवेदी देखील या सोहळ्यात गाणी गाणार असून यादरम्यान श्रेया सरन तिचा खास डान्स परफॉर्मन्स देणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT