Vijay Thalapathy at Keerthy Suresh Wedding  Dainik Gomantak
मनरिजवण

Thalapathy Vijay: कीर्तीच्या लग्नात थलापतीची हजेरी; ट्विटरवर Photo Viral

Keerthy Suresh and Antony Thattil Wedding: दक्षिणेतील सुपरस्टार थलापती विजय याने कीर्तीच्या लग्नाला उपस्थिती लावली आहे

Akshata Chhatre

Vijay Thalapathy at Keerthy Suresh Wedding

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि तिचा प्रियकर गोव्यात लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज आहेत. गुरुवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी एका खासगी समारंभात कीर्ती लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कीर्ती आणि अँटोनी यांच्या लग्नाची सगळीकडेच जोरदार चर्चा होती. कीर्तीचा हा लग्नसमारंभ काही जवळच्या मंडळींसह पार पाडणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या आणि यांपैकी दक्षिणेतील सुपरस्टार थलापती विजय याने कीर्तीच्या लग्नाला उपस्थिती लावली आहे.

दक्षिणेतील नावाजलेल्या कलाकारांमध्ये थलापती विजय हे नाव घेतलं जातं. विजय सोबत असलेल्या काही जवळच्या मंडळींनी ट्विटरवर विजय गोव्यात असल्याची माहिती दिली आणि विजयच्या चाहत्यांनी लगेच आमचा विजय कीर्तीच्या लग्नात उपस्थित आहे असं म्हणत हा फोटो शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी गाजतोय.

विजय या फोटोमध्ये पारंपरिक दक्षिणी वेशात दिसतोय आणि त्याच्यासोबत काही लोकं सुद्धा पारंपरिक वेशात दिसतायत. कीर्ती सुरेशने स्वतः अजून लग्नाचे फोटोज शेअर केलेले नाही, मात्र चाहत्यांना तिच्या लग्नाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT