Shashi Tharoor Tweet Dainik Gomantak
मनरिजवण

Shashi Tharoor Tweet : आर्यन खानची वेब सीरीज बघून शशी थरूर यांनी केले ट्विट, शाहरुखला म्हणाले, "एक बाप म्हणून तुला... "

Shashi Tharoor Aryan Khan Tweet : शशि थरूर यांनी आर्यन खान याच्या वेब सीरीजची प्रशंसा करत सोशल मीडियावर एक विस्तृत पोस्ट शेअर केली

Akshata Chhatre

Aryan Khan Web Series Review: काँग्रेस खासदार आणि प्रसिद्ध लेखक शशि थरूर यांनी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या दिग्दर्शकीय पदार्पणातील वेब सीरीजची प्रशंसा करत सोशल मीडियावर एक विस्तृत पोस्ट शेअर केली आहे. सर्दी आणि खोकल्यामुळे त्यांनी आपले दोन दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द केले होते. याच काळात, त्यांची बहीण स्मिता थरूर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना ही सीरीज पाहण्याचा सल्ला दिला असं ते म्हणालेत.

थरूर यांनी 'X' वर पोस्ट करत सांगितले की, "हा माझ्यासाठी आतापर्यंतच्या सर्वोत्तम अनुभवांपैकी एक ठरला आहे: एब्सोल्यूट OTT GOLD!" त्यांनी पुढे लिहिले की, आर्यन खानची ही सीरीज नुकतीच पाहून झाली आणि स्तुती करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

'निर्भीड दिग्दर्शन आणि धारदार लेखन'

थरूर यांनी आर्यन खानच्या निर्मितीची प्रशंसा करताना म्हटले की, या सीरीजची सवय होण्यास थोडा वेळ लागतो, पण त्यानंतर आपण आपोआप तिच्याशी जोडले जातो. वेब सिरीजबद्दल पुढे लिहिताना ते म्हणालेत की, "लेखन धारदार आहे, दिग्दर्शन निडर आहे आणि या व्यंग्याची निखळ हिम्मतच बॉलिवूडला आवश्यक होती.

एक अलौकिक, अनेकदा मजेदार, कधीकधी भावूक आणि नेहमीच ग्लॅमरच्या पलीकडे पाहणारी, प्रत्येक सिनेमाई क्लीशेवर धारदार बुद्धिमत्तेने वार करणारी ही वेब सिरीज आहे. यातील 'इनसाइडर जोक्स' प्रेक्षकांना पडद्यामागील घटनांशी जोडतात.

शाहरुख खानसाठी भावनिक संदेश

थरूर यांनी आपल्या समीक्षेचा समारोप करताना आर्यन खानसाठी खास संदेश लिहिला: "आर्यन खान, तुला सलाम! तू एक उत्कृष्ट कलाकृती दिली आहेस. यासोबतच, त्यांनी आर्यनचे वडील आणि या सीरीजचे निर्माते शाहरुख खान यांना टॅग करत एक भावनिक संदेश दिला, ते म्हणाले की, "एका पिता म्हणून दुसऱ्या पित्याला, मला सांगायचे आहे, तुम्हाला निश्चितच खूप अभिमान वाटत असेल!!" शाहरुख खानच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट'ने नेटफ्लिक्ससाठी ही सीरीज तयार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

SCROLL FOR NEXT