serendipity arts festival 2024  Dainik Gomantak
मनरिजवण

Serendipity Arts Festival: हरवलेल्या आवाजाची गोष्ट; 'सेरेंडिपिटी'त सादर झालेले खास सादरीकरण

Do You Know This Song By Mallika Taneja: सेरेंडिपिटी कला महोत्सवात सादर झालेले ‘डू यू नो धिस सॉन्ग’ हे सादरीकरण म्हणजे वैयक्तिक नुकसान आणि दुःख याबद्दलची एक गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर ते प्रेमाची, आपला आवाज शोधण्याची गोष्ट देखील आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Do You Know This Song by Mallika Taneja Performance

सेरेंडिपिटी कला महोत्सवात सादर झालेले ‘डू यू नो धिस सॉन्ग’ हे सादरीकरण म्हणजे वैयक्तिक नुकसान आणि दुःख याबद्दलची एक गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर ते प्रेमाची, आपला आवाज शोधण्याची गोष्ट देखील आहे. स्वनाळूपणे शिवलेल्या परंतु नंतर तुटलेल्या स्वप्नांच्या या गोष्टीत, गायिका बनवण्याची तळमळ असणार्‍या परंतु नंतर घरगुतीपणात अडकलेल्या एका स्त्रीची गोष्ट आहे. ढासळणाऱ्या आठवणींच्या तुकड्यांमधून तो आवाज आणि ती गाणी यांची काळजीपूर्वक पुनर्रचना करून ‘डू यू नो धिस सॉन्ग’ या नाट्यातून त्याची रंगमंचावर मांडणी केली गेली आहे.  

हे सादरीकरण सुरू होते तेव्हा मंचावर अनेक छोट्या बाहुल्या उभ्या करून ठेवलेल्या दिसतात. त्यांच्यासोबत मल्लिका तनेजा स्वत: उभी असते. 'सो जा रे गुडिया रे, सपनों की दुनिया मे सो जा रे, मिल ले तू हर उससे जो तुझसे रुठा, बाहो मे मिल जा रे, भूल जा रे मिल जा रे....' हे गीतही सोबत चालू असते. मल्लिका मग लोकांना एक गोष्ट सांगायला सुरुवात करते. गायिका होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या एका स्त्रीची ती गोष्ट असते. गोष्ट सांगता सांगता मल्लिका स्वतःच ‘ती’ गायिका बनते आणि तिच्या आणि मंचावर मांडून ठेवलेल्या बाहुल्यांचे नाते सावकाश उलगडायला सुरुवात होते. 

लहानपणी बाहुल्यांचे विश्व हेच खरे मानून चालणाऱ्या आणि नंतर वास्तवाचे भान आल्यानंतर आपली सारी स्वप्ने एक एक करून निस्तेज, अचेतन बाहुल्या बनून जाताना पाहणाऱ्या एका स्त्रीची वेदना हे नाटक कथन करते. या नाटकात ‘ती’ म्हणते, 'आपले असे काही आवाज असतात जे इतक्या दूर जातात की ते हरवतात.' अशाच एका हरवलेल्या आवाजाची गोष्ट अनोख्या शैलीत या नाटकात मांडली गेली आहे. या स्त्रीची शोकांतिका या नाटकात वापरल्या गेलेल्या प्रत्येक गीतातून प्रतिकात्मकपणे  प्रतीत होत राहते.

'कितना मुश्किल है सो जाना, सपनों को पाना' हे गीत गाताना ती जेव्हा कुणालातरी उद्देशून हे म्हणते, ‘अच्छी बात है आप रात को अच्छे से सो पाये’, तेव्हा तिचे स्वप्न हरवले गेल्यानंतर तिच्या वाट्याला आलेल्या तळमळणाऱ्या रात्रींची कल्पना प्रेक्षकांना आपोआपच येते. तुटलेल्या स्वप्नांमधून साकार झालेल्या साऱ्या बाहुल्यांचा गठ्ठा करून ती अखेरीस जेव्हा त्यांच्या समवेत मलूलपणे झोपते तेव्हा असंख्य स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या  शोकांतिकेचे एक भव्य रूपच तिथे साकार झालेले असते.

तिचा हार्मोनियम, मायक्रोफोन, बालपणीची खेळणी यामधून ही कहाणी उलगडत जाते. ती कोण होती आणि कशी हरवली हे समजून घेताना प्रेक्षक हेलावून जातो. हरवलेल्या गायिकेची कहाणी कथन करताना मल्लिका अभिनेत्री म्हणून प्रवाहीपणे वावरते आणि आपल्या या शोधात ती प्रेक्षकांनाही सामील करून घेते. वर्षभर मल्लिकाने मुलाखती घेत दीर्घकाळ विसरलेल्या आवाजांची ही कहाणी गुंफली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT