Actor Mukul Dev Dainik Gomantak
मनरिजवण

Actor Mukul Dev Death: प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचे निधन, 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Mukul Dev: अनेक दिवसापासून मुकुल देव आजाराचा सामना करत होता. दरम्यान, ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Pramod Yadav

Actor Mukul Dev Passed Away

दिल्ली: मनोरंजन जगतातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते मुकुल देव यांचे रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाची बातमी कळताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. मुकुल काही दिवसांपासून आजाराशी लढा देत होते.

विंदू दारा सिंग यांनी मुकुल यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. मुकुल देव यांच्या निधनाने विंदू दारा सिंह यांना खूप दुःख झाले आहे. अभिनेत्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर करून त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

"RIP भाऊ मुकुल देव. तुझ्यासोबत घालवलेला वेळ मी नेहमीच लक्षात ठेवेन आणि #SonOfSardaar2 मधील तुझे शेवटचे गाणे प्रेक्षकांना आनंद देईल हासण्यास भाग पाडेल", असे विंदूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

"अभिनेता नील नितीन मुकेश याने देखील मुकुल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुकुल यांच्या निधनाच्या वृत्त ऐकूण मला दु:ख झाले. कामाच्या बाबतीत पॉवरफूल आणि प्रेमळ व्यक्ती, मुकुल यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत. ओम शांती!", अशा शब्दात त्यांशी मुकुल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुकुल यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी नेहमीच त्याच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये तसेच टेलिव्हिजन आणि अनेक संगीत अल्बममध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामाने चाहत्यांना प्रभावित केले आहे.

याशिवाय मुकुलने काही बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले होते. 'यमला पगला दीवाना' या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना ७ वा अमरीश पुरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT