Rashmika Mandanna IFFI Goa 2024 Video Viral Dainik Gomantak
मनरिजवण

Rashmika Mandanna:...कारण ते खरं नाही! महागडी अभिनेत्री असल्याचे रश्मिकाला नाही मान्य, इफ्फीतला Video Viral

Rashmika Mandanna IFFI Goa 2024 Video Viral: चेहऱ्यावर क्युट स्माईल घेऊन रश्मिका रेड कार्पेटवरुन इफ्फीच्या समारोपस्थळी गेली.

Pramod Yadav

Rashmika Mandanna IFFI Goa 2024 Video Viral

पणजी: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या बहुचर्चित ‘पुष्पा-2’ या चित्रपटाचे प्रमोशन भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात प्रमोशन करण्यात आले. रश्मिकाने इफ्फीच्या सांगता समारंभासाठी हजेरी लावली. हिरव्या रंगाच्या साडीत रश्मिकाने इफ्फीच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रश्मिकाने रेड कार्पेटवर एन्ट्री घेताच सर्वांचा नजरा तिच्यावर खिळल्या.

चेहऱ्यावर क्युट स्माईल घेऊन रश्मिका मंदाना रेड कार्पेटवरुन इफ्फीच्या समारोपस्थळी गेली. यावेळी तिने मिडियासमोर फोटोसोठी पोझ दिल्या. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये इफ्फीचा समारोप पार पडला.

सिनेसृष्टीतील महागडी अभिनेत्री

रश्मिका सिनेसृष्टीतील महागडी अभिनेत्री असल्याची चर्चा सर्वत्र पसरली असताना, तिला याबाबत विचारणा केली. मॅडम तुम्ही सिनेसृष्टीतील महागडी अभिनेत्री आहात? याबाबत तुम्हाला काय सांगायचंय? अशी विचारणा रश्मिकाला करण्यात आली. यावर रश्मिकाने मला याबाबत काही माहिती नाही. कारण ते खरं नाहीये, असे उत्तर रश्मिकाने दिले.

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे आणि त्याने रिलीज होण्यापूर्वीच इतिहास रचला आहे. प्रत्येकजण या चित्रपटाची वाट पाहत आहे आणि त्याचे प्रदर्शन इतके भव्य होणार आहे की हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट बनला आहे.

सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट 3000 हून अधिक ठिकाणी आणि 11,500 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच अल्लू अर्जुनचा हा चित्रपट जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणारा भारतीय चित्रपट आहे.

इफ्फीच्या समारोप सोहळ्यात रश्मिकाचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित इतर बॉलीवूड कलाकारांचे देखील सत्कार करण्यात आला. १२ फेल फेम अभिनेता विक्रांत मेस्सी याला यावेळी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द ईयर हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, यावर्षीचा मानाचा गोल्डन पिकॉक पुरस्कार टॉक्झिक या चित्रपटाला देण्यात आला. तर, लंपन या वेब सिरिजला उत्कृष्ट ओटीटी फॉरमॅटमधील वेब सिरिजचा पुरस्कार देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT