Nagarjuna IFFI 2025 Dainik Gomantak
मनरिजवण

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

Shiva Movie Re Release: नागार्जुन यांच्या ‘शिवा’ या सिनेमाने दक्षिणात्य आणि हिंदी सिनेमाचे फॉर्म्युलेच बदलून टाकले. दिग्दर्शक म्हणून राम गोपाल वर्मा यांचा हा पहिलाच सिनेमा होता.‌

गोमन्तक डिजिटल टीम

नागार्जुन यांच्या ‘शिवा’ या सिनेमाने दक्षिणात्य आणि हिंदी सिनेमाचे फॉर्म्युलेच बदलून टाकले. दिग्दर्शक म्हणून राम गोपाल वर्मा यांचा हा पहिलाच सिनेमा होता.‌

(त्यापूर्वी राम गोपाल वर्मा सिनेमाच्या ‘डीव्हीडी’ व्यवसायात होते. सिनेमा या विषयाचे कुठलेही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेले नव्हते हे विशेष) आज पाच दशकानंतर ‘शिवा’ या सिनेमाला डिजिटल माध्यमातून पुन्हा नवीन रूप देऊन सादर केले जात आहे.

त्यानिमित्ताने ‘प्रिझर्विंग द क्लासिक द जर्नी ऑफ शिवा’ (अभिजात सिनेमाचे जतन: शिवा सिनेमाचा प्रवास) या विषयावर शिवा सिनेमाचे नायक नागार्जुन आणि त्या सिनेमाचे रूपांतर घडवण्यात प्रमुख भूमिका निभावलेले तंत्रज्ञ सी. व्ही. राव यांचे सत्र कला अकादमीत आयोजित झाले होते. या सत्रामधून ‘शिवा’ सिनेमाला पडद्यावर परत आणण्याचा कलात्मक, तांत्रिक आणि भावनिक प्रवास उलगडला गेला. 

या सत्राच्या निमित्ताने नागार्जुन यांनी त्यांच्या स्वतःच्या सिनेमा क्षेत्रातील प्रवासाबद्दलही सांगितले. नागार्जुन यांचे वडील अक्कीनेरी नागेश्वर राव हे देखील प्रसिद्ध तेलगू अभिनेते होते.

एका फिल्मी कुटुंबात जन्माला आल्यामुळे, कळायला लागण्याच्या वयापासून आपण सिनेमा क्षेत्रातच आहे असे नागार्जुन सांगतात. आपले वडील हे सिनेमाला धर्म मानायचे व एका विशिष्ट शिस्तीत काम करायचे त्यांच्यामुळे आपल्यातही तीच शिस्त बाणवली गेली असे ते म्हणतात.  नागार्जुन म्हणाले की, त्यांनी आतापर्यंत ३५ नवोदित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे आणि आताही आपला शंभरवा सिनेमा ते नवीन दिग्दर्शकांबरोबर करत आहेत. 

अजूनही ‘शिवा’ म्हणूनच हाक मारतात!

‘शिवा’ पुन्हा रिस्टोर करावा असे त्यांना का वाटले हे सांगताना नागार्जुन म्हणाले की, शिवाला त्यांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. शिवा रिलीज होऊन इतकी वर्षे होऊनही देशभर अनेक ठिकाणी त्यांना लोक अजूनही ‘शिवा’ म्हणूनच हाक मारतात. हा सिनेमा एक ‘कल्ट’ बनला आणि इतर अनेक निर्मितीना त्यातून प्रेरणा मिळाली. त्याशिवाय ‘रिस्टोरेशन’ हे सिनेमा जतन करण्याचे एक चांगले माध्यम असल्यामुळे आणि त्यासाठी तंत्र उपलब्ध झाल्यामुळे ‘शिवा रिस्टोर’ करावा हे साहजिकच होते. 

...म्हणून दर्जाचा विचार महत्त्वाचा!

हा सिनेमा ‘रिस्टोर’ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले सी. व्ही. राव यांनी जुन्या अभिजात सिनेमांचे रिस्टोरेशन करण्यामागचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, जुन्या सिनेमांच्या निगेटिव्ह नष्ट होत चालल्या आहेत किंवा त्या जतन करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो तसेच कष्टही घ्यावे लागतात. त्यामुळे आज सिनेमा (डिजिटली) नव्या रूपात जतन करून ठेवणे हे महत्त्वाचे बनले आहे.‌ उच्च दर्जाची दृश्यात्मकता (Visuals) आणि ‘डॉल्बी ऑटोमोस’ ध्वनीची व्यवस्था हही रिस्टोरेशनचा आवश्यक भाग असतो. प्रेक्षक पैसे मोजून तिकीट घेऊन प्रेक्षागृहात येतात म्हणून रिस्टोरेशन करताना दर्जाचा विचार महत्वाचा बनतो. 

‘शिवा’चा ध्वनी ‘मोनो’ पद्धतीचा; राव

‘शिवा’चा मूळ ध्वनी ‘मोनो’ पद्धतीचा होता. रिस्टोर केलेल्या शिवाच्या ध्वनीबद्दल सांगताना सी. व्ही. राव म्हणाले की, या सिनेमासाठी ध्वनीचा काही भाग पुन्हा निर्माण केला गेला आहे. मूळ सिनेमा शूट करताना जो‘ॲम्बिएंट साऊंड’ सिनेमात होता तो आता पुन्हा मिळणे शक्य नसल्यामुळे वेगवेगळे स्तर निर्माण करून त्या प्रकारचा साऊंड पुन्हा तयार केला गेला. सिनेमातील मूळ ‘मोनो’ ध्वनीचे रूपांतर जगात अजून कुठेच डॉल्बी ऑटमोस’मध्ये झालेले नाही, मात्र शिवासाठी ते सर्वप्रथम केले गेले हे नागार्जुन यांनी यावेळी मुद्दाम नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session 2026: विधानसभेत विधेयकांचा 'पंच'! शिक्षण, कृषी, व्यापार अन् पंचायतींसाठी कायदे मंजूर; अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्याच्या हिताचे मोठे निर्णय

Operation Sindhur: 'ऑपरेशन सिंदूर'चा थरार! भारतीय लष्कराने जारी केला सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ; पाकच्या एअरबेस आणि रडार यंत्रणेच्या विध्वंसाचा पुरावा जगासमोर

"ऑपरेशन सिंदूर सर्वात मोठा हल्ला, अल्लाहनचं आम्हाला वाचवलं," लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरची जाहीर कबुली; पाकड्यांचा पुन्हा बुरखा फाटला

Goa Winter Session 2026: "आधार कार्ड म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं; मतदार यादीतून गैर-नागरिकांची नावं हटवणार

Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO

SCROLL FOR NEXT