IFFI 2025: 'इफ्फीत मी पहिल्यांदाच आली आहे'! अभिनेत्री रितिका श्रोत्रीचा हटके अंदाज; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सिनेमाचे होणार स्क्रीनिंग

Ritika Shrotri IFFI 2025: बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या ‘नाच गं घुमा’ नंतर लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी हे आता नव्या सिनेमासाठी सज्ज झाले आहेत.
Ritika Shrotri IFFI 2025
Ritika Shrotri IFFI 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या ‘नाच गं घुमा’ नंतर लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी हे आता नव्या सिनेमासाठी सज्ज झाले आहेत. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ इतका विनोदी चित्रपट आहे की, तो पाहून तुम्हाला भरपूर हसू येईल. इफ्फीत या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही नक्की पाहा.

‘ओटीटी’वर लवकरच तो येणार आहे. इफ्फीसाठी या चित्रपटाची निवड झाल्याचे कळताच मला खूप आनंद झाला. इफ्फीत मी पहिल्यांदाच आली आहे, असे या चित्रपटातील अभिनेत्री रितिका श्रोत्री हिने सांगितले. पुणेस्थित रितिका श्रोत्रीने टीव्हीवरील ‘गुंतता हृदयातून’मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमधून घराघरांत पोहोचली.

आजवर १४ चित्रपटांतून साकारलेल्या बिनधास्त आणि बेधडक भूमिकांमुळे तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, ‘सरी’ या चित्रपटात रितिका एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाली.

आजवरच्या भूमिकेपेक्षा ही तिची वेगळी भूमिका होती. अत्यंत सोज्वळ, अभ्यासू आणि रोमँटिक ‘दिया’चा हा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला. ‘सरी’मधील दियाची भूमिका साकारणे, माझ्यासाठी समाधान देणारा अनुभव होता, असे रितिका सांगते. आता ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या चित्रपटाची उत्सुकता मलाही लागली असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, असा विश्वास आहे.

Ritika Shrotri IFFI 2025
Anupam Kher At IFFI: 'मुंबईत आलो तेंव्हा खिशात फक्त 36 रूपये होते', इफ्फीत अनुपम खेर यांनी मांडला संघर्ष; Watch Video

प्रशांत दामले ‘हिटलर’

‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले हे आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘हिटलर’ची भूमिका ते साकारत असून हिटलरच्या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांना हिटलरच्या वेशात बघूनच अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. प्रशांत दामले यांच्यासोबतच चित्रपटात आनंद इंगळे, मनमीत पेम, प्रणव रावराणे, वैभव मांगले, रितिका श्रोत्री आणि गीतांजली कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे.

Ritika Shrotri IFFI 2025
IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्‌ट्रिक

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘वाळवी’ या तीन मराठी चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅट्‌ट्रिकनंतर आणि यंदा मराठी बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या ‘नाच गं घुमा’ नंतर; लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी आता नवा सिनेमा आणत आहेत. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाची निवड यंदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com