Goa Gen Z fashion trends: गोवा, हे अनेकांसाठी एक हवंहवंसं कोडं आहे. इथली जीवनशैली, खाद्यसंस्कृती आणि पेहराव याबद्दल अनेक लोकांना उत्सुकता असते. याच उत्सुकतेतून एका गोमंतकीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला तिच्या राज्यातील फॅशन सेन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि सध्या तिच्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच गाजतोय.
करिश्मा जांबवलीकर या गोव्याच्या कंटेंट क्रिएटरला नुकतंच '3xp पॉडकास्ट'वर मुलाखतीदरम्यान गोव्यातील जेन-झी फॅशनबद्दल विचारण्यात आलं. प्रत्येक गोमंतकीय व्यक्तीच्या फॅशन प्रवासाचे तीन टप्पे असतात, असं एक आगळंवेगळं निरीक्षण तिने मांडलं.
पहिला टप्पा, जो साधारणपणे वयाच्या १३ वर्षांपर्यंतचा असतो, त्यावेळी मुलामुलींच्या कपड्यांची निवड त्यांचे पालक करतात. या वयात स्वतःची आवड किंवा फॅशनची निवड करण्याची मुभा नसते, त्यामुळे पालक जे देतील ते कपडे वापरले जातात.
दुसरा टप्पा, जो वयाच्या १९ वर्षांपर्यंतचा असतो, तो तरुणाईचा असतो. या काळात आजूबाजूला जे ट्रेंड दिसतात, जे कपडे इतरांना चांगले दिसतात, तेच कपडे घालण्याचा कल वाढतो. तारुण्यातील आकर्षण आणि फॅशनच्या प्रवाहाचा प्रभाव या टप्प्यावर प्रकर्षाने जाणवतो.
तिसरा टप्पा, त्यानंतर सुरू होतो. या टप्प्यात कपड्यांच्या रंगांमध्ये बदल दिसून येतो, अनेकजण गडद रंगांच्या कपड्यांना प्राधान्य देतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या काळात व्यक्तीला काय योग्य आहे आणि काय अयोग्य, याचा अंदाज येऊ लागतो. आपल्याला काय शोभून दिसेल, हे समजून घेऊन कपड्यांची निवड केली जाते. आजही काही लोक फॅशनच्या नावाखाली विचित्र कपडे वापरत असले, तरी अनेकजण सभ्य आणि सुटसुटीत पेहराव निवडतात, असेही तिने सांगितले.
करिश्मा जांबवलीकर ही गोव्यातील जेन-झी (Gen-Z) पिढीची फॅशन, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीवर कंटेंट तयार करते. तिच्या इन्स्टाग्रामवर मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत, ज्यामुळे तिचे विचार अनेकांपर्यंत पोहोचतात. तिच्या या निरीक्षणांमुळे गोव्यातील स्थानिक जीवनशैलीबद्दल एक वेगळी माहिती मिळाल्याने तिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एकंदरीत, गोव्यातील फॅशन एका साच्यात बसणारी नसून, ती प्रत्येक व्यक्तीच्या वाढीनुसार आणि अनुभवानुसार बदलत जाणारी एक प्रक्रिया आहे, हेच करिश्माच्या बोलण्यातून स्पष्ट होतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.