Ganesh Chaturthi Konkani Marathi plays Dainik Gomantak
मनरिजवण

Konkani Drama: गोमंतकीयांसाठी मेजवानी! गणेश चतुर्थीनिमित्य नवीन नाटके; शेकडो प्रयोग होणार सादर

Ganesh Chaturthi Konkani Marathi plays: अनेक नवीन कोकणी मराठी व्यावसायिक नाटके रंगमंचावर अवतरत आहेत. त्यापैकी काही नाटकांचे प्रयोग काल रात्रीपासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात सुरूही झाले असतील.

Sameer Panditrao

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक नवीन कोकणी मराठी व्यावसायिक नाटके रंगमंचावर अवतरत आहेत. त्यापैकी काही नाटकांचे प्रयोग काल रात्रीपासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात सुरूही झाले असतील. या नवीन नाटकांची ओळख दै. गोमन्तक आपल्याला (दोन भागांत) करून देत आहे. गोव्यातील शेकडो नाट्यकलाकार या नाटकांद्वारे पुढील वर्षभर आपल्या रात्री जागवणार आहेत. यापैकी काही नाटकांचे शेकडो प्रयोगही वर्षभरात सादर होतील. 

अबोल प्रीतीची अजब कहाणी

मूळ कोकणी नाटकाचा मराठी अनुवाद असलेले हे नाटक आहे. या नाटकाची कथा एका कुत्र्यावर आधारलेली आहे.

मुक्या प्राण्यांनाही मन असते आणि ते आपल्या मालकावर उत्कटतेने प्रेम करत असतात.‌ अशा मुक्या प्राण्यांचा सांभाळ आपण व्यवस्थित करायला हवा  असा संदेश हे नाटक देते. 

जावई सायलेंट  सासूबाई व्हायलंट

जावई आणि सासू या दोन मुख्य पात्रांभोवती या नाटकाची कथा फिरते.‌ सासुबाई कडक आहेत आणि त्या आपल्या जावयाला कमी लेखत असतात कारण तो गरीब आहे.‌ आपल्या मुलीवर असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे त्यांनी जावई स्वीकारला आहे मात्र मनातून त्यांना तो आवडत नाही.‌ जावयाला त्या वेगवेगळ्या प्रकारे छळत असतात. असे असले तरी एका प्रकरणात जावई आपल्या बायकोच्या घराण्याची अब्रू वाचवतो व सासूचे त्याच्याबद्दलचे मत बदलते.   

प्रीत प्रीत प्रीतम 

हे नाटक कुटुंबातील एका मुलीवर आधारलेले आहे. ही मुलगी आपल्या भावांबरोबर मोठी होत असताना ती त्यांच्यासारखीच पुरुषी बनत जाते. तिच्या पुरुषी वर्तनामुळे ती आपल्या परिसरात वचकही निर्माण करते.‌ तिचे लग्न कसे होईल हा प्रश्न तिच्या कुटुंबाला पडलेला असतो.‌ अशावेळी त्या मुलीला पहायच्या निमित्ताने ज्या पुरुषाचा‌ प्रवेश तिच्या घरात होतो तो पुरुष तिला कालांतराने पूर्ण बदलवून टाकतो.‌

शंकर बीए, बी.कॉम (वैभवी क्रिएशन्स)

या नाटकातील मुख्य पात्र शंकर भक्त आहे.‌ मात्र तो त्याच्या कामाला कंटाळला आहे व त्याला जीव नकोसा झाला आहे.‌ तो जेव्हा जीव द्यायला जातो त्यावेळी त्याच्या समोर साक्षात भगवान शंकर अवतरतात व त्याच्या मागणीप्रमाणे त्याला भूतकाळ प्रदान करतात. मात्र त्या भूतकाळात त्याला पुन्हा वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते.‌ भगवान शंकराकडे तो त्यानंतर भविष्यकाळ मागतो.‌ भविष्यकाळ देखील त्याच्यासाठी फारसा सहनीय नसतो.‌ शेवटी तो शंकराकडून वर मागून घेऊन लोकांची मने जाणून घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याला पुन्हा शोकांतिकेचा सामना करावा लागतो. त्यावेळी भगवान शंकर त्याला सांगतात की भूतकाळ किंवा भविष्यकाळात जगण्यापेक्षा वर्तमानातले वास्तव जाणूनच त्यानुसार जगणे श्रेयस्कर असते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

Gold Price: ऐतिहासिक दरवाढ! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने केला मोठा धमाका, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 130000 लाखांच्या पार

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि धोकादायक परिणाम

EPFO PF Withdrawal: खुशखबर! PF मधून आता 100 टक्के रक्कम काढता येणार

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

SCROLL FOR NEXT