Dharmendra last film | Bollywood big releases 2026 Dainik Gomantak
मनरिजवण

Bollywood Big Releases 2026: धुरंधर काहीच नाही! 2026 मध्ये बॉलिवूडचा धमाका; 'धर्मेंद्र' यांचा शेवटचा सिनेमा होणार 1 जानेवारीला प्रदर्शित

Dharmendra last film: बॉलिवूडने 2026 साठी एकापेक्षा एक भव्य चित्रपटांची रांग लावली असून, अ‍ॅक्शन, थ्रिलर, रोमांस ते मायथॉलॉजी असा सर्व मसाला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Sameer Panditrao

२०२५ मध्ये छावा, सैंयारा, धुरंधर या सिनेमांनी तुमचे मनोरंजन केले. आता 2026 हे वर्ष तुमच्यासाठी खास ठरणार आहे. बॉलिवूडने 2026 साठी एकापेक्षा एक भव्य चित्रपटांची रांग लावली असून, अ‍ॅक्शन, थ्रिलर, रोमांस ते मायथॉलॉजी असा सर्व मसाला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दिवाळीपर्यंत अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी, 1 जानेवारी 2026 रोजी श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदा आणि सिमर भाटिया प्रमुख भूमिकेत असून, हा धर्मेंद्र यांचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे.

26 जानेवारी 2026 रोजी देशभक्तीने ओतप्रोत भरलेला ‘बॉर्डर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांची दमदार स्टारकास्ट या चित्रपटाचे खास आकर्षण आहे.

व्हॅलेंटाईन डे, 14 फेब्रुवारी 2026 रोजी ‘ओ रोमियो’ हा रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होईल. शाहिद कपूर, तृप्ती डिमरी आणि तमन्ना भाटिया यांच्या भूमिका यात पाहायला मिळतील. त्यानंतर 27 फेब्रुवारीला राणी मुखर्जीची बहुप्रतीक्षित ‘मर्दानी 3’ सिनेमागृहात येण्याची शक्यता आहे.

मार्चमध्ये ‘धुरंधर 2’, एप्रिलमध्ये ‘अल्फा’, तर 2 ऑक्टोबर 2026 रोजी अजय देवगनचा ‘दृश्यम 3’ रिलीज होणार आहे. दिवाळी 2026 ला नितेश तिवारी दिग्दर्शित भव्य ‘रामायण’चा पहिला भाग येणार असून, शाहरुख खानचा ‘किंग’ आणि ‘लव अँड वॉर’ हे चित्रपटही 2026 मधील चर्चेतले प्रोजेक्ट्स ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"नाईटक्लबच्या दुर्घटनेतील बळी ही तर देशाची हानी"! न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केला शोक; ड्रग्जपासून दूर राहण्याचे तरुणांना केले आवाहन

Drug Menace in Goa: ड्रग्जविरोधात ‘झिरो टॉलरन्स’! CM सावंतांचा कडक इशारा; ड्रग्जमुक्त गोवा घडवण्यासाठी एकत्र येण्याचे केले आवाहन

Konkan Tourism: गोव्याची क्रेझ संपली? पर्यटकांची पावलं आता कोकणाकडे; सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे किनारे 'हाऊसफुल्ल'

गोवा आग दुर्घटना! नाईटक्लब मालक लुथरा बंधुंचा जेलमधील मुक्काम वाढला, पोलिस कोठडीत चार दिवस वाढ

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग हाऊसफुल! 31 डिसेंबरसाठी पर्यटक पडले बाहेर; गोवा-कोकणाकडे वळली पावले

SCROLL FOR NEXT