Varsha Usgaonkar Dainik Gomantak
मनरिजवण

Varsha Usgaonkar: गोवा कॅबिनेट मंत्र्याची लेक ते मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री, वर्षा उसगांवकर यांचा जीवनप्रवास

Bigg Boss Marathi Season 5: गोवा ते मुंबई असा प्रवास करत अभिनयाच्या जोरावर वर्षा उसगांवकर यांनी मराठीत चित्रपटसृष्टीत मोठा नावलौकीक मिळवला आहे.

Pramod Yadav

Bigg Boss Marathi Season 5 contestant Varsha Usgaonkar Journey

मराठीसह हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाने छाप सोडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात दिसत आहेत.

मूळच्या गोव्यातील असणाऱ्या वर्षाताईंनी अनेकवर्षे चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत नावलौकिक मिळवला आहे. राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या घरात जन्म ते अभिनयाद्वारे मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या वर्षाताईंचा जीवनप्रवास रंजक आहे.

जन्म, कौटुंबिक पार्श्वभूमी (varsha usgaonkar Family)

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा जन्म २८ फेब्रुवारी, १९६८ रोजी गोव्यातील फोंडा तालुक्यातील उसगाव येथे झाला. वर्षाताईंचे वडील अच्युत काशिनाथ सिनाई उसगांवकर दिग्गज राजकीय नेते होते.

1963 ते 1977 या कालावधीत त्यांनी पाले मतदारसंघाचे तीनवेळा प्रतिनिधित्व केले. सुरुवातीला दयानंद बांदोडकर आणि त्यानंतर त्यांच्या कन्या शशिकला बांदोडकर यांच्या सरकारमध्ये उसगावकरांनी मंत्री म्हणून काम केले. उसगांवकर यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी होती. त्याचे जून २०२० मध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.

अच्युत काशिनाथ सिनाई उसगांवकर यांना तीन मुली त्यापैकी अभिनेत्री वर्षा उसगांवकर एक आहेत. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या वर्षाताईंनी मराठी नाटक आणि चित्रपटात पदार्पण केले.

चित्रपट क्षेत्रात कशी एन्ट्री झाली? (varsha usgaonkar journey)

वर्षा उसगांवकर यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्रात दोन वर्षे रीतसर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर महापूर या नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेला मुंबई आंतर राज्य नाट्य सुवर्णपदक प्राप्त झाले.

गंमत जंमत या कॉमेडी चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड सुरु केला.

पहिल्याच चित्रपटातून रसिकांच्या मनावर छाप सोडलेल्या वर्षाताईंनी नंतर मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्यांनी एकामागून एक हिट चित्रपट देत मराठी सिनेसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले. याशिवाय त्यांना हिंदी चित्रपटांत देखील काम करण्याची संधी मिळाली. मराठी असो किंवा हिंदी दोन्हीकडे त्यांना दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करता आली.

गाजलेले मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिका (varsha usgaonkar film list)

गाजलेले मराठी चित्रपट - खट्याळ सून नाठाळ सासू, तुझ्याविना करमेना, हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशस, लपंडाव, एक होता विदूषक, आत्मविश्वास, ऐकावं ते नवलच, बायको चुकली स्टँडवर, भुताचा भाऊ, शेजारी शेजारी, सगळीकडे बोंबाबोंब, हाऊसफुल्ल याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी मूख्य भूमिका साकारल्या आहेत.

हिंदी चित्रपट - दूध का कर्ज, दिलवाले कभीना हारे, साथी, हनीमून, हफ्ता बंद, तिरंगा, मंगल पांडे.

मालिका - सुख म्हणजे नक्की काय असतं.

ऋषी कपूर उद्घट (varsha usgaonkar, Rishi Kapoor, Jackie Shroff and Vinod Khanna)

वर्षा उसगांवकर यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत हनीमून या चित्रपटात काम केले. चित्रिकरणादरम्यान ऋषी कपूर उद्घट असल्याचे मत त्यांचे झाले होते. पण, ऋषी कपूर यांच्या खुल्लम खुल्ला या आत्मचरीत्रात वर्षाताईंचा उल्लेख करण्यात आला आहे. नावाचा उल्लेख पाहून त्या भारावून गेल्याचे त्यांनी कपिल शर्मा कॉमेडी शोमध्ये केले होते.

तसेच, जॉकी श्रॉफ हा त्यांचा आवडता अभिनेता असल्याचे त्यांनी याच शोमध्ये नमूद केले होते. याबाबत त्यांनी सार्वजनिक मुलाखतीत खुलासा केला होता. विनोद खन्ना याबाबत त्यांना विचारणा करुन मी तुमचा आवडता नाही, असे म्हटले होते. दरम्यान, तुम्ही देखील देखणे असून, मला आवडता, असे त्यांनी सांगितले होते.

पती आणि कुटुंब (varsha usgaonkar husband and children)

वर्षा उसगांवकर यांनी २००० साली जय शंकर शर्मा यांच्याशी गोव्यात लग्न केले. जय शंकर शर्मा हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र आहेत. वर्षाताई पती जय यांच्यासोबत अनेकवेळा एकत्र इव्हेंट्समध्ये दिसले आहेत. दोघांना मुलबाळ नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हातचलाखीचा मास्टर! मासे चोरण्याचा 'जुगाड' सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, ''गजब का टोपीबाज है''

Mitchell Marsh Drinking Beer: वादग्रस्त बोलणं पडलं महागात! फक्त '6 बिअर' बोलल्यामुळे मिचेल मार्शला संघातून 'डच्चू'! काय आहे नेमकं प्रकरण? Watch Video

Goa Police Constable Fraud: पोलिस कॉन्स्टेबलचा भांडाफोड! आंध्र प्रदेशातील बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी; पणजी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

SCROLL FOR NEXT