Dhananjay Powar Goa Family Trip
पणजी: कॉमेडी व्हिडिओ आणि रिल्समुळे सोशल मिडियावर नावारुपाला आलेल्या आणि त्यानंतर मराठी बिग बॉसमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला धनंजय पोवार नुकतेच फॅमिलीसोबत गोव्याच्या ट्रीपवर गेले होते. धनजंयसोबत त्यांच्या पत्नी आणि त्यांचे मित्र देखील होते. डीपी या टोपन नावाने प्रसिद्ध असलेल्या धनंजय यांचे गोवा ट्रीपचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
धनंजय पोवार यांनी गोवा ट्रीपमध्ये पत्नीसोबत काही व्हिडिओ शूट केले आहेत. डीपी पत्नीसोबत एका रिलमध्ये दिसत असून, दोघांची जोडी छान दिसत आहे, अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत.
बिग बॉस मराठी फेम डीपीने पत्नीसोबत काढलेले फोटो देखील त्यांच्या Instagram Account वरुन शेअर केले आहेत.
डीपीसोबत या ट्रीपवर त्यांचा मित्र निखिल वाघ देखील दिसत. निखिल देखील रिल्सवरून प्रसिद्ध झालेला एक चेहरा म्हणून ओळखला जातो.
डीपींनी पत्नी, मित्रांसोबत गोव्यात केलेली धम्माल भेट दिलेली ठिकाणे यांचा व्हिडिओ youtube वरती प्रसिद्ध केला आहे.
धनंजय पोवार मराठी बिग बॉसमुळे प्रत्येक मराठी माणसाच्या घरात पोहोचले. बिग बॉसच्या फायनलपर्यंत त्यांनी बाजी मारली पण बिग बॉसच्या ट्रॉफीवर त्यांना नाव कोरता आले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.