Bhool Bhulaiyaa 3 Dainik Gomantak
मनरिजवण

Bhool Bhulaiyaa 3: भूताचे चित्रपट बघताना भीती वाटते? या टीप्स वाचा आणि मित्रांसोबत भयपट एन्जॉय करा

गोमन्तक डिजिटल टीम

तुंबाड, स्त्री, भूलभुलय्या किंवा मुंजा अशा हॉरर चित्रपटांची सध्या चर्चा सुरूये. बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करणारे हे चित्रपट बघायची इच्छा असली तरी अनेक प्रेक्षक भीतीपोटी थिएटरमध्ये जात नाही. अगदी नेटफ्लिक्स, प्राईम अशा प्लाटफॉर्मवरही घरी बसून चित्रपट किंवा वेबसीरिज बघायचं धाडसंही होत नाही.

समजा तीन तरुणांचा ग्रुप आहे, शनिवारी रात्री एखाद्याच्या घरी जाऊन चित्रपट किंवा वेबसीरिज बघायची असा प्लान ठरतो. ग्रुपमधला एक जण भयपटांना घाबरतो आणि तुम्हाला रॉमेंटिंक किंवा देशप्रेमावरील चित्रपट पाहून समाधान मानावे लागते. असे तुमच्यासोबतही घडले असेलच...

तर मग अशावेळी नेमके काय करावे? भूताचे चित्रपट बघणाऱ्या प्रेक्षकांचे तीन प्रकार कोणते?

प्रेक्षकांचे तीन प्रकार कोणते?

  • 1.भुताचा चित्रपट म्हणून आधीच शस्त्र गाळून गेलेले

  • 2. फरक न पडणारे

  • 3. फरक पडून देखील मी कसा शूर आहे हे दाखवणारे.

यातल्या पहिल्या आणि तिसऱ्या प्रकारात तुम्ही मोडत असाल तर खाली दिलेले उपाय देखील वाचा.

चित्रपटाची गोष्ट वाचा:

आता चित्रपट न बघता त्याची गोष्ट कशी वाचायची, हा तर स्पॉईलर आहे असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे मात्र भुताची भीती वाटून घायची नसेल तर हा मुद्दा देखील महत्वाचा ठरतो हे लक्षात घ्या. चित्रपटांच्या इतर जॉनर्सप्रामणे हॉरर हा जॉनर नाही. गोष्ट माहित असून देखील चित्रपटातले संगीत किंवा थरारक बॅकग्राउंड म्युजिक(BGM) तुम्हाला भुताचा चित्रपट पाहत असल्याचं फिलिंग नक्की देऊन जातं. चित्रपटाची गोष्ट माहिती असल्याने अचानक समोरून किंचाळत येणाऱ्या बाईचा थेट परिणाम मनावर होत नाही, कारण आपलं मन आता काय बघावं लागणार आहे यासाठी तयार झालेलं असतं.

मोबाईलमध्ये चित्रपट पहा:

एखाद्या मोठ्या थिएटरमध्ये बसून, भरपूर पैसे देऊन, घाबरून चित्रपट अर्धवट सोडून येण्यापेक्षा घरात तुमच्या आवडत्या ठिकाणी बसून मस्त मोबाईलमध्ये चित्रपट पहा. घरी मोठ्या टीव्हीवरही चित्रपट बघू नका. यामुळे काय होईल एखाद्यावेळी भीती वाटलीच तर मोबाईल बाजूला ठेवता येईल किंवा आवाज कमी करता येईल. महत्वाचं म्हणजे आजूबाजूच्या लोकांना तुम्ही घाबरला आहात हे समजणार नाही. चित्रपटातलं भूत खरोखर भयानक असेल पण आवाज बंद केल्याने चित्रपटाची गोष्ट निसटणार असेल तर मग सरळ मोबाईल बाजूला ठेऊन केवळ गोष्ट ऐकून तुम्ही चित्रपटात काय सुरूये हे जाणून घेऊ शकता.

एखाद्या मित्राला सोबत घ्या:

तुमचा एखादा मित्र किंवा भाऊ, बहीण अशा चित्रपटांना घाबरत नसेल किंवा हेच चित्रपट त्यांना पाहायचे असतील तर त्यांना चित्रपट पाहण्यासाठी सोबत घेऊन बसा. यामुळे काय होईल एखादा भयंकर प्रसंग येणार असल्यास ही माणसं तुम्हाला कल्पना देतील आणि तुम्ही डोळे गच्च बंद करून तयार राहू शकाल.

ब्रेक घ्या:

घरी चित्रपट बघण्याचं आणखीन एक कारण म्हणजे प्रचंड भीती वाटल्यानंतर तुम्ही काहीसा ब्रेक घेऊ शकता. मन घाबरलेलं असेल तर बाहेर चक्कर टाकून या, मोकळी हवा खा यामुळे काय होईल मनावरचा ताण कमी होईल. चित्रपट भुताचा असल्याने आता पुढे काय? असा प्रश्न कायम मनात असतोच त्याला थोडं खतपाणी मिळेल आणि मनातलं कुतूहल आणखीन वाढेल. मनात जेव्हा कुतूहल जास्ती असतं तेव्हा साहजिकपणे आपल्याला ती गोष्ट आवडते.

लिहून काढा, भीती घालवा:

तुम्ही एखादा भयानक चित्रपट पहिला म्हणजे साहजिक मनात भीती असेल. एकट्याने झोपायचं सुद्धा म्हटलं तरीही ते भूत शेजारी नाही ना असा विचार येईल. चित्रपट बघून अनेक वर्ष झाल्यानंतर सुद्धा अनेकवेळा तशीच काहीशी गोष्ट घडली म्हणजे पूर्ण चित्रपट डोळ्यांसमोर उभा राहतो मग हे नको असेल तर चित्रपट बघून झाल्या-झाल्या मनातली भीती लिहून काढा. मी कुठे घाबरलो? का घाबरलो? या सगळ्याची एक यादी करा, जेणेकरून मनातली भीती कायमची गायब होईल आणि तुम्ही दुसरा भयपट पाहण्यासाठी तयार असाल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chirag Nayak: मडगावचे युवा उद्योजक चिराग नायक लवकरच सुरु करणार राजकीय इनिंग; काँग्रेसची धरणार वाट!

Aquino De Bragança: मोझांबिकच्या स्वातंत्र्य लढ्यातील 'गोमंतकीय शिलेदार'

Goa Weather Explained: गोव्यात मॉन्सूनच्या परतीचा प्रवास का लांबला?

Goa MLA Disqualification Case: मोठी बातमी! 8 बंडखोर काँग्रेस आमदारांविरोधातील याचिका सभापती तवडकरांनी फेटाळली

Goa News: कुळण येथे गुलमोहराचे झाड पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT