Arbaaz Khan Daughter: बॉलिवूड अभिनेता-निर्माता अरबाज खान आणि त्याची पत्नी, मेकअप आर्टिस्ट शूरा खान यांच्या घरी एका गोंडस कन्येचे आगमन झाले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याने आपल्या आयुष्यातील या नव्या अध्यायाचे स्वागत मोठ्या आनंदात केले आहे. अरबाज आणि शूरा आता एका सुंदर मुलीचे आई-वडील झाले आहेत.
अरबाज खान (वय ५८) आणि शूरा खान (वय ३५) यांच्या वयातील २३ वर्षांच्या अंतरामुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चा झाली होती. यावर अरबाजने अत्यंत स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण मत मांडले होते. एका मुलाखतीत अरबाजने सांगितले होते की, त्यांचा लग्नाचा निर्णय अचानक घेतलेला नव्हता. त्यांनी लग्नापूर्वी खूप वेळ एकत्र घालवला होता.
"माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप लहान असली तरी ती १६ वर्षांची नाही. तिला तिच्या आयुष्यात काय हवे आहे हे तिला माहीत होते आणि मला माझ्या आयुष्यात काय हवे आहे, हे मला माहीत होते. आम्ही दोघांनीही एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्यासाठी वर्षभर खूप वेळ एकत्र घालवला."
"जास्ती वयामुळे नातेसंबंध टिकता का, असा प्रश्न स्वतःला विचारा. ज्या विवाहांमध्ये खूप मोठे वयाचे अंतर असते, त्यांचा यशस्वी दर खूप जास्त असतो," असे मत अरबाजने व्यक्त केले होते. अरबाज खानने आपल्या नात्यात प्रेम, आदर आणि समर्पण या मूल्यांवर जोर दिला, जे त्यांच्यासाठी वयापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. शूरा खान, रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा टंडन यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांची मेकअप आर्टिस्ट आहे, तिने बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून स्वतःला दूर ठेवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.