Sreejita De And Michael Blohm-Pape Goa Wedding Instagram
मनरिजवण

Sreejita De: जर्मन नवरा, बंगाली नवरी! प्रसिद्ध अभिनेत्रीने गोव्यात प्रियकरासोबत दुसऱ्यांदा केले लग्न; पाहा Photo

Sreejita De And Michael Blohm-Pape Goa Wedding: अखेर एका वर्षानंतर दोघांनी पुन्हा गोव्यात सात फेरे घेतले आहेत.

Pramod Yadav

पणजी: बिग बॉस फेम अभिनेत्री श्रीजीता डे'ने गोव्यात जर्मन प्रियकर मायकल ब्लोहम पेप याच्याशी बंगाली पद्धतीने लग्न केले. गेल्यावर्षी जूनमध्ये दोघांनी जर्मनीत एका चर्चमध्ये लग्न केले होते. अभिनेत्री श्रीजीताची गोव्यात बंगाली पद्धतीने लग्न करण्याची इच्छा होती अखेर एक वर्षानंतर दोघांनी दुसऱ्यांदा लग्न केलंय. दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

बंगाली अभिनेत्रीच्या गोव्यातील लग्नाचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. दोघांनीही बंगाली पद्धतीने कपडे परिधान केले असून, त्यांची जोडी शोभून दिसत आहे.

लग्नातील काही खास क्षण देखील श्रीजीताने शेअर केले आहेत. यात हळद यासारख्या विविध विधींचा समावेश आहे. दोघांनीही सफेद रंगाच्या पोशाख परिधान केला आहे.

जर्मनीत लग्न उरकून भारतात आल्यानंतर श्रीजीता बंगाली पद्धतीने लग्न करण्यास देखील उत्सुक होती. तिने मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती. अखेर एका वर्षानंतर दोघांनी पुन्हा सात फेरे घेतले आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी जूनमध्ये दोघांनी चर्चमध्ये लग्न केले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो त्यावेळी श्रीजीताने शेअर केले होते.

अभिनेत्री श्रीजीता आणि मायकल खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. तिचा नवरा मायकेल ब्लोहम-पेप एका जर्मन कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतो. तो काही काळ मुंबईत राहत होता आणि बिग बॉस दरम्यान त्याने श्रीजीताला खूप सपोर्ट केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT