Stills from upcoming film "Saali Mohabbat" Social Media
मनरिजवण

IFFI Goa 2024: इफ्फीत 'साली मोहब्बत'चा वर्ल्ड तर MRS. चा आशिया प्रीमियर

IffI World And Asia Premiere: गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार आहे.

Pramod Yadav

IFFI Goa 2024

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २० नोव्हेंबरपासून गोव्यात सुरु होत आहे. अवघे दहा दिवस या महोत्सवासाठी उरले असून, राजधानीत इफ्फीची जय्यत तयारी सुरु आहे.

यासह महोत्सवात यावेळी दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची नावे तसेच, महोत्सवात हजेरी लावणारे कलाकार, मान्यवर यांची नावे समोर येऊ लागली आहेत. शिवाय यावेळी वर्ल्ड प्रीमियर आणि आशिया प्रीमियरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची नावे आणि वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

IFFI Goa 2024 World Premiere

यावेळी ५५ व्या इफ्फीत साली मोहब्बत या चित्रपटाचा पीमियर झळकणार आहे. मनीष मल्होत्राची निर्मिती असणाऱ्या चित्रपटाचे तिस्का चोप्रा यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात राधिका आपटे, शरत सक्सेना, अनुराग कश्यप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

वर्ल्ड प्रीमियर

चित्रपट - साली मोहब्बत

दिनांक - २२ नोव्हेंबर २०२४

वेळ आणि ठिकाण - सायंकाळी ४.४५ मिनिटांनी आयनॉक्स पणजी, गोवा

कलाकार - राधिका आपटे, शरत सक्सेना, अनुराग कश्यप यांच्या मुख्य भूमिका आहेत.

International Film Festival of India Asia Premiere

तर, आशिया प्रीमियरमध्ये मिसेस हा चित्रपट दाखवला जाणार आहे. यात बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री सन्या मल्होत्रा प्रमुख भुमिकेत दिसणार आहे.

आशिया प्रीमियर

चित्रपट - MRS.

दिनांक - २२ नोव्हेंबर २०२४

वेळ आणि ठिकाण - सायंकाळी ५. ४५ वाजता, आयनॉक्स पणजी, गोवा

कलाकार - सन्या मल्होत्रा, निशांत दहिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

इफ्फीसाठी नोंदणी खुली

गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या काळात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरु झाली आहे. आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी विविध प्रकारचे नोंदणीचे पर्याय उपलब्ध आहेत.

सिनेरसिकांना, विद्यार्थ्यांना आणि प्रतिनिधींना इफ्फीसाठी नोंदणी करता येणार आहे. इफ्फी महोत्सव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 14 September 2025: आर्थिक लाभाचे संकेत, कुटुंबात सौख्य; भावनिक तणाव टाळा

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

SCROLL FOR NEXT