मडगाव: अटीतटीची लढत ज्या मतदारसंघात होणार त्यात फातोर्डा मतदारसंघाचा समावेश आहे. यावेळी विजय सरदेसाई जिंकले तर त्यांच्यासाठी ही विजयाची हॅटट्रिक ठरणार असून त्यांचे विरोधक दामू नाईक यांच्यासाठी ती पराभवाची हॅटट्रिक ठरणार आहे. फातोर्ड्यात ही हॅटट्रिक होणार, की दामू ती अडविणार हे 10 मार्चला स्पष्ट होणार आहे.
हायप्रोफाईल लढत असलेल्या या मतदारसंघात यावेळी 76 टक्के मतदान झाले असून हे वाढीव मतदान कुणाच्या बाजूने झाले असेल, याबद्दल तर्क लढवले जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान म्हणजे कार्यकर्त्यांनी लोकांना मतदानासाठी बाहेर काढले, हा त्याचा सरळ अर्थ आहे. वाढीव टक्केवारीवर समाधान व्यक्त करून आमदार विजय सरदेसाई यांनी, लोक भाजपला घरी पाठविण्यासाठी मतदानास बाहेर पडले आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
2017 मध्ये सरदेसाई यांनी सुमारे दीड हजार मतांनी दामू नाईक यांच्यावर विजय मिळविला होता.
फटिंगपण संपवण्यासाठीच मतदान
दामू नाईक यांनी सांगितले,की फातोर्ड्यातील फटिंगपण संपविण्यासाठी हे वाढलेले मतदान झाले आहे. लोक या आमदाराला विटले आहेत. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत, असे ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.