will dates of Goa election declared on occasion of 60th goa Liberation Day

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

गोवा मुक्तिदिनाचा मुहूर्त साधणार; निवडणुकांचा बिगुल वाजणार

नियोजित बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन ॲण्ड रिसर्चचीही पंतप्रधान पायाभरणी करतील.

दैनिक गोमन्तक

पणजी:  गोवा मुक्ती हीरक महोत्सवी (Goa Liberation Day) वर्षाच्या समारोप सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गोव्यात (Goa) येत असून राज्य सरकारने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पणजीच्या आझाद मैदानावर (Azad Ground) मुक्ती लढ्यातील शहिदांना आदरांजली वाहून पंतप्रधानांच्या गोवा दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून तसेच पंतप्रधानांच्या उपस्थितीचा लाभ घेत भाजप निवडणुकीचा बिगुल वाजवणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मिरामार किनाऱ्यावरील  नौदलाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सेल परेड आणि फ्लाय पास्ट’ला (Cell parade and fly past) हजेरी लावून पंतप्रधान मोदी हे मुख्य समारंभासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवरील  कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

आझाद मैदान आणि मिरामार किनाऱ्यावरील कार्यक्रमानंतर पंतप्रधान दुपारी 3 वाजता ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे गोवा मुक्ती दिनाच्या मुख्य सोहळ्याला उपस्थित राहतील. या कार्यक्रमात पंतप्रधान स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मधील योद्ध्यांचा सत्कार करणार आहेत. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा मुक्त करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन विजय’च्या यशस्वी कामगिरीप्रीत्यर्थ दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. याच सोहळ्यात नूतनीकरण केलेला आग्वाद किल्ला कारागृह संग्रहालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा सुपर स्पेशालिटी ब्लॉक, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील हवाई कौशल्य विकास केंद्र (एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर) आणि दवर्ली येथील गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन प्रकल्पांचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय नियोजित बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन ॲण्ड रिसर्चचीही ते पायाभरणी करतील.

पुरस्कार वितरण

आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा - गोवा @ 60 योजनेतील 6 सर्वोत्कृष्ट पंचायत/ नगरपालिका, 6 स्वयंपूर्ण मित्र आणि स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदी हे पुरस्कारांचे वितरण करतील. यावेळी गोवा मुक्ती दल आणि गोमंतक विमोचन समितीच्या चार स्वातंत्र्यसैनिकांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

पणजीतील मुख्य रस्ते बंद

पणजीतील जुने सचिवालय ते मिरामार, दोनापावल, श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम ते बांबोळीपर्यंतचा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 12.30 पासून संध्याकाळी 5 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पणजी शहरात येणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्ग निवडावेत, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिली.

सेल परेड आणि फ्लाय पास्ट  

गोवा मुक्ती लढ्यामध्ये नौदलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता मुक्ती दिनाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त देशात पहिल्यांदाच नौदलाने सेल  परेडचे आयोजन केले आहे. यात भारतीय बनावटीची, गोव्यात निर्माण झालेली, तसेच नौदलासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे जहाज, छोट्या होड्या, अत्याधुनिक जहाजे आणि सेलर सहभागी होणार आहेत. फ्लाय पास्टमध्ये भारतीय नौदलाचे मिग - 29 के, डॅनियर, चेतक हेलिकॉप्टर सहभागी होणार आहेत. अत्यंत नेत्रदीपक असा हा सोहळा मिरामार बीचवर नागरिकांना गेट क्र. 3 वरून पाहता येणार आहे. यासाठी नागरिकांना 12.30 वाजेपर्यंत किनाऱ्यावर यावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT