Dainik Gomantak

गोवा निवडणूक

मोठी राज्ये सोडून लहानशा गोव्यात ममतांना रस का?

Priyanka Deshmukh

पणजी : गोव्यात भाजपचा (BJP) पराभव करायचा असेल तर त्यांनी पक्षाला पाठिंबा द्यावा, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) म्हणाल्या. गोव्याचे "सुंदर, प्रेमळ अतिशय हुशार" अशा शब्दात त्यांनी गोव्याचे वर्णन केले. TMC पक्षाने राज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नाही, तर गोव्यातील लोकांना निवडणुकीत (Goa Election) मदत करण्यासाठी आपला अनुभव घेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे बॅनर्जी गोव्यात (Goa) म्हणाल्या.

या पक्षांशी केली युती

गोव्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या बॅनर्जी यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी सोबत युती केली. "जर कोणाला भाजपचा पराभव करायचा असेल, तर आम्हाला पाठिंबा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्याकडे पश्चिम बंगालप्रमाणे गोव्याच्या निवडणुकीचीही योजना आहे, जी सत्तेवर आल्यानंतर सहा महिन्यांत किनारपट्टीच्या राज्यात लागू केली जाईल. यापूर्वी आमच्या पक्षाने गोव्यात निवडणूक लढविण्याचा विचार केला नव्हता, परंतु जेव्हा हे लक्षात आले की इतर पक्ष भाजपला स्पर्धा देत नाहीत, तेव्हा टीएमसीने गोवा रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. एवढ्या वर्षांत आम्ही गोव्यात आलो नाही, पण कोणी काही करतांना दिसले नाही म्हणून आम्ही गोव्यात आलोय, असे बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी सांगितले.

काँग्रेसवर पुन्हा एकदा मोठा हल्लाबोल

"जेव्हा तुम्ही पश्चिम बंगालमध्ये आमच्याविरुद्ध लढू शकता, तर आम्ही गोव्यात तुमच्याविरुद्ध का लढू शकत नाही. आम्हाला तुमच्यासोबत काम करायचे आहे, पण आम्ही स्वबळावर लढू. गोव्यात होणार खेल जतलो," असे काँग्रेसचा उल्लेख करत बॅनर्जी गोव्यात म्हणाल्या. या आधी पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी 'खेला होबे'चा नारा दिला होता.

गोवाच का?

आसाम, त्रिपुरा आणि गोवा या तिन्ही राज्यांची लोकसंख्या बाकीच्या राज्याच्या तुलनेत कमी आहे, पण हेच ते एकमेव कारण आहे का की ममता यावेळी यूपी, पंजाबसारख्या मोठ्या राज्यांचा मोह सोडून आपली सर्व ताकद गोव्यात लावत आहेत. चित्रपट आणि फुटबॉलसह अनेक गोष्टी पश्चिम बंगाल आणि गोवा यांना जोडतात. राजकीय तज्ज्ञांच्या मते, हे एक कारण असू शकते पण हे सर्वात मोठे कारण नाही. राजकारणातील बड्या विश्लेशकांच्या मते या राज्यांतील मतदारांची विचार करण्याची पद्धत हे सर्वात मोठे कारण आहे. या राज्यांतील लोक कॉस्मोपॉलिटन मानसिकतेचे आहेत, ज्याचा ममता जास्त फायदा घेऊ शकतात. या राज्यांतील निवडणुका संपूर्ण राज्याच्या प्रश्नांवर लढवल्या जाऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT